Skip to main content

कविता

दिशाहीन

लेखक Vimodak यांनी गुरुवार, 23/04/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका ता-याचे तुटलेपण, रात्रीच्या काळ्या पलटावरून घरंगळत कोसळले. आपल्याच बांधवांच्या मैफ़िलितुन, निर्दयपणे निष्कासित तो झेपावला प्रलयाकडे. तेव्हा पृथ्वीवरिल अजाणांनी, त्यांच्या इच्छा-आकांक्ष्यांचे गाठोडे या दिशाहिनाला सोपवले.

क्षमा नावाच्या भूमातेस

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 22/04/2015 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
अगणित अत्याचार सोसलेस तू आ‌ई आ‌ई, तुझ्या अंगावरचे मौल्यवान दागिने लुटले आमच्या चैनीसाठी आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या हृदयावर चालवले आम्ही असंख्य नांगरांचे फाळ तू क्षमा केलीस आ‌ई, तुझे दुधाने भरलेले स्तन बुलडोझरने कापून टाकले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, तुझ्या दुधात हलाहल जहरिले वीष कालवले आम्ही तू क्षमा केलीस आ‌ई, आज पर्यंत आमचा प्रत्येक अपराध तू पोटात घातलास कृतघ्न उपजलो आम्ही उन्मत्त झालो आम्ही निव्वळ स्वार्थी, भ्रष्ट, नतद्रष्ट झालो आम्ही आतातर निर्लज्ज, हलकट झालोय आम्ही आ‌ई, तुझे हिरवेगार वस्त्र या पापी हातांनी फेडले आम्ही तुझ्या अंगावर असंख्य वार हसत कृरपणाने केले आम्ही
काव्यरस

द्वारकाधीश

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 22/04/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
मन श्रावण ओला, मन यमुनेचा तीर मन स्वैर पाखरू घुमणारे भिरभीर मन लहर जळाची उसळे व्यर्थ दहादा मन वृन्दावानिची अबोल वेडी राधा मन मागे पडले खिन्न आर्त गोकूळ मन माय एकटी अधिर, विरह-व्याकूळ मन क्षीर शुभ्र, मन फुटलेला घट ओला मन मोरपंख केसात जुना रुजलेला मन वेडा कान्हा, मन ओला घननीळ मन सांज केशरी, मन वेळूची शीळ मन अथांग सागर, मन तुटलेले पाश मन निर्मोही, निश्चयी द्वारकाधीश... अदिती जोशी
काव्यरस

माझे शब्द

लेखक Rajvardhan यांनी मंगळवार, 21/04/2015 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी शब्दच हरवून बसलो आज शोधतो आहे तेच स्वप्न स्वप्नात माझिया मीच हरवलो आहे माझेच शब्द नि माझीच वाचा एक वेडी आशा मिळतील का मला माझे शब्द शोधतो आहे किनारे नि आधारसाठी धरलेले ते सृजनाशील हात आज इनद्रधनुत पुन्हा तेच रंग भेटतील का मला शोधतो आहे मी माझेचे शब्द नि माझीच स्मृतिपटले एक समग्र व्यासपीठ तिथे मिळतील का मला माझेच शब्द जे कीं हरवले आहेत व्याखानात दबले गेले आहेत घुसमटातात ते आता प्राप्तानात कधी काळी त्यांचाही जरब होता चळवळीतून ,आंदोलांतून ,उठावातून आता हरवले आहेत माझेच शब्द नि माझा आवाज एक विष्णन आभाळ तिथे भेटतील का मला माझेच शब्द नि माझेच आर्तव निर्विवाद गाजवतायात क्षितिजे आपले आधिराज्य खु

