लेखक प्रकाश१११ यांनी रविवार, 04/12/2011 16:28 या दिवशी प्रकाशित केले. ती खरी का मी खरा ..? हे कधी कळलेच नाही शब्द तिचे नि शब्द माझे सूर कधी जुळलेच नाही हे न माझे हे न तिचे हे कधी वळलेच नाही रंग माझे रंग तिचे मिसळणे जमलेच नाही ती अशी नि मी असा चिंब कधी झालोच नाही ती खरी का मी खरा ..? हे कधी कळलेच नाही . काव्यरस करुण लेखनविषय: कविता वाचने 907 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया छान मिसळलेला काव्यप्रेमी सोमवार, 05/12/2011 13:13 आवडली.
प्रतिक्रिया
छान
आवडली.