मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मेरा कुछ सामान... भावानुवाद.

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तुझ्यापाशी ठेवलेले काही जपून अजून. चिंब चिंब भिजलेले श्रावणाचे काही दिन.. एक रात्र थांबलेली पत्र माझे पांघरून, रात्रीला त्या विझवून दे ना सारे पाठवून.. ऐकतोस ना रे तूही पाचोळा हा वाळलेला? नाद त्याचा एकदाच कानांमध्ये माळलेला.. शिशिराची एक फांदी हलताहे रे अजून, तीच डहाळी मोडून दे ना सारे पाठवून.. छत्री एकुलती एक, दोघे अधमुरे ओले कोरडे वा चिंब थोडे. सुके तर माझ्यासवे; उशापाशी भिजलेले राहिले का माझे मन? आवरून सावरून दे ना सारे पाठवून.. अगणित चंद्रवेळा.. एक तीळ खांद्यावरी.. मेंदीओला दरवळ.. रुसवे ते कितीतरी, आणि अनेक वचनं खरीखोटी भासणारी.. बघ तूही आठवून दे ना सारे पाठवून.. पाठवशी जे तू सारे मृण्मयी ते करण्याची, दे ना मला अनुमती डोळे तिथे मिटण्याची..

वाचन 16173 प्रतिक्रिया 0