(येस , वी आर...)
काल अगदी असंच मला तो नेसकॅफेवर कॉफी पिताना भेटला
मी "मी पाटील" म्हणताच, "मी नातलग" काहीसं तो म्हटला
माझं सारं बोलणं तसं अगदी पुर्णपणे ईंग्रजीतून चालू होतं
तो मात्र मराठी आणि ईंग्रजी दोन्हींची काशी घालताना दिसला
माझ्याच वयाचा, पण "सार्या जगाचं ओझं माझ्या खांदयावर"
असं शब्दाशब्दाला भासवणारा, मला जरा तो आगाऊच वाटला
पोरगा नक्कीच सुखवस्तू अन खात्यापित्या घरातला असावा
"मोबाईल, गाडीचा" अभिमान त्याच्या चेहर्यावर होता साचला
म्हटलं माझ्या मित्रा, तू तेविसाव्या वर्षी आयायटीचा प्रोफेसर हो
अगदी त्या सिकंदरासारखं जिंकण्याची उर्मीही तुझ्यात असू दे
"Confidence. हा पुर्वी नव्हता..." असं मात्र नको बोलू रे राजा
"अहंकाराचा वारा न लागो..." आठव, ही अशी गुर्मी तुझ्यात नसू दे
तो "आयडॉलीजीम" की असंच काहीसं म्हणाला, मला ते कळेचना
पुढे बोलला, आम्ही मुक्त... आमचं पुर्ण विश्व घडवणार आम्ही
छानच आहे की, पण... "ही जिद्द, धाडस होतं की पुर्वी?" म्हणत
आधीच्या पिढयांच्या मेहनतीला, पायदळी तुडवणार का तुम्ही?
कुठल्या तामिळनाडूच्या पोरीला हेड बॉडी शिकवलं असेल, नसेल
तर फ्रँकनेसच्या नावाने अगदी बेंबीपासून शंख करत तो सुटला
वाटलं, कधी वाचले असतील का याने मुक्तेचे "ताटीचे अभंग"
ज्या चिमुरडीने ज्ञानाच्या जोरावर नामदेवाला गुरुचरणावर घातला
म्हणावसं वाटलं लेका, तु नशिबवान आहेस, फेसबूक मिळतंय
कितीतरी लेकरं अशी असतील, शंभरपानी वहीसाठी रडणारी
म्हणे "आमची माध्यमांची जाण" संगणक, मोबाईल अजून काही
गॅजेटची दुनिया तुझी, अशीही लेकरं आहेत रात्री उपाशी राहणारी
जरी "पोरं पोरीं" च्या गोष्टी करत पौंगडावस्थेतच अडकला आहे
तरी "कोहं" हा प्रश्न माझ्या त्या शहाण्या मित्रालाही पडला आहे.
भल्याबुर्याचीही जाण असावी त्याला, निदान वाटत तरी होतं
पण बहुतेक घोडा उगाचच पोक्तपणा दाखवल्यामुळे अडला आहे
मी सर्वज्ञानी आहे असं भासवणार्या या छोटयाशा नामदेवाला
देव नसेल तिथे पाय ठेव म्हणणारा एखादा गुरु भेटायला हवा
तसा फार हुशार आहे तो, पुढे जाईल, काहीतरी करुन दाखवेलं
फक्त त्याचा अहंकाराने काठोकाठ भरलेला घडा फुटायला हवा
याद्या
5423
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
हुच्च्च!!!!! भारी झालीय
ठ्या !
In reply to हुच्च्च!!!!! भारी झालीय by प्रभो
मस्त ...
+१
In reply to मस्त ... by छोटा डॉन
सुंदर
In reply to मस्त ... by छोटा डॉन
+१
In reply to मस्त ... by छोटा डॉन
फारच सुरेख
हा हा हा
दाद दिलीच पाहिजे!
जबरदस्त!!! आपण महागुरू आहात!
खरेच आहे. धनाजीराव विनायकाचा
In reply to जबरदस्त!!! आपण महागुरू आहात! by प्राजु
छानच हो धनाजीराव! मूळ
सुंदर आहे मुक्तक.
एक नंबर ! ! - टारझन कोच ,
वा वा वाकडे!
वाकडे बुवा,
धन्यवाद
पण बहुतेक घोडा उगाचच पोक्तपणा
छान..
मजा आली वाचून
+१
In reply to मजा आली वाचून by रणजित चितळे
अप्रतिम !
धन्यवाद...
अॅटिट्यूड
In reply to धन्यवाद... by धन्या
अॅटिट्यूड
In reply to अॅटिट्यूड by भडकमकर मास्तर
अगागागा धनाजीराव. मान गये.
प्रचंड आवडले !
लई भारी याचा काही चांगला
:)
मस्त
आपुन ने एकिच
मस्त
छानच हो धनाजीराव! मूळ
__/\_____/\_____/\_____/\____
जबरदस्त !
वाकडे साहेब, तुम्हीतर खुप सरळ-सरळ परखड आहात :-)