Skip to main content

शुभ दसरा

लेखक रातराणी यांनी मंगळवार, 11/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
विजयादशमीच्या सर्वांना अनेक शुभेच्छा =)) शुभशकुनांच्या पावलांनी किरण सोनेरी येती घरा अवगुण अंतरीचे मिटवूनी करू सत्याचा विजय साजरा दारी सजवू मांगल्याचे तोरण दुःखक्लेशास न मिळो थारा विवेकबुद्धीने करून आचरण लाभो शक्ती दुष्टमतीच्या संहारा नवविचारांचे जमवूनी सखेसोबती पेटवुया जुनाट रीतींच्या अंधारा जन्मू दे नवी उमा दुर्गा सरस्वती स्वप्न यशाचे तरच येईल आकारा
लेखनविषय:

वाचने 1994
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

खूपच छान झाली आहे कविता...दसऱ्याचे पूर्ण वर्णन अगदी छान !! तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा.

सुंदर समयोचित कविता,