मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गोळ्या आणि गांधी

बाजीगर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
विषय : सोलापूर ला विमानसेवा कधी येणार पिस्तूल दाखवणाऱ्या धर्मराज कडादींना ललित गांधी यांचे आव्हान, https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/maharashtra-chamber-of-commerce-president-lalit-gandhi-challenged-dharmaraj-kadadi/articleshow/95811225.cms?utm_source=orionnews&utm_medium=referral&utm_campaign=article1 केतन शहा सोलापूर मंच कधी जाईल विमान उंच? काय आले त्यांचे मनी हे म्हणे पाडा चिमणी संचालक धर्मराज कडादी म्हणाले,किसने बात बढादी रिव्हाल्वर दाखवून,घालीन गोळ्या घडकीभरली,कोण वाजवील टाळ्या मी आहे ललीत गांधी मी नव्हे गलीत फांदी समजून जा घरला अन् गड्या आम्ही नाही भरल्या बांगड्या हादरले ते सोलापूर अफवांचा आलापूर त्यांनी केले उपोषण ह्यांनी केले भाषण हा मानअभिमान हेवा येणार कधी विमानसेवा सध्या चाललाय गन वे कधी येणाराय रन वे?

वाचने 1814 वाचनखूण प्रतिक्रिया 5

कानडाऊ योगेशु Mon, 12/05/2022 - 09:10
काही वर्षांपूर्वी सोलापुरात विमान सेवा होती वायुदूत कंपनीची.त्यांचे एक विमान उजनी धरणात पडले आणि तेव्हापासुन ती सेवा बंद करण्यात आली. पण जर विमानसेवा वापरणारे तितके ग्राहकच नसतील तर कुणी कंपनी कशाला आपली सेवा देईल.? तसेही पुण्याला आता ट्रेनने ३-४ तासात पोहोचता येते व मुंबईला ६-७ तासात.त्यामुळे तसेही सोलापूर पुणे वा सोलापुर मुंबई साठी विमान प्रवास तसा किफायतशीर ठरणार नाही. इतर महानगरातुन जसे कि बेंगलोर/हैद्राबाद इथुन सोलापुरात विमानाने येणारे तितके प्रवासी असण्याची शक्यता कमीच आहे..

In reply to by कानडाऊ योगेशु

एकुलता एक डॉन Mon, 12/12/2022 - 19:30
माफ करा तुमचे मुद्दे खूपच चुकीचे आहेत सोलापूर हुन फक्त पुणे मुंबई सोडून बाकी ठिकाणी पण लोकं जायचे असेल ,हैदराबाद आणि कलबुर्गी वाले पब्लिक खूप आहे प्रत्यक्ष वेळी पुणे मुंबई जाऊन विमान पकडणे बे भरवस्याचे आहे वायू दूत बाकी पण कारणाने बंद पडले https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/-/articleshow/6633585.cms