चालचलाऊ गीता -अध्याय २ (विडंबन)
लेखनविषय:
काव्यरस
म्हणे मग कृष्ण त्याला| काय अलिबागेहुनि आला?
डोस्क्यावरि तुझ्या मेल्या| वशाड शिरा पडो||
उगा रडसी मुर्दयासाठी |वरी ज्ञान पाजळसी|
काय जास्त घेतलीसी| रात्रीची नवटाक||
अरे हे राजे लोक| टेम्परावरी आणि फेक |
जन्माचे घेति रिटेक| परमनंट नाही ||
नवी रूपे घेतॊ रोज| कधी बाळ्या कधी आज्जा |
आत्मुच्या भारी गमजा| पण तो बंधमुक्त ||
तोच जाण खरा कुल| कधी न हो दांडी गुल |
केले कुणी जरी फुल|तयासि येताजाता ||
तू म्हणे टपकवशील , जे मी निर्मियेल?
फुका काय बोलशील| काहीही हं अर्जुना||
सुप्रसिद्ध चालचलाऊ गीता लिहिणा-या श्री जे के उपाध्ये यांची क्षमा मागूनहा दुसरा अध्याय लिहिण्याचा प्रयत्न आहे. चुकल्यास, दोष आढळल्यास माफी.
यात कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.
(जर संपादकाना यात काहीही गैर वाटले तर सरळ उडवून टाकावे ही विनंती)
वाचने
4346
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
छान आहे
भारी..
आवडले. माझेही.आजच्या
आवडले. माझेही.आजच्या
नाही आवडले...
In reply to नाही आवडले... by कर्नलतपस्वी
10001 % सहमत.
In reply to नाही आवडले... by कर्नलतपस्वी
माझे मत
मुळ धागा पण माहीत आहे.
मस्त.
अच्च जालं तर...
एक नंबर भाऊ :=)
एखाद्या काव्याचे गंमत म्हणून
In reply to एखाद्या काव्याचे गंमत म्हणून by अहिरावण
+२२०६२०२३