मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्द ..!!

प्रकाश१११ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
शब्द कसे अलगद उतरत असतात मनामध्ये कधीही ,केव्हाही अचानक ....! तेव्हाच त्यांना बंदिस्त करावे लागते नाहीतर ते उडून जातात पाखरासारखे त्याना बघावे मनात पसरताना हलके हलके फुलताना शब्दाना अनेक अर्थ फुटत जातात तेव्हा ते काळीज कोरून जातात काळजात ते जपून ठेवावे लागतात नाहीतर ते हरवून जातात .... कसे रुमझुमत येतात शब्द ..... जेव्हा मन असते फक्त निशब्द शब्द शब्द झेलून घ्यावा जेव्हा वाटतो शब्द नवा तेव्हाच शब्दांच्या सरीत भिजून जावे जमले तर गाणे गावे गाता गाता एक होईल एखादी कविता गिरकी घेऊन गाणे गाईल .....!! कसे अलगद शब्द उतरत असतात मनामध्ये त्यांना फक्त बघत बसावे ....! नि हलकेच त्याना कवेत घ्यावे ....!!

वाचने 1589 वाचनखूण प्रतिक्रिया 8

मिसळलेला काव्यप्रेमी 09/11/2011 - 10:43
सुंदर रचना. आवडली.

विदेश 09/11/2011 - 15:21
कविता प्रसूती आनंद भावना छान शब्दात उतरल्या आहेत.

परिकथेतील राजकुमार 09/11/2011 - 15:32
पद्यरचना आवडली हो मालक.
शब्द कसे अलगद उतरत असतात मनामध्ये
कसे रुमझुमत येतात शब्द ..... जेव्हा मन असते फक्त निशब्द
हे विशेश आवडल्या गेले आहे.