Skip to main content

कविता

कविता — मिसळपाववरील मराठी कवितांचा विशाल संग्रह. प्रेम, निसर्ग, समाज, विरह आणि जीवनानुभव यांवरच्या हजारो मराठी कविता, गझल, मुक्तक आणि चारोळ्या येथे वाचा व आपली कविताही प्रकाशित करा.

घराचे व्हर्चुअल व्हर्जन!

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 24/02/2015 21:38 या दिवशी प्रकाशित केले.

घराला,
आईची मुळाक्षरे
बापाच्या शिरोरेखा
आज्जीची जोडाक्षरे
आजोबांचे अनुस्वार!
घराला,
बहिणींची चन्द्रबिंदी
भावड्याचा काना
चुलत्यांचे रफार
सावत्रांचे विसर्ग !
घराला,
मुलाबाळांचे स्वल्पविराम
भाच्यांचे अर्धविराम
नवर्यांचे प्रश्न, अन
बायकांच्या मात्रा!
घराच्या पुस्तकाला आता
आठवणींचे कव्हर!
हार्डबाउंड पुस्तकाचे मग
व्हर्चुअल व्हर्जन!

काव्यरस

प्रेमाचिया वाटे

लेखक किरण कुमार यांनी मंगळवार, 24/02/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.

काढूनिया वेळ, घालूनिया मेळ
खावयाची भेळ, सारस बागेची !!

घेवूनिया गाडी, करु मजा थोडी
असेल जरी जाडी, मैत्रिण आपूली !!

कोण असे शत्रू, कशासाठी भित्रू
पाळलेले कुत्रू, मैत्रिणीचा भाऊ !!

सौदा करु सस्ता, सिंहगड रस्ता
खावूनिया खस्ता, झुडूपाआड !!

किती प्रेम मोठे, खर्चालाच तोटे
आपटूनी डोके, आवरते घ्यावे !!

घेवूनिया कात्री, बदलावी मैत्री
दोन पॅक रात्री, घेवूनिया !!

प्रेमाचिया वाटे, टोचतात काटे
तरी जोश दाटे, उठल्यावरी !!

रुसलेले शब्द

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 23/02/2015 23:34 या दिवशी प्रकाशित केले.

शब्द माझ्यावर रुसलेत...
बहुतेक कोप-यात लपलेत.
शोधून त्यांना दामले;
मीच फ़ुरगटुन बसले!

वाटल येतील सोबतीला...
फुगा फोडतील मनातला...
वाट पाहून थकले;
ते अजुनही लपले.

लिहायची होती एक शायरी...
निदान एक इटकुली नज्म तरी..
बहुतेक त्यांना वाटल...
हिला जमणार कुठल?

त्यांच ही बरोबरच आहे;
नज्म-शायरी... अपना बस कुठे?
नाद मी सोडून दिला...
शब्दांनी परत हात दिला!

रुसवा

लेखक ऊध्दव गावंडे यांनी सोमवार, 23/02/2015 00:41 या दिवशी प्रकाशित केले.

बरं नाई हे रुसनं
मुकं मुकाट बसनं
डोया भिळूनं डोयातं
थोळं गालात हासनं

असा कसा हा रुसवा
होटं टाकला शिऊनं
नको धरुस अबोला
देतं काऊनं भिऊनं ?

लाली दिसते साजरी
तुह्या फुगल्या गालाची
कायं फिकीरं सांगना
तुले माया या हालाची ?

अशी लाळा ची तू मैंना
तयं हातावर्ला फोळं
लाऊ जीवं मी कितीकं
सांगं कायं तुले थोळं ?

बस्सं झालं पुरं झालं
चाल्ला जीवं खोलं खोलं
देनं सोळूनं रुसवा
आता बोलनं गोळ गोळं

प्रेमाची भाषा

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 20/02/2015 08:38 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेमाची दोघांचीच अशी भाषा असते...
झुकलेल्या पापण्यात ती हळुवार रुजते...
शब्दांशिवाय नकळत हृदयात उतरते...
दोघांच हितगुज दोघांना सांगते!

कधी ती कविता होते..
शब्दातून कागदावर उतरते...
कधी गुलजार.. कधी जगजीत.. कधी मेहँदी हसन बनते;
लता-आशाच्या गळयातुन... ए. आर. रेहेमानच्या संगीतातुन...
अशीच ती घरंगळते;
दोघांच हितगुज दोघांना सांगते...

प्रेमाची भाषा स्पर्शातुन फुलते;
तरीही तिला शब्दांचे ख़त-पाणी लागते...
मग ती रुजुन, बहरुन, उमलते....
दोघांचे हितगुज दोघांना सांगते!

