Skip to main content

कविता

सुटलेला डाव !

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 05/01/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आज भांबावला दिस काही येई ना मनात अंधार व्यापलं आकाश उजेड उरे पणतीत ठरलेल्या अवसरी रान गेलंच उठून पक्षी शोधी रानमेवा पंख जाती हो थकून .
काव्यरस

देव

लेखक सागरसाथी यांनी मंगळवार, 26/12/2023 या दिवशी प्रकाशित केले.
देव होता, देव आहे, असेल पुन्हा भावनेच्या ओलाव्यातून रुजेल पुन्हा. कधी माणसाच्या अंतरंगातून डोकावतो आभाळाच्या सावलीतून पाहील पुन्हा. नेमके फासे तो फेकतो नेहमी इथे नेटके दान नशिबी तो देईल पुन्हा . भक्तिभाव जेव्हा उचंबळून येतो सुगंध बनून मनातून फुलेल पुन्हा. माणसाने माणसाशी माणसासम वागणे माणसातूनच देव जन्माला येईल पुन्हा. शब्द होता कान्ह्याने गीतेतून पेरला आज नाही तर उद्या जन्म घेईल पुन्हा. ----अभय बापट
काव्यरस

क्षितिजाचे कुंपण

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 25/12/2023 या दिवशी प्रकाशित केले.
बालपण...... साखर झोपेच्या वळणावर अंदोलत स्वप्न हिंदोळ्यावर बांग कुणाची येता कानी विरून गेली सारी कहाणी तरूणपण...... विझल्या साऱ्या चांदणठिणग्या बघा बघा ती पहाटफुटणी छोट्या टीचभर खळगीसाठी धरावी आता वाट ही कुठली दगड मातीच्या रस्त्यामधूनी दिसेल काही अमोघ अद्भूत धावत होतो उर फुटोस्तर हाती आले मृगजळ सुंदर म्हातारपण...... झाली आता चांदणसंध्या चक्क कळाले भ्रमनिरास होणे ओलांडून क्षितिजाचे कुंपण उरले फक्त मार्गस्थ होणे

शुभ दिपावली

लेखक सागरसाथी यांनी रविवार, 12/11/2023 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाच्या दारी परब्रह्म येते सुखाचा पहाट, दाखवते. मनामनामध्ये उजळते प्रेम समृद्धीचा वाट, सापडते. सरो सारे दु:ख होवो भरभराट दिवाळी पहाट, ऐश्वर्याची. सोबतीच्या पाया मिळो पायवाट उडू दे थाट, दिवाळीचा. आनंद सोहळा,प्रकाशाचे पर्व नात्यांचा उत्सव ,चार दिस. दिवाळी म्हणजे दुजे काही नाही आनंदाची ग्वाही, स्वत:लाच. शुभ दिपावली -----अभय बापट
काव्यरस

हसरतें..!

लेखक राघव यांनी शनिवार, 11/11/2023 या दिवशी प्रकाशित केले.
एका उदास संध्याकाली अचानक मोडक्या तोडक्या हिंदीत शब्द सुचायला लागलेत.. तसेच लिहून काढलेत. मराठीकरण करायची गरज वाटली नाही. अर्थात् मिपाच्या धोरणांत बसत नसेल तर बेलाशक धागा उडवावा. उनके आनेंकी हसरत में हम ग़ली सजाते चलें गये.. वो घरसे, हमारे जानें की, तारीख बता कर चलें गये. उनकें लिये दिल का हर कोंना सजाया था चिरागोंसे.. वो अंधेरेसे हमारी वफा की याद दिला कर चलें गये.. उनसे जी भर बातें करने की आंस लिये बैठे थे हम.. मौका ही न मिला, वो बिना बताये चलें गये.. मिठी जुबां और हसता चेहरा..
काव्यरस