रात्र...!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 20/04/2015 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
केली लाख आर्जवे तरी सांज हात सोडवून गेली नको नको म्हणताना मला ह्या रात्रीस बांधुन गेली मिटले सारे नकाशे सार्‍या दिशा विझुनी गेल्या होता जिचा दिलासा ती सावलीही पळून गेली येई काळोख अंगचटीस लोचट वारा झोंबे तनामनास उडताना घरावरी टिटवी अंगभर शहारा टाकित गेली मेघ नौबती झाडती आसमंत गडगडाटी हासे तो पोहचला वेशीवर वर्दी दामिनी देऊन गेली वाटे पळुनी जावे तर तो दारी उभा ठाकला मदतीस मारली आरोळी त्याच्या हसण्यात विरुनी गेली मग लेवुनी त्याची वासना रात्र पसरली या माळराना तो तोडित असता लचके चांदणी हुंदका दाबित गेली चंद्र लपला ढगाआड आसमंत निशब्द झाला मी फ़ोडित राहिले टाहो अन वैरी रात्र रंगात आली अखेर झाली

कर्म माणसाचे, दोष "कर्त्याला"!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 20/04/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाची देवाला विनंती: असूनही रणरणत्या उन्हाची वेळ का चालवलायस तू पावसाचा खेळ? बिघडलाय सगळा ऋतूंचा मेळ सांग नेमकी कधी आहे पेरणी ची वेळ? देवाचे सडेतोड उत्तर: माणसा तू वृक्षतोड करताना बघितला नाहीस काळवेळ सिमेंट चे जंगल उभारताना तू ठेवला नाही कसलाच ताळमेळ आलाय तुझ्या अंगाशी तुझाच हा खेळ बंद कर मला दोष देण्याचा तुझा हा पोरखेळ
काव्यरस

गावाकडची जुनाट आज्जी .....

लेखक चुकलामाकला यांनी रविवार, 19/04/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
जुन्या वहीची कोरी पाने खिन्न उदासी त्यांच्यावरती हुशार अवखळ मुले आजची होड्या का हो बनवत नाही अंगणातली हळवी माती वाट पाहुनी थकून गेली इवले इवले पाय चिमुकले इथे कधी का धावत नाही सडा गुलाबी गोड फळांचा बदाम आहे उभा कधीचा मगज आतला शुभ्र बदामी कुणा कधी का खुणवत नाही आंब्याची ती डहाळ वेडी कैर्‍यांच्या वजनाने झुकली तिला वाटते तुटून जावे एकाकीपण सोसत नाही सुट्टी येते .... संपून जाते..... गावाकडची जुनाट आज्जी उगा बिचारी वाट पहाते .....वाट पहाते.... (पहिल्या कडव्याची कल्पना एका हिंदी शेरावर आधारित.)

माझा स्वभाव

लेखक Rajvardhan यांनी शनिवार, 18/04/2015 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
भातुकलीचा खेळ मांडणे हा तुझा रियाज न खेळ मोडणे माझा स्वभाव मध्य रात्री पाठ फिरवणे हा तुझा नित्यक्रम न दुर्लक्षित करणे माझा स्वभाव रात्री अनेक गेल्या तुझ्या आठवांची न दिवस मोजणे माझा स्वभाव उत्तरार्ध तर तुझा कविता संग्रह न पूर्वार्ध योजने माझा स्वभाव तुझ्या टपोऱ्या डोळ्यात इंद्रधनू बरसात न आसू ढाळणे माझा स्वभाव ओठी तुझ्या न आले अद्याप माझे नाव न ओठ शोधणे माझा स्वभाव @@ मी मात्र@@ राजवर्धन

ठळक माझी मेहुणी....

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 17/04/2015 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
ठळक माझी मेहुणी, ठ परी ठळकातल्या स्थूल आणि ठेंगणी, ळ परी ठळकातल्या गोल आणि देखणी, क परी ठळकातल्या कडक माझी मेहुणी, वाघ बकरी चहापरी वाघ माझी बायको, डोळा सदा माझ्यावरी गुरकते, डरकाळते , पण मेहुणी जबरी खरी लाख नखरे बायकोचे शांत चित्ते साहतो मेहुणी येता घरा मी सभ्यतेने वागतो आलिया भोगासि म्हणुनी बोल नशिबा लावतो :(:(:(:(:(:(:(:(:(:(
काव्यरस

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.