पाऊस....तो ....
वैशाख वणवा मनांत माझ्या, दोन पावसाळे आले,
येउनी त्यांनी जीवनी मला, अर्थी दोन्हीं भिजवले !!
कोसळत्या सरीबरोबर रूप , सखये असे बरसत गेले,
तुला स्वतःत सामावताना , आकाश हाती आले !!
वैशाख वणवा मनांत माझ्या ..............
कुंतलात मुख अवचित, मेघ दाटुनी आले
स्वर्गसुखास करीत खुजे, तेंव्हा भूमिगंध बरसले !!
त्या वर्षावास जसे मी , तुझ्याबरोबर अनुभवले,
थांबता पाऊस ते दु:खही, मी मदिरेसवे रिचवले !!
तळ्याकाठी रडे प्राजक्त, मुकी का सान झुले,
बहारही मग सोडी धर्म, विषन्न पाने फुले !!
वैशाख वणवा मनांत माझ्या ..............
तोही बरसला पाऊस, मन ज्याला न विसरले,
पहिल्यासवे त्याचेही , हृदयाने स्वागत जंगी केले !!
मिसळपाव