Skip to main content

कथा

सुरुवात

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 27/10/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मराठवाड्यातील माळाकोळी या गावातील महिलांनी एकत्र येवुन, आंदोलन करुन गावात यशस्वीरित्या दारुबंदी करवुन आणली. त्या रणरागिण्यांना मानाचा मुजरा करुन त्या घटनेवर आधारीत ही कथा लिहीली आहे. मुळ दुवा : लोकप्रभा / स्त्रीशक्ती विशाल कुलकर्णी ******************************************************************* एक पत्रकार या दृष्टीकोनातून पाहिले तर ही संपूर्ण घटना म्हणजे सॉलीड मालमसाला असलेली जबरदस्त बातमीच होती माझ्यासाठी!

खाणावळ

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 26/10/2009 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी कुमारच्या हट्टापुढे प्रियाचं काहीच चाललं नाही. ती मुकाट गाडीत बसली. त्याने हसून चावी फिरवली व तिच्याकडे पाहीलं. तिचा मुळचा गव्हाळ रंग आता त्याला लालेलाल भासु लागला. "काय झाल ?" माहीत असुनही त्याने तिला खिजवलं. "काही गरज आहे एवढ्या रात्री निघायची ? सकाळी निघालो असतं तर चाललं नसतं ? पण नाही... मी म्हणतो तेच खरं. कोणाचं ऐकशील तर शपथ." एकदाची त्याला बडबडून ती मोकळी झाली. थोडक्यात का होईना पण मनातलं सगळं कचकचून बाहेर आलं आणि तिचं तिलाच बरं वाटलं. "गोड दिसतेस गं चिडलीस की." त्याने तिची ती चिडचिड मनावर घेतलीच नाही. तिने त्याच रंगात त्याच्याकडे पाहीलं आणि तो गोडसा हसला. तशी ती विरघळली.

आठवांच्या रांगेत

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 23/10/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
चपला बाकड्याखाली सरकवून पुजेचे ताट तिने हातात घेतले आणि ती मुख्य दरवाज्याकडे वळली. गेटच्या दोन्ही खांबाना असलेले नळ चालूच होते. आत शिरणारे सगळेच त्याखाली आपले हात-पाय धुवून पुढे सरकत होते. तिनेही तेच केले. पुढे चार पायर्‍या उतरलं की स्टीलच्या पाईपांनी तयार केलेले 'भुलभुलैय्या' होतं. त्यात शिरायचं आणि शेवटच्या टोकाला दर्शन. ते बालसदरात दाखवतात ना... या उंदराला चीजच्या तुकड्यापर्यंत नेणारा सरळ रस्ता कुठला ? मग हाती एखादी पेन्सिल वा पेन घेऊन सुरुवात करायची. हेही तसचं. हल्ली सगळ्या देवळात असते. जिथे असा प्रकार चालू ते देवस्थान जास्त गजबजतं. त्या देवळाची टीआरपी जास्त. आज दोन ऑक्टोबर.

बुजगावणं

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 19/10/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
जुईली श्रीहरी ढवळीकर. खरतरं मला नुसतं 'जुई' म्हटलेलच आवडते. तो 'ली' नकोच होता सोबत. पण आहे तो आहे. करणार काय ? आई म्हणते, 'कित्या उगाच तोंड वाकडा करतस. इतरांची नावं बघ काय असतत. त्यामानान तुजा बरा हा...... आणि ताही काय जास्त दिवस रवाचा नाय. उद्या लगीन झाल्यार घो बदलतोलो.' मी तर ठरवलय. लग्नानंतर नवर्‍याला सांगून तो 'ली' काढायचा आणि....... सॉरी.... खरचं सॉरी... हे माझं नेहमीच असं होतं. वाहावत जाते बोलताना.... विषय माझा नव्हताच मुळी. तशी मी आहे म्हणा या विषयात. पण खरा विषय आहे काकांचा. पद्माकर ढवळीकरांचा. माझे सख्खे काका. त्यांच्याबद्दलच सांगायचय. पण त्या आधी एक महत्त्वाचं.

पुलं, निळा कोल्हा आणि.....

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 17/10/2009 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
पिपात पडलेल्या निळ्या कोल्ह्याचे पितळ अखेर उघडे पडले आणि सगळ्या कोल्ह्यांनी त्याला राज्यपदावरून पदच्युत करून हाकलून दिले. निळा कोल्हा रानोमाळ भटकत निघाला आणि अखेर तो एका आमराईत आला. आमराईत जरा विश्रान्ती घ्यावी म्हणून तो एका डेरेदार झाडाच्या दिशेने निघाला. झाडाजवळ गेला आणि बघतो तर काय.. ! तिथे मध्यम वयाचा, चश्मा घातलेला आणि मिश्किल हसणारा एक माणूस एका चिमुरड्या मुलीबरोबर गाणे म्हणत होता.