एक उदास कंटाळवाना चेहरा
पाने गळू लागलीत झाडांची
हवा वाहत असते नको तितक्या वेगाने
थरथरत राहतात त्याच्या खिडकीवरचे पडदे
दरवाजा बंद असला तरी हवा टकटकत बसते दारावर
एक उदास वातावरण झपाटून टाकते मनाला
बाहेर प्रकाश असून अंधारून गेलेला
दिवसा देखील कानांना येत राहतो रातकिड्यांचा आवाज
उगाचच एखादं पाखरू वळचणीला
एखादं पान गळणा-या फांदीवर घट्ट बसून रुतलेलं
काळ्या काळ्या फांदीच्या बोटाना धरून बसलेलं
आवळून टाकलाय गळा आपल्या निष्टुर हातानी
तरीही तो स्वताला ढकलीत रहातो पर्णहीन झाडाची पायवाट
अंगावर शिरशिरी
नि नाक झडून गेल्याचा भास
तळे शुभ्र एक उदास तवंग त्याच्या अंगावर
मृत होताना ताठरून जाते जसे एक
मिसळपाव