date
लेखनविषय:
काव्यरस
फोनवर मंजूळ आवाजाने
हळुवारपणे संध्याकाळी
date ठरली
मी वेळेवर तयारीत पोहचलो
ती तयारच होती
मला पाहताच गोssड हसली
अनं माझा हात हातात घेतला
माझा हात तसाच हातात ठेऊन
तिने तिचे नेत्र मिटले
विचारात कुठेतरी हरवून गेली
ते सुरेख नेत्र उघडून
म्हणाली 'तुझे डोळे बघू!'
खुपवेळ ती माझ्या अनं मी तिच्या
डोळ्यात बघत होतो
एकटक, निरखून !!
परत तिने माझा हात हातात घेतला
हळूच घड्याळ बघून हसली..
अचानक माझ्या छातीलाच तिने कान लावले
छाती धडधडली, श्वास वेगावला
पण ती शांतपणे माझे चुकलेले ठोके ऐकत होती
अगदी मन लावून!!
एक निश्वास सोडून ती
तिच्या जागेवर बसली
पेन हातात घेऊन
गुलाबी कागदावर लिहू लागली
मी धडधडतचं होतो
धक्यातून मी अजून सावरलोचं नव्हतो
शेवटी सही करून तिने
कागद मला दिला
वाचतांना धडधड कमी झाली
Rx
Minor Viral Infection...
वाचने
3594
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
हे minor नाही हो.. major आहे....
परवाच अशी खरीखूरी डेट झाली... आमचे ब्लड प्रेशर पन तपासले गेले होते. नॉर्मल आहे म्हणाली, माझा वीश्वास बसला नाही पण सांभाळून घेतल कारण तीची इंटर्नशीप चालू होती .
कविता छान ..
अशी date आमच्या फक्त स्वप्नात आणि लईच आठवण आली कोणाची तर शब्दात असते ..
धन्यवाद...
अहो पण आमची वालीची इंटर्नशिप झाली हो... तिनेच आम्हाला सांभाळून घेतले...
औषध काय दिले पण ??????????? ;)
ते कळलंच नाही .
In reply to औषध काय दिले पण ??????????? by विनायक बेलापुरे
औषध नल गे मला!
कविता आवडली .
In reply to औषध नल गे मला! कविता आवडली . by स्पंदना
औषध नल गे मला!
ऑ !! बापरे !!
धक्कादायक आहे. ;)
In reply to औषध नल गे मला! कविता आवडली . by स्पंदना
औषध नल गे मला!
अहो जरा सांभाळुन शब्द तोडा हो.In reply to औषध नल गे मला! अहो जरा by परिकथेतील राजकुमार
औषध नल गे मला!"औषध null gay मला" असं वाचलं चुकून.
In reply to औषध नल गे मला! अहो जरा by परिकथेतील राजकुमार
अरे पर्या माफ आहे त्यांना .. त्यांच नावंच विनायक :)
In reply to अरे पर्या माफ आहे त्यांना .. by टारझन
टार्या टार्या... अरे आज ऑफिसात अती श्रम झालेत का तुला ? ;)
ते वाक्य त्यांचे नाही, उलट त्यांनी चुक पकडली आहे ;) वाच की मेल्या निट.
In reply to टार्या टार्या... अरे आज by परिकथेतील राजकुमार
आर्र्र ... ह्या अपर्णा काकु आहेत होय ... =)) =))
धन्यवाद...
http://kalewadi-aghadi.blogspot.com/
हे