काव्यरस

अंधार

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 20/02/2015 07:59 या दिवशी प्रकाशित केले.

एकटाच आहे, असतो आणि राहणार तो
त्याला त्याची ना सावली, ना प्रतिबिंब
ना कसला डाग, ना कुठला बट्टा
सदा एकटाच, पण शाश्वत, निर्मळ
.
जेव्हा कुठे कोणीही, काहीही नसते,
तिथे तो आपले हातपाय पसरतो..
मस्त राहतो..
.
तोच त्याला घेरुन राहतो
अन् तोच त्याच्यात भरुन राहतो
पण शांत शांत,
एकटा जरूर आहे पण एकाकी नाही
तोच त्याचा सोबती, तोच त्याचा सवंगडी
.
तिन्ही लोकात स्वैर संचार त्याचा
त्याला आमंत्रण नाही लागत
आगत स्वागत नाही लागत
तुम्हाला त्याची गरज असेल तेव्हा
तोच येतो तुमच्याकडे
तुम्हाला कुशीत घेतो
त्याच्यातली शांतता

नाटक

लेखक पदकि यांनी शुक्रवार, 20/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.

आयुष्याचे माझ्या | जाले जे नाटक
त्याचे हे फाटक | उघडितो
होतो (आणि आहे)| तसा मी सावळा
जनही बावळा | म्हणताती
रूप-हीन मुख| नसे मी देखणा
डोळ्याने चकणा/ थोडाफार
ऐसे कैसे रूप| कॉर्पोरेटी न्यावे
जनां न साहवे| माझी चिंता
अरे जरा शर्ट| पॅंटीमघ्ये खोच
कशी नाही बोच | तुला मुळी?
केसही जरासे | बारीक कापावे
तेलही लावावे | स्नानोत्तर
पायी असू द्यावे| चामड्याचे बूट
घ्यावयास सूट| पैसा देतो
वगैरे इत्यादि | ठोकून ती मूर्ती
थोडीफार कीर्ती | मिळविली
कंपनीत झालो | थोडासा साहेब
लटका रुबाब | दिनरात्री
नोकर धावती | हुकुमात आज

गाठोडं

लेखक निलरंजन यांनी गुरुवार, 19/02/2015 23:28 या दिवशी प्रकाशित केले.

अंथरूणावर पडताना जाणवते मला अपेक्षांचे ओझे
तेवढेच जड झालेले चिंतेने भरलेले गाठोडे,

चिंता असतात रोजच्या जगण्यातल्या.
चिंता असतात न सुटलेल्या प्रश्नांच्या
चिता राहून गेलेल्या महत्वाच्या कामाच्या,

अपेक्षा असतात भविष्यातल्या प्रगतीच्या,
अपेक्षा असतात स्वप्नपूर्तीच्या,
अपेक्षा असतात उज्वल यशाच्या,

आशा दरवेळेस असते की उदया या सार्या चिंता सुटतील
स्वप्नातल्या वैभवावर प्रगतीचे इमले चढतील
सुख आपल्या पुढ्यात पायघड्या घालतील

वाटते देव दयावान होईल आणि चिंता माझ्या मिटतील
लाॅटरीच्या तिकिटासारखे सर्व प्रश्न झटक्यात सुटतील

"खरे सत्य बोला/ जपून जपून"

लेखक पदकि यांनी गुरुवार, 19/02/2015 04:40 या दिवशी प्रकाशित केले.

खरे सत्य बोला/ जपून जपून
तेज लपवून / ठेवा थोडे
अर्धोक्तीने करा / सत्य - सुरुवात
जनां भयभीत / करू नका
अंधाऱ्या अंबरी / विजेची उपज
बालकां समज/ नाही तिची
महा त्या तेजाने / अंधत्व नेत्रांना
साध्या माणसांना / कशासाठी?
क्षीण मानवाची/ क्षीण असे दृष्टी
प्रकाशाची सृष्टी / सोपी नसे
---

काव्यरस

"किंमत"

लेखक पदकि यांनी बुधवार, 18/02/2015 23:35 या दिवशी प्रकाशित केले.

कवितांच्या एका छोट्या पुस्तकाला
तीन मसाला डोशांची किंमत
तुम्ही द्याल काय ?
मला नाही वाटत!
प्रकाशकाला सांगून एका डोशातच
ते बसवायला हवे !
चार रंगीत चित्रे
कमी करा,
काय ?
: मिलिंद पदकी