Skip to main content

हाक

लेखक चांदणशेला यांनी रविवार, 10/09/2023 00:30 या दिवशी प्रकाशित केले.

रानात आली कुणाची हाक
डोळ्यांत उतरली माझ्या रूपेरी झाक

वळूनी बघता दिसे न कोणी
पाखरांच्या मुखी आली कशी गाणी

कसा होतो कळेना हा भास
प्राणावर माझ्या फिरवीत जातो मोरपीस

दूर-दूर मी भांबावूनी पाहते
नजरत माझ्या चांदण्यांचे आभाळ जुळते

आला शिवारी दरवळत रानगंध
वेडावले मी झाली ही काया धुंद

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 809
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया