शोभिवंत होळी

लेखनविषय:
शोभिवंत होळी निरव शांततेच्या मिट्ट रात्र वेळी, आली झोपडीत माझ्या 'लाघवी' लुटारुंची टोळी वदले नकोत चिंता आता तुझ्या कपाळी, खाऊन भाजलेली माझीच गोड पोळी पाहुन तारका ते भलतेच तृप्त झाले, श्रीमंत पामराची झोपडी चंद्रमोळी करुनी दानधर्म ते पुण्यवंत झाले, परी पापसमुच्चयाने फाटली दीन झोळी जखमा करुन ताज्या ते दाविती जगाला, चितेचीही माझ्या केली शोभिवंत होळी विझले जसे 'निखारे' झाले पसार सारे, तीच तीच दुःखे कोणी कशा ऊगाळी भोगले जे ही होते लिहीले माझ्याच भाळी, सावध असा गड्यांनो येता आपुली पाळी... आशिष

दोन मूठ राख

लेखनविषय:
काव्यरस
दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...

भिकारी...

लेखनविषय:
मरणाआधीच मेलेल्या जित्या मढ्याचा प्राण चितेच्या चटक्यांनी कळवळून बाहेर पडला आणि लांबूनच जमावाचे अश्रू न्याहाळताना त्याला खदखदून हसू फुटले... भेसूर नजर भवताली भिरभिरली अन् हात पसरून आत्मा निघाला भीक मागण्यासाठी.. देहक्लेशांची नाटके बंद करा, अन् चित्तक्लेशाचे रेचक रिचवा.. होऊ द्या झडझडून झाडा पडून जाऊ द्या विकृतीच्या कृमी कधीतरी जेव्हा वाटेल लाज, गळून जाईल लिंगाचा माज.. माझ्या झोळीत काही घालू नका पण एक तरी मेणबत्ती पेटवा मंद थरथरता उजेड आतल्या आवाजापर्यंत पोचवा..

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

लेखनविषय:
॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

लेखनविषय:
॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

लेखनविषय:
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

अक्का महादेवी, कर्नाटकाची संत मीरा ?

ज्यांची मने अध्यात्म अथवा स्त्रीमुक्ती पैकी कशानेही दुखावतात अशांनी पुढे वाचले नाही तरीही चालेल. *** (मर्त्य मानवी नवरे तुझ्या चुलीत घाल !) *** Like treasure hid in the ground, like flavour in the fruit, like gold in the rock and oil in the seed, the Absolute is hidden in the heart. I love the Handsome One: he has no death decay or form no place or side no end nor birthmarks. I love him O mother.

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

लेखनविषय:
॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।

कान्ट फाईन्ड

काव्यरस
सेदान सेदान सुस्साट कार टॉप एन्ड मॉडेल बेस्ट इन क्लास बट कान्ट फाईन्ड पार्किंग यार! निघाली कार दूर दूर फार ठाऊक नाही रस्त्याचा पार रस्ता काही संपेना मायलेज काही पुरेना
Subscribe to कविता