कविता
नाटक वाटू नये
नाटक वाटू नये
थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये
लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये
नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये
वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये
सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये
अशी कशी ग तु...........
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
असतेस दिवसभर डोळ्यात
अन रात्री स्वप्नांतही जागतेस...........
मी पहातो तुझे प्रातिबिंब
या चमचमणार्या नभात
कधी भेटतेस होउनी चांदवा
कधी चंदेरी चांदण्यात लपतेस..............
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
सजतेस अल्लड सरींनी
अलवार ओल्या मिठीत शहारतेस
मी मागतो तुझा इशारा
या चिंब भिजणार्या पावसात
कधी वेढतेस तुझ्या आवेगाने
कधी अलगद ओंजळीत साठतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
अशी कशी ग तु...........
नेहमीच हवीहवीशी वाटतेस
मोहरतेस आसमंत अस्तित्वाने
हवा तुझ्या श्वासाने
जायचे आहेच तर जावेस आता ..
जायचे आहेच तर जावेस आता
का असे वाटेत थांबावेस आता
मी तुला द्यावे असे उरले न काही
तू हवे तर दु:खही न्यावेस आता
ही किती तलखी जिवाची होत आहे
ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता
संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल
जवळ थोडे आणखी यावेस आता
अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही
अडथळे मोडून काढावेस आता
मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ
तू युगे चालून ठरवावेस आता
- डॉ.सुनील अहिरराव
संध्याछाया..
दिवस संपला होता होता झालि संध्याकाळ
संध्येच्या त्या छायेमध्ये झोपे थकला बाळ
वाट वाकडी करून दिसाला संध्या छाया आली
बाळाच्या त्या चर्येवरती मावळणारि लाली
तो ही थकला ती ही थकली सांज वातीला जागा
उद्या पुन्हाही सकाळ होइल तोवरि कसला त्रागा?
मी ही वदतो छोटी कहाणी प्रत्येका दिवसाची
कुठे कुठे ती दिसे पौर्णिमा-बाकी ही अवसेची!
चला गड्यांनो समजुन घेऊ रूपक हे संध्येचे
जुने जाणते जे जगले ते साधे जीवन साचे
-----------------------------
अतृप्त..


सये भांडतेस कशा..
(दूर असलेला नवरा आज बऱ्याच दिवसांनी घरी येतोय म्हणून बायकोची उडालेली त्रेधा पाहून तिच्या मैत्रिणी तिची अशी फिरकी घेतात )
सांज दाराशी गं आली, सये भांडतेस कशा..
काय लागीर लागली अशा राती येड्यापिश्या ।
सये भांडतेस कशा, भरे घागर पाण्याची
तुझे ध्यान कोठे बाई? येळ जाहली जाण्याची ।
येळ जाहली जाण्याची, बिगीबिगी टाक पाय
आडवाट चकव्याची.. मन लागंल वढाय ।
मन लागंल वढाय, या गं चांदणचाहूली
भीव घाली गोरीमोरी तुझी कातर सावली ।
या गं चांदणचाहूली, रंग ठेव कि राखून
मीठ उतरून टाक..
काव्यरस
एका बापाची व्यथा .......
पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं
मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं
फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले
रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले
तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं
सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं
अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं
तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं
काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर
त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर
'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं
शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ?
कणभर का होईना , आमची आठवण आली का ?
सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं
काव्यरस
संस्कृत सुभाषिते -२
संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा
कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे !
मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !!
(कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर)
असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते.
डोळे आमचे आहेत म्हणुनी
नकोस टाकू
कटाक्ष तिरपा
मोहकसा ग
पुन्हा पुन्हा -
नकोस करू
गर्व रुपाचा
ठुमकत मिरवत
पुन्हा पुन्हा -
घमेंड तुजला
रूपगर्विते
दाखवी आरसा
पुन्हा पुन्हा -
नित्य आवडे
आत्मस्तुती
मनास कशी
पुन्हा पुन्हा -
डोळे अमुचे
आहेत म्हणुनी
रुपडे बघतो
पुन्हा पुन्हा -
आम्ही नसतो
डोळेही नसते
विचार कर ग
पुन्हा पुन्हा .. !
आभास
कधि चन्द्र तारे मला भेट्ले कि
असे वाट्ते कि कुणि स्तब्ध आहे
कुणाशि किति बोलतो मि तरिहि
मुका वाटतो का मला शब्द आहे...
कधि सान्जवेळि असा भास होतो
कुणि हाथ हाथि अकस्मात देतो
परि साधत गोड सन्वाद थोडा
दुरावा कश्याने गोड स्वप्नास येतो.......
हवाहि जराशि स्पर्शुन जाता
कुणाचा मला बोचरा भास होतो
अशा शान्तशा या समुद्रास हि का
नदि भेट्न्याचा असा ध्यास होतो.......
कुणाला कळावि मनाचि अवस्था
कुणि या जगि ना कुणा साथ देतो
कुण्या सोबतिचि मला आस आता
म्हणोनि कुणा आज हा हाथ देतो.....
काव्यरस
मिसळपाव