Skip to main content

चेतना

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 04/12/2011 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
विस्तीर्ण नभावर मेघदळे घनदाट पवनास न बंधन धावतसे फुंफाट क्षितिजास फडकल्या भोर ध्वजा कनकाच्या नांदी दिवसाची उगवे रमल पहाट तिमिरास किनारी कांचनमय अल्हाद भरल्या अंबरभर पुन्हा नव्या अभिलाषा तो अथक प्रवासी चाले आपली वाट पल्लवीत कुसुमे जीवन; नवओघात सृजनाचे दालन; उमले रोज प्रभात चेतना सकल हृदयात; चेतवी वात दुरितांस ऊब तरुछाया कधि अपघात चिरअनंत चाले योगभारला संवाद मी अंश तयाचा आक्रमतो एकांत विसरतो कसा मग मावळणे अभिजात जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात ............................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 980
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मी अंश तयाचा आक्रमतो एकांत विसरतो कसा मग मावळणे अभिजात जे ज्यास हवे ते द्यावे आपल्या हातांनी उत्तुंग वागणे राहिल चिरस्मरणात
__/\__

सुंदर ! ( नवीनवखी यांची 'मन' वाचल्यानंतर , वाचण्याच्या क्रमामध्ये फार अ‍ॅप्रॉप्रिएट वाटली ).