मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

झटपट लिहीण्याचा सराव असावा म्हणून नेट-प्रॅक्सीस

बाजीगर ·
लेखनविषय:
https://www.loksatta.com/explained/sidhu-moosewala-murder-case-know-who-is-goldy-brar-detained-in-california-america-prd-96-3312336/ कानून का शिकंजा हत्यारावर टाकला पंजा तो गोल्डी बरार कॅनडात फरार पंजाब पोलीस भटक कॅलीफोर्नियात अटक सिद्धू मूसेवाल ची हत्या सत्येंद्रसिंग धरला सत्या होते तसे काल गायक आज कसे खलनायक

चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)

दमामि ·
लेखनविषय:
म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला? डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||   उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी| काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक|| अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक | जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही || नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा | आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त || तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल | केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता || तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल? फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना|| सुप्रसिद्ध चालचलाऊ गीता लिहिणा-या श्री जे के उपाध्ये यांची क्षमा मागूनहा दुसरा अध्याय लिहिण्याचा प

एक झलक तुझी पाहता...

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
एक झलक तुझी पाहता आयुष्य उधळून जाते चैत्रातच झरती मेघ शिशिरात बहरून येते. रूप तुझे पाहुनी बघ सूर्याचे दिपती नयन चाहूल तुझी लागता वाऱ्याचे थबकती चरण तू नुसती पाहून हसता रात्र उजळून निघते. रातीस तुला पाहण्या हा चंद्र नभात तरसे अंगास चुंबून घेण्या मेघ ही अवचित बरसे उन्हं कोवळे तू दिसता बाहूत लपेटून घेते. पाण्यास लावता हात पाण्यास लागे आग पाहून तुला वैरागी भगव्याचा करती त्याग डोळ्यांचे गहिरेपण मजनूस डुबवून देते.

गोळ्या आणि गांधी

बाजीगर ·
लेखनविषय:
विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान, https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of-commerce-president-lalit-gandhi-challenged-dharmaraj-kadadi/articleshow/95811225.cms?utm_source=orionnews&utm_medium=referral&utm_campaign=article1 केतन शहा सोलापूर मंच कधी जाईल विमान उंच? काय आले त्यांचे मनी हे म्हणे पाडा चिमणी संचालक धर्मराज कडादी म्हणाले,किसने बात बढादी रिव्हाल्वर दाखवून,घालीन गोळ्या घडकीभरली,कोण वाजवील टाळ्या मी आहे ललीत गांधी मी नव्हे गलीत फांदी समजून जा घरला अन् गड्या आम्ही नाही भरल्या बा

Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला,

बाजीगर ·
लेखनविषय:
Fifa World Cup: ५ मुलांची आई मेस्सीची चाहती, केरळहून कार घेऊन एकटीच पोहोचली कतारला, कारमध्ये स्वयंपाकघर https://www.thehindu.com/life-and-style/fifa-world-cup-qatar-2022-najira-noushad-is-driving-solo-from-kannur-to-doha-to-watch-lionel-messi/article66064315.ece नाजी नौशी खूपच हौशी काढली कार गेली ती कतार पाच मुलांची आई मेस्सीला बघण्याची घाई. असेल चँम्पीयन मेस्सी कोई नही नाजी जैस्सी अर्जेंटिना ची फॅन अशक्य? शी कॅन !

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...

Deepak Pawar ·
लेखनविषय:
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे अंतरात निनादती तव तराणे. बहरलेले झाड तू जे कळ्यांनी बरसलेले मेघ तू जे सरींनी सजविले आहे मना तू फुलाने. रात तू जी भारली चांदण्याने गीत तू जे गायले पाखराने रंगल्याले तूच ते ना या नभाने. तूच दर्या, तू नदी अन् झरा तू चांदणे तू चांद तू अन् धरा तू ल्यायलेले रुप तू या धरेने........

पडघम

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
अनाम तार्‍याच्या गर्भीचे ऊर्जा वादळ लवथवणारे उधळून देते विस्फोटातून विकीरणांचे पिसाट वारे दुबळी दुर्बिण अधांतरातून अनंतात डोकावून बघते सर्वव्यापी, निर्लेप, अनादि स्थळकाळाचे चित्र रेखिते आतशबाजी अवकाशातील निरभ्रातुनी मला खुणविते भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी अबोध नाते अधोरेखिते अज्ञाताचा अदम्य रेटा परतविण्याचे प्रयत्न माझे थिटेच ठरती, रोमरोमी मग कुतूहलाचा पडघम वाजे

सय

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
दसरा आणि दिवाळी दोन सणांच्या मागोमाग बहुदा केव्हातरी ती गेली नक्की कधी ते माहीत नाही पण लक्ष्मीपूजनाला दुपारी हटकून तिची सय येते.... सूर्य अस्ताला जाईपावेतो सबंध घरभर दाटून राहते स्वतःपेक्षा अनेकपट वजन वाहून नेणाऱ्या मुंगीसारखं स्वतःला खेचून बाहेर आणताना पापण्यांमध्ये आपसूक ओल येते नकळतपणे पाझरणारे डोळे संध्याकाळी रोषणाईच्या तेजाने "दिपले" म्हणून इतरांपासून लपवण मग तसं सोपंच जातं... असताना कधीचं जाणवू ही न देता माझ्या मार्गातील काटे वेचणारी ती तिच्यामाघारी तिच्या आठवणीही अबोल काळजी वाहताहेत माझी #चक्कर_बंडा

साजणी आता इथे...

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
साजणी आता इथे तू एकदा येऊन जा सांजवाती सांजवेळी तू इथे लावून जा. बहरली ही बाग सारी, बघ फुले फुलली किती फुललेली ही फुले केसात तू माळून जा. माळता केसात सुमने गगन हे गंधाळले गंध केसातील सारा या इथे उधळून जा. एकदा माझ्या घरी प्रीत गंध उधळित ये एकदा माझ्या मनी प्रीत तू गोंदून जा.

फिरुनी केली मनात दाटी...

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी. जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी. किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी. देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान असे उठले होते वादळ उजाड हा माळरान सडा सुकलेल्या फुलांचा गेला गंध उडुनी.