लेखन स्पर्धा २००९

लेखनविषय:
मिपाकर लेखकांकरता माहिती, पु.ल. देशपांडे जयंती निमित्ताने, puladeshpande.net या संस्थळाने लेखन स्पर्धा २००९ आयोजित केली आहे. महाविद्यालयीन व खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा आहे. ३० नोव्हें. अंतिम तारीख आहे. या बद्द्लची अधिक माहिती इथे पाहू शकाल. स्पर्धेत भाग घेणारे इच्छुक लेखकांना शुभेच्छा. आपला मोहन.

लिंगाणा...

लेखनविषय:
तोरणा चढताना बिनी दरवाजाच्या जवळ पोहचलो, की उजव्या हाताला दूरवर एका सुळक्याचं टोक दिसतं. कोकणातून मान वर काढून रायगड आणि भवतालच्या परिसरावर पहारा ठेवणाऱ्या लिंगाण्याचं ते डोकं. "गड्या, ये की एकदा भेटायला" असं म्हणून लिंगाणा सारखा मला बोलवत असतो... लिंगाणा चढायला अतीशय अवघड आहे. निम्मा गड चढल्यावर दोर लावल्या शिवाय चढताच येत नाही. पूर्वी कैद्यांना लिंगाण्याच्या माथ्यावर ठेवायचे, म्हणजे कैदी पळायचा प्रयत्नच करायचे नाहीत (खरंतर पूर्वी गडाच्या माथ्या पर्यंत जायला खोबण्या होत्या, आता त्या नाहीत). तळकोकणातून बघितल्यावर शिवलिंगा सारखा दिसतो म्हणून कदाचीत ह्याला लिंगाणा म्हणत असावेत.

परछाईयां

लेखनविषय:
लेखनप्रकार
वो जो हममें तुममें करार था... रे सा ध प म ध प म सा रे सा गझल आवडीचीच. गायकही पुरेसा रंगलेला आहे. वो जो हममें तुममें कराssssssर था, तुम्हे याद हो कि ना याssssssssद हो... म ध रे सा नी ध प ध नी ध प म प म ग रे सा सा रे सा... वोही यानी वादा निबाह का, तुम्हे याद हो कि ना हो... आलापी सुरू राहते... विचारांच्या आंदोलनात घेऊन जाण्यास पुरेशी. ईज इट द बिगिनिंग ऑफ द एण्ड? कदाचित. मला नक्की नाही सांगता येणार. काही तरी गडबड आहे हे नक्की. "प्लीज. मला काही दिवस एकटेपणा हवा आहे," हे तुझं वाक्य... त्या दिवशीचं. *** थंडीची करामत कशी असते पहा.

एक प्रवास.... भाग १

लेखनविषय:
लेखनप्रकार
काल झालेल्या मतमोजणीत नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी १९० जागा जनशक्ती पक्षाला मिळाल्या आहेत. साधारण तीन वर्षापुर्वी हा पक्ष अस्तित्वातच नव्हता पण गेल्या वर्षी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाने चांगलाच जोर दाखवला होता. पक्षाच्या नेत्याची निवड लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य करतील असे प्रतिपादन पक्षाध्यक्ष राजेश पवार ह्यांनी केले. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे उद्या संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होईल.

मंडळ निघालं गोव्याला

लेखनविषय:
लेखनप्रकार
"हमे हर साल कम से कम एक हफ्ते के लिये यहां आना चाहिये" इती दिल चाहता है चा आमीर.... असेच काहीशे वेडे बोल एकोणीस जून दोन हजार सहा ला बोलले गेले....ते होते..."आपण सगळे वर्षातून कमीत कमी एकदा भेटायचं .....तेही मस्त आठवडाभरासाठी..आणी याची सुरुवात करायची या नाताळला.....गोव्यात"....

ऐका .....बिडी.

लेखनविषय:
मिसळपावचे एक सदस्य विमुक्त यांची अशीच एक गोष्ट माझ्या वाचनात आली. यात साउंड मिक्सिंगसाठी खूप स्कोप वाटला. म्हणून ही कथा निवडली आणि माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित केली . मी वापरलेले रेकॉर्डींगचे साधन उत्तम नाही.

पार्टनर

लेखनविषय:
लेखनप्रकार
मेहतांची आणि माझी ओळख हॉटेलच्या बारमध्ये झाली. झालं असं की सगळेच टेबल्स खचखचून भरलेले. फक्त एका कोपर्‍यात मेहता एकटेच बसले होते. मी शक्य तेव्हढा नम्रपणा आवाजात आणून त्यांना विचारलं. "कोणी येणार आहे का ?" सीप घेता घेता थांबले मेहता. नाव नंतर कळल म्हणा. त्यानी मानेनेच नकार देत ग्लास संपवला. मी बसल्यासरशी ऑर्डर दिली. ब्रॅंड सेम होता आमचा. तेही स्मिरनॉफ घेऊन बसलेले. एकदा दारूचा ब्रँड जुळल्यावर मैत्री जुळायला वेळ लागत नाही. तशी आमच्या वयात बरीच तफावत होती. मी ३२ चा आणि ते मागच्याच महिन्यात ५५ पुर्ण करून पुढच्या वाटचालीस लागलेले. मेहता म्हणजे सुरतवरून आलेली मोठी आसामी. त्यांचा डायमंडचा बिजनेस.
Subscribe to कथा