Skip to main content

कविता

मित्रा

लेखक तुषार जोशी यांनी गुरुवार, 23/10/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रा मी पहिला श्वास घेतला तेच महानगरात आणि.. तू पहिला श्वास घेतलास गावात...

ज्याचे त्याला कळले

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिलेदार धारातीर्थी बालेकिल्ले ढळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले तरातरा निघालेले पुन्हा मागे वळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले बेघर होतील आता जे पंधरा वर्ष रुळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले पीळ बघूया जाईल का सुंभ मात्र जळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले शुभ्र कपड्यांमागचे रंग खरे उजळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले आहे नव्याची आशा संकट परी ना टळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले मतदाराचे कौतुक की कर्तव्य त्याला कळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले - अ ज ओक

प्रेमही जरुरीपुरतंच करावं...

लेखक अजब यांनी गुरुवार, 16/10/2014 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं... व्यसन कोणतंही वाईटच... आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते, मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स आणि सर्वांत भयानक म्हणजे एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची आधी चटक आणि मग सोबत... प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून आहारी जाऊ नये...

कोवळीक

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 16/10/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळीक आताशा आयुष्यात माझ्या येवून जा आलास कधीतरी तेव्हा चांगला राहून जा तुझीच वाट पाहते कधीची आर्त पाण्यासाठी तगमगलेली कितीदिवस म्हणते मी ही वाट पहायची कधी भ्रमही होतात तू पुन्हा आल्याची फुले तर तर भरपुर निघाली पण अजूनही आस आहे फुलायची - पाभे

तवंग

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 13/10/2014 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच चंद्र सतत हरवतो तुझ्या आभाळी कोसळणारे गढूळ धबधबे कडेकपारी झडणारा मी वसंत टपटप अश्रूंमधला ओळी कातर उल्लेख पानभर व्याकुळ शाई बंद पापण्या तवंग मणभर साचवलेले हिरव्याकंच जखमांचे वैभव मन शेवाळी
काव्यरस

पोहे

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 13/10/2014 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसा पुर्वि एक कविता मीपा वर वाचली निट आठवत नाहि पण ति कल्पना जाम आवडली व त्या नुसार कविता ्लिहावि असे वाटत होते "येथे उपासाच्या कचोर्‍या मिळतील..असे काहिसे शब्द होते कविता आवडल्यास त्याचे श्रेय त्या अज्ञात कविस व त्याच्या कल्पना शक्तिस. ========================================= पोहे पृथ्वीच्या अर्धगोलाकार आकाराची कढई... खाली सहस्र सूर्य ओकतोय अशी आग तापलेलेल्या रिफाइंड तेलाच्या डोहात मोहरीचे, ब्रह्मांडात अणू रेणूचे चालते तसे तडतड नर्तन साथीला हिरव्या मिरच्या व कढीपत्त्याचा व्योमास भेदणारा चर्र्र्र असा नाद कांदे व बटाट्याचे काप व रुद्राचा हळदीचा भंडारा सूर्याच्या रक्तिमा सारखे लाल तिख

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता

लेखक संजय क्षीरसागर यांनी गुरुवार, 09/10/2014 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थ बाजूला ठेवून, पहिल्यांदा हृदयनाथांनी गायलेलं हे कमाल गाणं (पुन्हा एकवार) ऐकू. अत्यंत गोड आवाज, कवितेला साजेशी, मुख्य म्हणजे ग्रेसच्या लयकारीच्या नखर्‍याला जराही धक्का न लावणारी चाल आणि कमालीची दिलकष शब्दफेक! खरं तर ग्रेसच्या इतक्या सुंदर कवितेचं `गाणं' झालं नसतं तर कदाचित, ती चर्चेचा विषय झालीही नसती.

मी लोकलयात्री

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 08/10/2014 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी लोकलयात्री स्टेशनावरी उभा ठाकतो ट्रेनागमना पुढे वाकतो युद्धासाठी सज्ज जाहतो मी लोकलयात्री गर्दी बघता चमकून जातो तरीही क्षणात मी सावरतो मग अंगीचे बळ जागवतो मी लोकलयात्री बसण्या जागा मृगजळ जरी उभे रहाण्याचे बळ जरी ट्रेन रिकामी बघून हर्षतो मी लोकलयात्री एकच गलका उडे क्षणातच कुणी कधीचे कुठे क्षणातच मेंढरापरी गर्दीत घुसतो मी लोकलयात्री नवे चेहरे रोज पुढ्यात नवे वास मम नाकपुड्यात रोज नव्याशी जुळवून घेतो मी लोकलयात्री चहूदिशांनी दाब प्रचंड अस्तित्वाचा लढा अखंड अपुली आपण खिंड लढवतो मी लोकलयात्री स्टेशन येते स्टेशन जाते गर्दी तरीही वाढत जाते 'सरणार कधी हे' म्हणत राहतो मी लोकलयात्री

पत्र

लेखक अजब यांनी बुधवार, 08/10/2014 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवसांपासून तुला पत्र लिहायचं ठरवत होतो... आधी विषय सुचत नव्हता मग वेळ मिळत नव्हता शिवाय 'न लिहिण्याची' झालेली सवय आणि आळस- अशा एक ना अनेक सबबी... पूर्वी पत्रांना गंध असायचा आणि अक्षरांत ओलावा न लिहिलेला मजकूरही दिसायचा लिहिणार्‍याचा चेहरा आणि बोलण्याचा आवाज वाचता-वाचता उमटायचा... इतकंच कशाला; ते आलेलं पाकीट उत्सुकतेने फोडायचं वाचलेलं पत्र पुनः पाकिटात आणि पाकीट वही, पुस्तक किंवा डायरीत ठेवून वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या मूडमधे वाचायचं पत्रांची साठवण- एक खजिनाच असायचा... खरं आहे; पत्र लिहिणं आता 'सोयिस्कर' नाही राहिलं वेळ, कागद, पेन काढणं स्वतःच्या अक्षराबद्दल चडफडणं आणि खाडाखोड झाल्याव

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.