बेदखल
धुराच्या ढगात वेढलेला, आणि
चारी बाजूनी घोंगावणा-या
चारचाकी यंत्राच्या गोंगाटात,
डांबराच्या तापलेल्या रस्त्यांवरच्या
करड्या मळकट पट्ट्यांना ओळख देत
तल्लीन झालेला तो रंगारी…
त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय,
हे ओळखण तसं कठीणच.
जपणा-या माणसांपेक्षा
मुकाट खपणा-या बिन हृदयाच्या
यंत्रांची जंत्री वाढली कि
हे अस व्हायचंच…
वाचने
1241
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
पहिल्या परिच्छेदात छान शब्दचित्र काढलेले आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय, हे ओळखण तसं कठीणच.वाह वा एकदम छान ! कविता आवडेश पु ले शु
कविता आणि त्यामागील उद्देश मनाला भिडला ..
लिहित रहा .. वाचत आहे..
In reply to कविता आणि त्यामागील उद्देश by गणेशा
असेच म्हणते.
पहिल्या परिच्छेदात