Skip to main content

वारकरी होऊ -

वारकरी होऊ -

Published on रवीवार, 06/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
वारकरी होऊ पंढरीस जाऊ पाहुनिया विठ्ठला आनंदात न्हाऊ |१| टाळ चिपळ्यांचा घुमवीत नाद एकमुखे घालू माऊलीस साद |२| मालदार कोणी झोळीवाला कोणी पताका उंचावून विठू एक जाणी |3| जनी नामा गोरा चोखा रोहिदास नाही दुजाभाव सर्वामुखी घास |४| ओळख ना पाळख नका दूर लोटू जीव लावूनिया पंगतीत भेटू |५| भेटू एकमेका जाऊ देवळात संत सज्जनासंगे दंगू कीर्तनात |६| लोभस मुद्रा कर कटीवर मूर्ती विठ्ठलाची शांत विटेवर |७| विठ्ठल विठ्ठल गजर टाळ्यात चंद्रभागा वाहते माझिया डोळ्यात |८| विठ्ठल विठ्ठल जप मनीध्यानी कर्तव्यात लाभ मन समाधानी |९|
लेखनविषय:

याद्या 1036
प्रतिक्रिया 3

अजून येऊ दे. -दिलीप बिरुटे