Skip to main content

पुन्हा नव्याने..

आनंदमयी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनविषय:
पुन्हा नव्याने फुलती स्वप्ने पुन्हा नव्या उलगडती वाटा पुन्हा नवी अधरांवर लिहिली नाविन्याची लोभस गाथा अस्तित्वाचा नवा अर्थ अन् जगणे सारे नवेच झाले बुरसटलेले पाश तोडुनी नवे पाखरू नभी उडाले... नव्या नव्याची नवलाई ही व्यापुन घेते सारे जीवन नव्या नभीची नवीन बिजली छेदून जाते जुने कृष्ण घन नव्या सुरांची नवी भुपाळी नवी सुगंधी पहाट गाते अधीर राधा पुन्हा नव्याने श्यामनिळ्याची होऊन जाते!! © अदिती जोशी 11.6.13
मिसळलेला काव्यप्रेमी

सुरेख रचना... पुलेशु
20/10/2013 - 19:53 Permalink
आनंदमयी

माझी ही इथे पोस्ट केलेली पहिलीच कविता ...तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रीया वाचून आनंद झाला! धन्यवाद!!
20/10/2013 - 21:39 Permalink
इन्दुसुता

आवडली. तुमच्या आणखी कविता वाचायला आवडतील.
21/10/2013 - 08:50 Permalink
आनंदमयी

In reply to by इन्दुसुता

आपणास माझी कविता आवडली हे वाचून आनंद झाला!! माझ्या आणखी कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लॉगला http://unaadpaus.blogspot.com अवश्य भेट द्या अदिती जोशी
21/10/2013 - 10:09 Permalink
ज्ञानोबाचे पैजार

अतिशय आवडली. नवी स्वप्ने जुनी झाली की पुन्हा नव्याने नवी स्वप्ने पहायची हा क्रम अव्याहत सुरु ठेवायचा न संपणार्‍या गोष्टी सारखा न थकता,न कंटाळता,न वैतागता जो पर्यंत कुडीत प्राण आहे तो पर्यंत
22/10/2013 - 10:17 Permalink