Skip to main content

आल्या पावसाच्या सरी -

लेखक विदेश यांनी शनिवार, 11/06/2011 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
आल्या पावसाच्या सरी - भिजू एकवार तरी ; ओल्या माती गंधासंग ... आणू प्रेमाला ग रंग ! नको साक्षी आणाभाका , पुरावा कशाला तो फुका - साक्ष ओल्या अंगांगांची पावसाच्या या सरींची ! प्रेम माझे तुझ्यावर तुझे किती माझ्यावर - सरींत मोजणी कशाला जीव कधीचा हरवला !

वाचने 1024
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

काल रात्रीच मोबाईलवर वाचली. मस्त आहे. आपले प्रेम व्यक्त करायला नायकाने पावसाच्या सरींचा आधार योग्य रितीने घेतला आहे.