Skip to main content

कविता

चार अपशब्द

लेखक पदकि यांनी मंगळवार, 17/02/2015 03:54 या दिवशी प्रकाशित केले.
(जसे: दाखव विठ्ठला / तुझे देवपण नाहीतर घण/ आहे माझा : विंदा करंदीकर ) खुल्या नभाखाली/ उभा मी नागडा बोल तो रांगडा / सुनावितो असे काय मोठे / देवा तुवे दिल्हे ? आई-बाप नेले/ मृत्युलागी साऱ्या सजीवांना / वेदना नि कळा रक्त भळाभळा / वाहते ते सर्वत्र ही मृत्यू /घालितो थैमान सोडीला हैवान / मोकळा तो. धाडिले "प्रेषित"/म्हणे सात-आठ त्याने काय xट/ बदलले? साऱ्या सजीवांना / बनविसी हीन होती मग दीन/ पायी तुझ्या . आम्हा सजीवांना / करी जे भिकारी ब्रम्हाची शिसारी/ नाकी माझ्या माझ्या आयुष्याचा / स्वामी मी बारका "पोर तो पोरका" / तुझा नाही. अटळ तो मृत्यू / सर्वांच्या राशीत घाल ते कांशीत / जग तुझे! :
काव्यरस

कॉफ़ी

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 16/02/2015 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
कॉफ़ीत एक नशा असते... ती कधी एकट्याने.. तर कधी दुकट्याने..

आत्म"मुक्ति!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/02/2015 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या आत्म्याला मुक्त मी केले जरी बोलतो माझ्या सवे तो मुक्त तू केंव्हा तरी??? प्राण जातो ज्या कुडितून त्यास का मुक्ति म्हणा? मरण येते परत जनना हाच त्याचा पाळणा. मी विचारी हाय मृत्यो मुक्तिही मजला कुठे? पानंगळं ही तव प्रवाही वाहते..!,सुटते कुठे??? तू न माझ्या अंतरिही मंदिरीही तूच तू. शरिर मिळते त्या निसर्गी बदलता..तू ही ऋतू! सांग मृत्यो खरी मुक्ती तू कधी देशिल का? जर दिली तर तू कधिही..,मृत्यू तरं असशील का? मृत्यू म्हणतो हाय आत्म्या सोडूनी जाऊ नको.. निसर्गाच्या परमं आत्मी तू तिथे राहू नको. अरे तुम्हा तशी मुक्ति देण्यास का रे सांगता? तुम्हा मुक्ति मिळे जेंव्हा होईल माझी-सांगता. मी म्
काव्यरस

चॉकलेटचा बंगला ऽऽ

लेखक पद्मश्री चित्रे यांनी रविवार, 15/02/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
चॉकलेट चा बंगला अजून आठवतो का हळूच मनात खरं खरं सांगा बरं गोष्ट राहील आपल्या आपल्यात... लहानपण जर जपलं असेल . बिस्किटांची गच्ची दिसेल टॉफीच्या दारामधली झुपकेवाली खार दिसेल ... लेमनच्या खिडकीमधून . उंच उंच झोका दिसेल झोक्यावर बसलात तर मैनेचा पिंजरा दिसेल चॉकलेट डे च्या दिवशी आज पुन्हा ऐकदा बंगला दिसला तुझीच वाट पहात होतो असं म्हणून हळूच हसला ... चॉकलेट च्या या बंगल्यामध्ये तुम्ही सुद्धा जाऊन या बालपणीच्या आठवणी त फेरफटका मारून या!
काव्यरस

मले माईतच नाई...

लेखक ऊध्दव गावंडे यांनी शनिवार, 14/02/2015 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
असं कसं होते मालं मले कयतच नाई तसं झालं तरी काई मले माईतच नाई नेतो नाल्या वरं ढोरं मी पानी दाखोयाले धुनं धूते तथी कशी मले माईतच नाई डाबडुबली खेयाले म्हून आंब्या खाली जातो तिची रखवाली तथी मले माईतच नाई गुळं फोळला दुपारी ढोरं हकल्याले जातो ढोरं हायेतं तिचेचं मले माईतच नाई संद्याकाई ईरीवरं पानी भर्यासाठी जातो नस्ते तिच्या जोळं दोरं मले माईतचं नाई यकं दिसं बुडा म्हने तुयं लगन जुळलं माई नौंरी केलं तिले मले माईतचं नाई तसं झालं काई तरी मले माईतचं नाई शब्दार्थः नालाः नदी पानी दाखोयालेः पाणी पाजण्या साठी डाबडुबलीः आंब्या च्या झाडावर खेळायचा खेळ रखवालीः watch ग

"जेसन आणि बोलती बेडकी"

