॥सांगा तुकारामा : अभंग-२॥
लेखनविषय:
काव्यरस
॥सांगा तुकारामा : अभंग-२॥
तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥
रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥
धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥
इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥
तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥
इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥
लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥
ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥
गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥
तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥
इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥
गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥
सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६
तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥
रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥
धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥
इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥
तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥
इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥
लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥
ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥
गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥
तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥
इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥
गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥
सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६
वाचने
5772
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे
In reply to तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे by मितभाषी
संत होणे कठीण
खूप छान लिहिलंय.
मस्त!!
अभंगाच्या नावावर विखार
In reply to अभंगाच्या नावावर विखार by झेन
असा गाव?
In reply to असा गाव? by गंगाधर मुटे
मुटे सर...
In reply to मुटे सर... by चांदणे संदीप
सरसकटपणे लोकांना दूषणे
In reply to मुटे सर... by चांदणे संदीप
झेन म्हणजे संदीप चादणे आहे का
In reply to अभंगाच्या नावावर विखार by झेन
झेन
मुटे साहेब, काव्य ठीक आहे पण
In reply to मुटे साहेब, काव्य ठीक आहे पण by खटपट्या
एक साधा प्रश्न
In reply to एक साधा प्रश्न by गंगाधर मुटे
+१
In reply to +१ by कपिलमुनी
मुनीला सहमत
झेन म्हणजे संदीप चादणे आहे का
In reply to झेन म्हणजे संदीप चादणे आहे का by गंगाधर मुटे
नाही....
In reply to नाही.... by चांदणे संदीप
झेन
झेन म्हणजे संदीप चांदणे नव्हे
शहरात चेन्नईसारखे