Skip to main content

दसरा की शिमगा

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 24/10/2023 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दसरा की शिमगा? ते विचारांचे सोने की टोमणे व रोने काही दखल नेक? नुसती चिखलफेक जाळणार खोकेसूराची लंका अपात्रतेचा निर्णय कधी, शंका शिवाजी पार्क वि.आझाद मैदान कुठे पडणार पुढचं मतांच दान? मी काम करतो, जातो थेट साईटवर ते असतात लाईव्ह फेसबुक साईटवर गर्दी जमा ची रोजगार-हमी नाहीतर आहेच जंगली रमी मानसशास्त्र झूंडीचं मिडीया बाईट धूंडीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण, शिंदे सरकार देणार म्हणजे देणार चिन्ह गेले, पक्ष गेला,आता कोर्टबाजी अपात्रतेचा निर्णय तो कधी येणार? जालना लाठीचार्जचा डायर कोण? षडयंत्राचा तो सुत्रधार कायर कोण? एकंदरीत होतोय समाज खुजा गल्लीत पोस्टर माझा कि तुझा. घरी जातांना काय टेक अवे? विचार करुन थकले गर्दीचे थवे.
लेखनविषय:

वाचने 883
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया