हल्ली मी लिहीतच नाही .....
हल्ली मी लिहीतच नाही .....
हल्ली मी लिहित नाही
शब्दांची उधळण झेपत नाही
बोचरे शब्द व तुटक्या भावना ...
म्हणून मी कागद आता शोधतच नाही ....
हल्ली मी लिहीतच नाही .....
मनात राहून गेलेले
अस्फुट काहीतरी .....
कवितेमध्ये कधी उमटलेच नाही ....
भावना कमी पडली कि प्रतिभा
याचा विचार आता करतच नाही ...
हल्ली मी लिहीतच नाही .....
काही आठवणी खरडल्या खुळ्या
त्याच मग घेऊन गेल्या टाळ्या.....
हसता हसता पण
रडणे कधी जमलेच नाही ......
हल्ली मी लिहीतच नाही .....
लिहायला घेतले कि आता पाऊस येतो
इतका बरसतो कि कागदच ओला होतो
चिंब डोळे पुसले तरी
आठवणी पुसणे जमतच नाही ......
हल्ली मी लिहीतच नाही .....
लेखनविषय:
याद्या
3149
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
व्वा व्वा क्या बात ! क्या बात
सुंदर
अप्रतिम...
कविता/मुक्तक
हल्ली...
अतिशय आवडले !
छान
लिहायला घेतले कि आता पाऊस
सुंदर... अप्रतिम रचना
क्लास्स्स्स्स. अम्मळ जास्तच
मस्त!
छान
सुंदर कविता लिहायला घेतले कि
अव्वल !!! माणगये उस्ताद....