आज मी आहे
आज मी आहे
त्या वळणावर उद्या तू असशील
झिरपत राहील झरा , उन्मळत राहतील उपळे,
तरीही तिथे पाणी शेंदायला कोणीच नसेल
ते तळे देखील आज विरक्त आयुष्य जगत असेल कारण
आज मी उभा तिथे _ उद्या तू असशील |
जुळतील धागे , मिळतील नातीगोती
बांधल्या जातील रेशीमगाठी
टाकली जातील बंधने संस्कृतीची
लादले जातील निर्बंध रूढी परंपरांचे
आपसूकच टाकले जातील नांगे
स्वतंत्र स्वभावाचे
कारण आज मी उभा ठाकलो आहे
त्या बंधनात _ उद्या तू असशील
मिसळपाव
ताजे...स्मायली जीवन माझे!
स्मायली...