मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आश्वस्त

सोनल कर्णिक वायकुळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ह्या रेताड रखरखाटात कोणास ठाऊक कशी चिकटून बसलीत ही पाती आणि कोण सोस त्या वा-याला सुद्धा ह्या जळजळाटात स्वतः तापत फुंकर घालण्याचा तरी मृगजळाला सुद्धा भास व्हावा मोरपिसांच्या रंगांचा? ह्या वेडेपणाच तू नाव आहेस कि कारण हे माहित नाही पण तुझा हात इथे फिरलाय हे नक्की…

वाचने 959 वाचनखूण प्रतिक्रिया 2