सिलिकॉनदरीत/वसे तो जेसन
शिका हा लेसन / तरुणींनो
त्याच्या डोक्यामध्ये / आज्ञावली फक्त
संगणकी रक्त/ खेळतसे
रस्त्याने चालता / एका प्रात:काली
बेडकी बोलली / शेजारून
"अरे राजपुत्रा/ राजकन्या मीही
बेडकाचे देही/ शापग्रस्त
मला उचलून / स्वगृही नेशील
आणिक घेशील / चुंबन ते
प्रगटेल माझे / मानवी शरीर
"कामा" स उशीर / मग नाही
जन्मभर तुझी/ होईन मी कांता
आनंदा अनंता/ मुकू नको "
जेसनने तिला / मग उचलले
आणिक ठेविले / खिशामाजी
घरामध्ये तिला / दिले छोटे घर
खायलाही चार / किडे बिडे
आठवडे झाले/ कित्येक दिसांचे
पण चुंबनाचे / नाव नाही
बेडकी अखेर/ झालीसे हताश
स्वरात निराश / प्रश्न करी
"अरे प्रिय मित्रा/ चुंबनाचे काय
धरिते मी पाय/ आता तुझे.
कर मला पुन्हा/ अरे अहंमन्या
सुंदर ती कन्या/ लवकर
देईन तुजला / असा कामानंद
सोड बाकी छंद / कुचकामी"
ऐका तरुणींनो / काय तो वदला
संगणकामधला / अभियंता
"नव्याने मिळाला / मला हा प्रोजेक्ट
कोटींचे बजेट / डॉलरचे
मरायला इथे/ मला नाही वेळ
चुंबनाचे खेळ / कशासाठी?
किडे बिडे देतो/ सुखामध्ये रहा
समोरचा पहा / टीव्ही सुद्धा"
रागाने मग ती / बेडकीही कापे
आणिक संतापे/ प्रश्न करी
"विवाही जीवन / मनात नव्हते
आणले ते येथे / कशासाठी?"
जेसन वदला / "कारण असे की
बोलती बेडकी /दुजी नसे "
----
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2630
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
हम्म
!!!
धन्यवाद!
In reply to !!! by स्पंदना
मी ऐक जेसन ….
मी ऐक जेसन ….
In reply to मी ऐक जेसन …. by पगला गजोधर
थान्क्स टू यु !
In reply to मी ऐक जेसन …. by पदकि
हे राम!
+१
In reply to हे राम! by अजया