Skip to main content

कथा

गूढ कथा: अगम्य आघात!!!

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 12/10/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क सुजय सूर्वे गाढ झोपेतून जागा झाला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. खिडकीतून पाहिल्यावर कधी नव्हे तो सूर्य आज अगदी तेजस्वी दिसत होता. सुजय अगदी अभ्यासू आणि आज्ञाधारक मुलगा. तितकाच अंगापिंडाने मजबूत. रोजच्या दिनक्रमात व्यायामाला तो महत्त्व द्यायचा. यंदाचे बारावीचे वर्ष. पीसीएम ग्रुप निवडला होता त्याने. मॅथ्स त्याचा आवडता विषय. रोज सकाळी पाच वाजता उठून तो सहा वाजता सुरू होणार्‍या मॅथ्स च्या ट्युशन साठी तयार व्हायचा. ट्यूशनला जायला पप्पांनी घेवून दिलेली स्कूटी त्याला उपयोगी पडायची. बोचरी थंडी. बरेचदा धुके रस्ता व्यापून टाकायचे.

माझे 125 वर्षाचे आजोबा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 12/10/2009 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
"कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही." आज माझे आजोबा जीवंत असते तर ते 125 वर्षाचे असते.माझ्या दहाव्या वर्षी ते गेले.त्यावेळी ते साठ वर्षाचे होते.त्यावेळी माणसाला आयुर्मान कमीच असायचं. माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं.आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्व नातवंडावर होतं.माझे गोरेपान आजोबा स्वच्छ जांभळ्या रंगाचं सोवळं नेसून,वरून उघडे आणि खांद्यावरून कमरेकडे लोंबणारं त्यांचं जानवं, हातात ताम्हाण घेऊन गायत्री मंत्र मनातल्या मनात पुटपुटत संपलेल्या पुजेचं आचमन करून झालेलं ताम्हाणातल

"सखी शेजारणी तू हंसत रहा"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 10/10/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
शरद,रमेश आणि सुमन ही तिन भावंडं घरात किंवा बाहेर सदाची मजा-मस्करी करण्यात दिसायची.कदाचीत हे गुण त्यांना त्यांच्या आईकडून आले असावेत.त्यांची आई प्रत्येक उच्चारलेल्या वाक्यागणीक हंसून समारोप करायची.मला ह्या कुटूंबात वेळ घालवायला आवडायचं.मी दुसर्‍या मजल्यावर राहत असल्याने आणि हे कुटूंब पहिल्या मजल्यावर असल्याने ह्यांच्या घरावरून जावं लागायचं.ह्याच्या घराच्या जवळ आल्यावर हस्याचे फुलोरे ऐकायलामिळायचे.बरं वाटायचं.ह्यांचे वडिल मात्र स्वभावाने अगदी मख्खं. गालावर माशी बसली तरी ते ती हाकलण्यासाठी गाल हलवत नसत.ही एक दुसर्‍या टोकाची व्यक्ती होती. सुमन स्वभावाने शांत पण वागायला भावांसारखी मिष्कील होती.

माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 05/10/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
"फक्त मला एव्हडंच माहित आहे की तो एकदा तरी समुद्रावर आला आणि माझ्या दृष्टीने समुद्रावर येण्याचा मतलब साध्य झाला." मला वाटतं प्रत्येक माणसाने जीवनात एकदा तरी समुद्राला भेट देऊन यावं.मी माझ्या अगदी लहानपणापासून समुद्राशी एकरूप झालो आहे.वेंगुर्ल्याचा समुद्र आणि आमचं घर जेमतेम तिन मैलावर आहे. तेव्हापासून समुद्राचा मला दिलासा लाभला आहे. आतापर्यंतच्या माझ्या जीवनात मला प्रेरणा देण्याच्या समुद्राच्या क्षमतेपासून मला सदैव प्रसन्नता मिळाली आहे.त्याच्याकडून मला नेहमीच उत्साह मिळाला आहे.

