Skip to main content

श्यामसुंदर मुळे सरांचा शब्द-मेध यज्ञ

लेखक पदकि यांनी शनिवार, 14/02/2015 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
थेट रात्रीचे नऊ वाजता हजारएक हात इमेल बघायला स्तब्ध असताना मुळे सर पोतडीतून आज मारायचा विजयी शब्द काढतात प्रमाथी,दुरंत,अक्षुन्ण किंवा ग्रामीणपणे यंग्राट,अत्रंग,आडभंग एक मिनिटात अर्थ सांगणे दूरच,मात्र काही स्त्रिया त्यांच्या शब्दांनी कामोत्तेजित होतात व सर्व पुरुष खजील, असे मानले जाते. शब्द-घोडा दुबईतील इंजिनियर,अमेरिकेतील संगणक-अभियंते, दिल्लीतील भाग्यनियंते, लंडन-मधील वेटर्स पर्यंत जाऊन न मरता परत येतो, एक मिनिटात सर पुढची इमेल पाठवितात: 'हात रांडेच्च्यो" कॉम्प्युटर बंद करतात, आणि विजयी मुद्रेने आपल्या वांगणी (चोराची) या गावी झोपी जातात. उद्याचा घोडा मनात हळूहळू आकार घेऊ लागतो. xxx : मिलिंद पदकी
लेखनविषय:

वाचने 1468
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हे सर, म्हणजे बार्शी गावचे नावाजलेले शिक्षणकतज्ज्ञ तर नव्हेत....