Skip to main content

शब्द तू, संगीत तू, तूच गाणे...

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 24/11/2022 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द तू, संगीत तू, तूच गाणे अंतरात निनादती तव तराणे. बहरलेले झाड तू जे कळ्यांनी बरसलेले मेघ तू जे सरींनी सजविले आहे मना तू फुलाने. रात तू जी भारली चांदण्याने गीत तू जे गायले पाखराने रंगल्याले तूच ते ना या नभाने. तूच दर्या, तू नदी अन् झरा तू चांदणे तू चांद तू अन् धरा तू ल्यायलेले रुप तू या धरेने........
लेखनविषय:

वाचने 2742
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

लिहिते राहा. ( प्रतिसादांचा विचार न करता) -दिलीप बिरुटे

देवाला, देशाला, प्रिय व्यक्तीला वगैरे उद्देशून तूच अमूक, तूच तमूक वगैरे कविमंडळींचे आवडते टेंप्लेट आहेसे दिसते, उदाहरणार्थः मेरी आरजू मेरा ख्वाब तू मेरी रातों का महताब तू मेरा इश्क तू है करार तू मेरी जिंदगी की बहार तू तू ही तो है रूह का सुकून तू ही तो है मेरा जुनून ..... वगैरे.