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 05:59 या दिवशी प्रकाशित केले.
सिलिकॉनदरीत/वसे तो जेसन शिका हा लेसन / तरुणींनो त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त संगणकी रक्त/ खेळतसे रस्त्याने चालता / एका प्रात:काली बेडकी बोलली / शेजारून "अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही बेडकाचे देही/ शापग्रस्त मला उचलून / स्वगृही नेशील आणिक घेशील / चुंबन ते प्रगटेल माझे / मानवी शरीर "कामा" स उशीर / मग नाही जन्मभर तुझी/ होईन मी कांता आनंदा अनंता/ मुकू नको " जेसनने तिला / मग उचलले आणिक ठेविले / खिशामाजी घरामध्ये तिला / दिले छोटे घर खायलाही चार / किडे बिडे आठवडे झाले/ कित्येक दिसांचे पण चुंबनाचे / नाव नाही बेडकी अखेर/ झालीसे हताश स्वरात निराश / प्रश्न करी "अरे प्रिय म
काव्यरस

मोज्यांचे दालन

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीगोलाच्या पोटात अगदी मध्यावर एक विस्तीर्ण दालन आहे ज्यात सर्व हरविलेले मोजे जातात. त्यांचा प्रतिदिन वाढणारा ढीग पाहून देव कपाळाला हात लावतो. एकाही मोज्याची जोडी हजर नसते. तुम्ही जर तुमच्या लाडक्या मोज्याची जोडी शोधत बसाल तर एक अब्ज वर्षे लागतील. या वरून हे सिद्ध होते की मानवाच्या दोन बाजू सारख्याच असल्या पाहिजेत हा नियम निसर्गालाही मान्य नाही. पुरुषांनी दोन वेगळे मोजे घातले तर बायकांनी त्यांस हसू नये असा नियम करता येईल.पुरुषांनीही हसू नये (पुरुषांना). बायका असे होऊ देतच नाहीत. बहुधा त्या एकाच प्रकारचे शेकडो मोजे विकत घेत असाव्यात. हुशार असतात. xxx Milind Padki

श्यामसुंदर मुळे सरांचा शब्द-मेध यज्ञ

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
थेट रात्रीचे नऊ वाजता हजारएक हात इमेल बघायला स्तब्ध असताना मुळे सर पोतडीतून आज मारायचा विजयी शब्द काढतात प्रमाथी,दुरंत,अक्षुन्ण किंवा ग्रामीणपणे यंग्राट,अत्रंग,आडभंग एक मिनिटात अर्थ सांगणे दूरच,मात्र काही स्त्रिया त्यांच्या शब्दांनी कामोत्तेजित होतात व सर्व पुरुष खजील, असे मानले जाते. शब्द-घोडा दुबईतील इंजिनियर,अमेरिकेतील संगणक-अभियंते, दिल्लीतील भाग्यनियंते, लंडन-मधील वेटर्स पर्यंत जाऊन न मरता परत येतो, एक मिनिटात सर पुढची इमेल पाठवितात: 'हात रांडेच्च्यो" कॉम्प्युटर बंद करतात, आणि विजयी मुद्रेने आपल्या वांगणी (चोराची) या गावी झोपी जातात. उद्याचा घोडा मनात हळूहळू आकार घेऊ लागतो. xxx : मिलिंद

नकोच सोने हिरेजवाहिर -स्वप्नमयकल्पना आणि बदललेल्या काळातील लाकूडतोड्याची गोष्टीचे वास्तव

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 12/02/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
लाकूडतोड्याची गोष्ट या संजीव खांडेकर यांच्या दीर्घ कवितेचा संक्षेप एका संध्याकाळी एक लाकूडतोड्याटाईप गरीब इसम एका नदीकिनारी आपले कपडे धूत होता. ....... तर घाईमुळे धुता धुता अचानक त्याच्या हातून त्याची 'स्किन' निसटली आणि नदीच्या वाहत्या प्रवाहात लांबवर वाहून जाऊ लागली. पोहता न आल्याने व एकुलती एक 'स्किन' वाहून गेल्याने आता आपल्याला नागडेच राहावे लागणार नागडेच शहराकडे परतावे लागणार या जाणिवेने लाकूडतोड्या शहारला ..... तू कशाला काळजी करतोस?" एवढे म्हणून भगवान स्वतःच नदीच्या पाण्यात उतरले. एका डुबकीतच त्यांनी निळ्या रंगाची, नवीकोरी, लेबलसहित असल

<<<< चालचलाऊ मिपा>>>

लेखक जेपी यांनी गुरुवार, 12/02/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा जेपी म्हणे' गा मिपादेशी | या लिखाणाची ऐशीतेशी, बेहतर आहे एका लेखाशी| पण लिहीणार नाही. खड्यात जावो ही लिखाई| आपल्याच्याने होणार नाही. समोर सारे हुशार बेणे|विजींनीयर डागटर ऐणे, काखे वही,हाती पेन| डायरी माझ्या लिहीण. पण हा कुठला कंपुपणा| आपसात चर्चा कुदवती. या लोकांना नाही उद्योग |गायब झाले सगळे लोग. लेंकानो लिहाना रोज |वाचुन तेच तेच बोर झालो. लिखाई का असते सोपी| रोज कळफळक बडवती , कित्येक लेकाचे आयटी | मेगाबायटी प्रतिसाद देती, मिपा म्हणे 'जेपुना | हा कुठला बे पळपुटेपणा ? पहिल्याने तर टणाटणा | उडत होता लिहाया, मारे धाग्यावर बैसला | प्र