मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जा हसत दूर जा

गणेशा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको जा हसत दूर जा त्रासलेला तुझा होकार नको घाव घातलेल्या ओंडक्यासम ह्रदयावर प्रेमाचा पुन्हा नवा अंकुर नको जा हसत दूर जा सोडणार्‍या साथीचा आधार नको परत परतण्याचा विचार नको ह्रदयावर नवीन वार नको जा हसत दूर जा मनाशी आता कुठला ही धागा नको तुटणार्‍या या नात्याला आशेचा आणखीन एक बंध नको जा हसत दूर जा आसवांची अखंड धार नको आशेचा एक आणखीन नविन किरण नको ---- शब्दमेघ

वाचने 1500 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मिसळलेला काव्यप्रेमी 05/04/2011 - 15:59
लय भारी ओ पावनं!! जा हसत दूर जा सोडणार्‍या साथीचा आधार नको परत परतण्याचा विचार नको ह्रदयावर नवीन वार नको हे तर खासचं!!