मनात आकांक्षा ठेऊन जगावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 03/10/2009 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज मी प्रि.वैद्यांच्या घरी गेलो होतो.अलीकडे प्रो.देसायांना बरं नसतं म्हणून ते घरीच असतात.मी वैद्यांना म्हणालो आपण दोघे बोलत बोलत तळ्यावर फिरायला जाऊंया.माझी कल्पना त्यांना आवडली. मी वैद्यांना म्हणालो, "प्रिन्सिपल साहेब,बरेच वेळा मी पाहलंय की काही माणसं स्वतःला खास समजतात.ही ह्या लोकांची वृत्ती कशी निर्माण होते.?" माझा प्रश्न ऐकून प्रि.वैद्य हंसत हंसत मला म्हणाले, "कोणी काही खास नसतो.उदाहरण म्हणून, रस्त्यावरून जाणारी एखादी स्त्री चापचापून साडी नेसलेली असली आणि ठुमकत ठुमकत चालत असेल तरी ती काही खास आहे असं म्हणता येत नाही.एखादा स्वतःला अगदी आदर्श समजणारा सुद्धा काही खास नसतो.पण कृपाकरून माझ्या

कथा दोन साधुंची

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 29/09/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
हैयो हैयैयो यांनी न्यायशास्त्रातील एका कोड्यावर नुकतीच एक उद्बोधक आणि रंजक चर्चा घडवून आणली. त्यातून एक मूलभूत प्रश्न निर्माण झाला. तो असा की सामाजिक अन्यायाची सुरुवात नेमकी कुठुन होते? मी पूर्वी लिहिलेल्या या कथेत या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला आहे. - युयुत्सु राजा विक्रमादित्याने आपला हट्ट काही सोडला नाही. त्याने झाडावरचे प्रेत आपल्या खांद्यावर ऒढून घेतले आणि तो स्मशानाचा रस्ता चालू लागला. राजाच्या चिकाटीने प्रभावित होऊन प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटतॆ.

अमेरिकन काटकसरी झाला.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 26/09/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
आता पर्यंत अमेरिकेत सोन्याचा धूर जळत होता.साधारण २००७ पासून सर्व धूर जळून गेला.अमेरिकन कफल्लक झाला.आणि त्याला तोच जबाबदार आहे. त्याची हांव,ग्रीड,नडली. आहे त्यापेक्षा अधिक हवं,दोन माणसांना पाच बेडरूमचं घर हवंच.मॉलमधे जायचं, दिसेल ते खरेदी करायचं, आणि घरी आणायचं. कालांतराने ते अर्धवट वापरून किंवा न वापरून घरात झालेल्या वेअरहाऊसमधे दामटून टाकायचं.कां तर अमेरिकन एकॉनॉमी "अर्न ऍन्ड स्पेन्ड" वर चालते.क्रेडीट कार्डावर दहा दहा हजार, डॉलर्स कर्ज काढा.

कुलंग... जेथे आकाश ठेंगणे वाटते...

लेखक विमुक्त यांनी शुक्रवार, 25/09/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
"येत्या विकऐंडला कुलंगला जायचा बेत आहे... येतोस का?" असा राहुलदादाचा SMS आला... खूप दिवसांपासून मला कुलंगला जायच होतं... कळसुबाईच्या कुशीत अलंग, मदन आणि कुलंग विसावले आहेत... इगतपुरीच्या परिसरात अजीबात भटकलो नव्हतो... तिकडच्या डोंगररांगा जरा वेगळ्याच आहेत... आकाश सुद्धा ठेंगण वाटावं असे उंच डोंगर आहेत... मग शुक्रवारचं काम संपवून मी बदलापुरला राहुलदादा कडे पोचलो... रात्री सगळी तयारी करुन झोपी गेलो... पहाटे ५.४६ च्या लोकलने कल्याणला पोचलो आणि मग कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधे चढलो... राहूलदादा, अरुण सर, निलीमा मँडम, अवळे सर आणि मी असे आम्ही पाचजण कुलंगला चाललो होतो...