शूर्पणखा

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 26/10/2023 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रात्री असा अचानकच भुतकाळाचा लुप लागला अन् थेट ८०च्या दशकातलं लहानपण आठवलं. मुळगावी संगमनेरला कायमस्वरुपी स्थलांतर प्रक्रियेत आई, मी आणि लहान बहिण आजोबांसोबत रहात होतो. भाऊ आजोबांच्या हातमागासाठी सुताच्या गुंड्या भरणे आणि शिवणकामाच्या मशीनशेजारी आईची पण एक मशिन लागली आणि दिवसभर आम्हीही तिथेच घुटमळायचो. . सलगच्या बैठ्या कामानं गांजलेले भाऊ जुन्या कविता ऐकवायचे. त्यातली एक गमतिशीर कविता होती "शूर्पणखा" वनवासी रामासमोर आलेली राक्षशीण शूर्पणखा रामावर भुलते आणि सीतेला सोडुन तिच्यासोबत येण्यासाठी रामाचा अनुनय करते असा कवितेचा आशय. मशिनचं पायटं हलवत भाऊ एकदम तल्लिनतेनं ही कविता गायचे.

दसरा की शिमगा

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 24/10/2023 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा की शिमगा? ते विचारांचे सोने की टोमणे व रोने काही दखल नेक? नुसती चिखलफेक जाळणार खोकेसूराची लंका अपात्रतेचा निर्णय कधी, शंका शिवाजी पार्क वि.आझाद मैदान कुठे पडणार पुढचं मतांच दान? मी काम करतो, जातो थेट साईटवर ते असतात लाईव्ह फेसबुक साईटवर गर्दी जमा ची रोजगार-हमी नाहीतर आहेच जंगली रमी मानसशास्त्र झूंडीचं मिडीया बाईट धूंडीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, शिंदे सरकार देणार म्हणजे देणार चिन्ह गेले, पक्ष गेला,आता कोर्टबाजी अपात्रतेचा निर्णय तो कधी येणार? जालना लाठीचार्जचा डायर कोण? षडयंत्राचा तो सुत्रधार कायर कोण? एकंदरीत होतोय समाज खुजा गल्लीत पोस्टर माझा कि तुझा. घरी जातांना काय टेक अ

सृष्टी माया

लेखक Bhakti यांनी रविवार, 15/10/2023 या दिवशी प्रकाशित केले.
वाजे लडिवाळ घुंगूरवाळा चरितसे गोजिरी कपिला | धरती गळा फुलांच्या माळा फुलपाखरांनी श्वास रंगला | वाहे धीरगंभीर निर्झर निळा नाद ,सृष्टी मंदिरा घुमला | स्पर्शाचा भोवरा, दाटे उमाळा पाकळ्यांची बरसात रान सजला| अवचित पावा वाजला सावळा समाधी मनीची ,हरी हसला | -भक्ती

....किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले....(प्रौढांसाठी :) )

लेखक कानडाऊ योगेशु यांनी गुरुवार, 14/09/2023 या दिवशी प्रकाशित केले.
कामावरुन मधल्या सुट्टीत घरी जेवणासाठी येणार्या चावट रसिकांसाठी.. ============================================================= किचनमधुनि मला उचलुनि आत धन्याने नेले.. पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.. दुपार होती घरात नव्हते कुणीही अजिबात. केला होता दुष्ट सख्याने..भलता चावट बेत.. कशास फसवु..मी ही तेव्हा होते मोहरलेले... पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.. विसरुन गेलो..दुपार होती अथवा आहे रात.. विसरुन गेलो कधी गुंफले हातामध्ये हात.. इतके स्मरते त्याच्यासंगे मी ही थरथरलेले... पोळी आणि भात करपला ऊतु दूधही गेले.. पुढचे क्षण मग होऊन गेले..मंतरलेले सारे.. उधाण आले, लाटांमध्ये मुक्त बुडाले ता

हाक

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 10/09/2023 या दिवशी प्रकाशित केले.
रानात आली कुणाची हाक डोळ्यांत उतरली माझ्या रूपेरी झाक वळूनी बघता दिसे न कोणी पाखरांच्या मुखी आली कशी गाणी कसा होतो कळेना हा भास प्राणावर माझ्या फिरवीत जातो मोरपीस दूर-दूर मी भांबावूनी पाहते नजरत माझ्या चांदण्यांचे आभाळ जुळते आला शिवारी दरवळत रानगंध वेडावले मी झाली ही काया धुंद
काव्यरस