मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

साक्षात्कार

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले तेव्हा दिसलं इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी रिमझिमतं आभाळ तर कधीचं ओथंबून वाकलंय वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं तेव्हा दिसलं मी सहज फेकलेल्या विटेवर माझं श्रेय-प्रेय तर कधीचं उभं ठाकलंय अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत तेव्हा दिसलं माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंय

येथे पाहिजे जातीचे .....

अरूण गंगाधर कोर्डे ·
लेखनविषय:
काव्यरस
एक होता गुरू त्याचा एक महागुरू भेटल्यावर म्हणाले, " आपण अभ्यास करू आणि चराचरात शिरू " मी म्हंटले , " ओके " त्यांनी मला वह्या दिल्या मी त्यांच्या नावाने त्या भरवल्या त्यांना अर्पण केल्यावर हसून ते म्हणाले, " " भल्या गृहस्था, हा कसला अभ्यास ? " आम्ही आधुनिक गुरू वेगवेगळ्या धंद्यात शिरू, यात तर धंद्याचा लवलेषही नाही अर्थाचा नुसता अनर्थ आहे काल हरणासाठी अर्थ हवा जो इतरांकडून घ्यावा आणि गोणींमध्ये भरावा कालसर्प, राहू शांत , नारायण नागबली मनः शांती, ही तर आमची हत्यारे तुला जमत नसेल तर कितीतरी आहेत अनुसरणारे मुकाट बाजूला हो, सामान्य पुचकट माणसाचे काम नाही येथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नव्हे.

मीच का ?

अरूण गंगाधर कोर्डे ·
लेखनविषय:
काव्यरस
मीच का ओझे वाहावे ? संस्कृतीचे सभ्यतेचे पांढऱ्या कॉलरीत माझ्या मीच का गोड बोलावे ? मीच का पूजा करावी ? मीच का वारी करावी ? मीच का त्यांच्या चुकांना पदरात घ्यावे पुन्हा पुन्हा मीच का साफ करावा माझाच चष्मा हरघडी त्यांनी चालावे रुबाबात काळा चष्मा वापरोनी मीच चोरटेपणाने का पाहावे स्त्रीकडे ते भोगुनीयाही तिला लेऊनी घेती हारतुरे मीच बांधलेला समाजी मीच बाधलेला भिडेने मीच छाती आत घेउनी का चालावे घाबरोनी ? अशाच या कोंदट जगातील सहावा लागे कोंडमारा प्रकाशाला अन सूर्याला जो ढगाआडून पाही.

ढग . . !

माम्लेदारचा पन्खा ·
काव्यरस
आभाळातले ढग कधीतरी त्याला खूप त्रास देतात कारण नसताना उगीच तिचाच आकार घेतात . . . . मग तोही नादावतो वेडा बघत बसतो तासन् तास ढगाचं नुसतं निमित्त एक त्याला फक्त तिची आस.... कधी कधी एकाच क्षणात तो ढग जातो अचानक विरुन अन् अचानक जाणवतं रितेपण भकास वास्तव टाकतं घेरुन ढगासारखंच स्वप्न विरलं आणि संपला सगळा खेळ तो मात्र अजून जपतो उराशी आठवणींच्या जगातली वेळ !

तूरडाळ टंचाई

अरूण गंगाधर कोर्डे ·
लेखनविषय:
काव्यरस
तुरडाळ शेतात पिकली अन बाजारात येऊन भडकली कोण लागणार तिच्या नादी तशी ही स्वस्त नव्हती कधी गिऱ्हाईक नुसतेच लांबून जाई भाव विचारण्याची सोय नाही फोडणीशिवायच तडतडू लागली व्यापाऱ्यांची फाटू लागली तरीही मख्ख व्यापाऱ्यांनी साठेबाजी चालूच ठेवली सरकारने डाळीला मुक्ती दिली पण फक्त गोदामे बदलली अधिकाऱ्यांची चंगळ झाली सामान्यांची कोंडी वाढली मोर्चे, आंदोलने करुनही सरकार घट्ट बसून राही वरण भातालाही जनता महागली समोर दिसेल ते मुकाट खाऊ लागली आता भाव पाहत नाहीत जमले तरीही घेत नाहीत इतर डाळींची खिचडी करून सामान्यांनी भूक भागवून घेतली

जय महाराष्ट्र बोला

पाषाणभेद ·
काव्यरस
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला कुणाच्या बापाची भीती नाय बोला दणकूण बोला तुम्ही जय महाराष्ट्र बोला अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही उगा पिरपिर करू नका नाहीतर एकच ठेवून देवू टोला बोला बोला जय महाराष्ट्र बोला बापजादे खपले आमचे सीमालढा देवून लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून खोटे गुन्हे नका दाखल करू कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा बोला बोला जय महाराष्ट्र बोला मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो सोईचे नियम केले हो केले दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले खेळी केली अन गावं खिशात घा

अंबरनक्षी

सांजसंध्या ·
लेखनविषय:
काव्यरस
अंबरनक्षी ====== सुखाच्या जाणिवेपोटी निद्रीस्तदामिनी झाली नेणीवलकेर लहरता निर्झरली शब्दमाऊली उरले ना रितेपण रिते आठवसाठले रांजण डोळ्यातील आसवांनी आता भरले गं आंगण त्या क्षितिजरेषेवरती झेपावला मानसपक्षी विलंबित जलदांसाठी उमलली ही अंबरनक्षी ही सांज ढळण्याआधी तेवते गाभारसमई स्मरणातील उत्सवसंध्या पांघरते गर्दनिळाई - सांजसंध्या 4.6.2017

झिन झनन निनादत होते

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
शब्दांचे इमले रचता रचता मी इथवर आलो पण वीट वीट कोसळता नि:शब्द, खोल मी उरलो त्यावेळी जखमी अवघे भवताल सोबती होते विझत्या शब्दांच्या संगे झिन झनन निनादत होते शब्दांच्या विझत्या ज्योती उतरती गडद डोहात तरि नाद कुठुन हे येती जणु पैंजण रुणझुणतात -मी काठावर, की मीच खोल डोहात? -की रुणझुणतो मी, पैंजण होऊन त्यात?

ऊन

शिव कन्या ·
काव्यरस
दिवसाचा ताप संपला कि ऊन उदास होऊन कोपऱ्यात एकटे बसते. आपण कुणासाठी सावली झालो नाही म्हणून हुरहुरते, हळहळते. अंधारात गडप होऊन पाण्यापलीकडचे मृगजळ शोधू लागते. -शिवकन्या