Skip to main content

कथा

शाईचा पेन

लेखक सुधांशू यांनी बुधवार, 21/03/2012 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
'चला दीपक सरकार, जायच का घरी?', एक तासाच्या कंटाळवाण्या मिटिंग मधून बाहेर आल्यावर मी दीपक ला विचारल. दीपक काहीतरी काम सांगून तो मिटिंग ला आला नव्हता, लकी साला. सगळ्यांचे पुढच्या महिन्याचे टार्गेटस ठरवता ठरवता आमच्या बॉस ने आमच्या डोक्याला झिणझिण्या आणल्या होत्या. खूप बिझी दिवस होता आज. कस्टमरना पटवता पटवता नाकी नऊ येत होते, तरी पण आज मी १० कॉम्पुटर विकले होते. संध्याकाळी ५ वाजता कोणी टार्गेट मिटिंगस घेत का? पण या बॉस लोकांना सांगणार कोण? 'नाही रे थांब जरा, अजून वेळ आहे', दीपक म्हणाला.

स्पिड वॉझ ६०-७० भाग-१

लेखक चिम् चिम् मामा यांनी शनिवार, 17/03/2012 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
वार शुक्रवार, संध्याकाळ्चे ०४:३०-५ वाजले असतील...कॉप्रोरेट ऑफिसच्या ए/सि मधुन बाहेर पडलो आणि पुण्याच्या उकाड्यात एंट्री मारली. खिशातुन मोबाइल काढला आणि भाग्याला फोन केला. लास्ट डायल लिस्ट मध्ये तिचाच नंबर होता. .. दोन-तिन रिंग गेल्या ती कॉल पिक करत नव्हती, म्हणुन कंर्फम करायला मोबाइल स्क्रिन पाहिली... "हो तिलाच लावला आहे फोन, मग का नाही उचलत आहे कॉल?" मी स्वता:शिच बोललो. "हा बोल स्वॅप..." पलिकडुन एकदम ऑर्डरच आली.

<गोवरी>

लेखक यकु यांनी गुरुवार, 15/03/2012 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी उगाच्या उगाची किती कुंथीशी मानवाची नसे कोणतीही स्थिती चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी जात जातीत भेदे अशी ती कशी जळेना कळेना मढी जाळीशी बाबारे कोरडे तरी तेच आहे लिहिशी कविता तू ती कशाने अशी यात ना काही तरी तू तोच आहे पिसारा कशाला उगा दाविशी करावे भरावे उणे तूच पाहे खपावे मरावे गोवरी जाळताहे (कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )

वांझोटा...

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 13/03/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
बोंबला, तिच्यायला माझी बायको बायको म्हणुन जिला जीव लावला, दहा वर्षे जे तिला सोसावं लागलं ते सोसायला मदत केली, बोललो असेन एक दोन वेळा मी सुद्धा चिडुन, पण म्हणुन असं पदरचं दुखः इंटरनेटवर मांडावं, ह्या देशात कायदा आहे म्हणे की, बलात्कार झालेल्या बाईचं नाव डायरेक्ट लिहित नाहीत, मग हे कसं काय चालतं. हा काय बलात्कार नाही का, म्हणजे जे नटरंग मध्ये दाखवलं तसं झालं तरच पुरुषावर बलात्कार होतो का, बायकांची मनं जळतात, करपतात, उध्वस्त होतात आणि पुरुषाच्य मनाला काय नवी पालवी फुटते, पालीला शेपटी फुटते तशी ?

" वांझ .."

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 08/03/2012 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरच्या सर्व स्त्री सभासदाना ' जागतिक महिलादिना ' च्या हार्दिक शुभेछा ..!! __________________________________________________ " वांझ .....!!" लागतो ना हा शब्द? तोडतो कुठेतरी आत ,अस काहीतरी करून जातो ,कि परत उभारी घेण कदाचितशक्यच होत नाही. दोन अक्षर एका अनुस्वराला घेवून दिमाखात समोर येतात ,एका असह्य स्त्रीच्या तिच्या भावना तिच्या संवेदना ह्यांच्यावर जोरदार वार करतो ,तोही एका फटक्यात .मागचा पुढचा विचार न करता . तिला काय वाटेल? तिच्या मनाला लागेल का?? तिला नकोय का मातृत्त्व? तिला नकोय का एका इवल्याश्या शरीराची उब .?

मालविका

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/03/2012 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ रात्रीची होती..त्यांतून अमावास्या असल्याने वातावरण काळोखात बुडून गेले होते.. त्या निर्जन भागात तो जीर्ण प्रासाद भयाण पणे उभा होता...आत एक मंद पणे मिणमिणता दीप तेवत होता.. प्रासादाच्या सोपानावर मालविका कुणाची वाट बघत बसली होती? मुख कमल म्लान झाले होते.व पाणीदार नेत्रातली प्रभा मंद झालेली होती..नजरेत एक क्लांत शिणलेला भाव होता.तरी मालविकेचे सौंदर्य वेड लावेल असेच होते..गौरांगनेची काया फिकट पडली होती..तर अधर सुकलेले वाटत होते.. दूर बाजूला एक मरणोन्मुख असा वृद्ध बसला होता...देवदत्त असे त्याचे नाव आहे..शरीरावरची कातडी लोंबत होती..डोक्यावरचे केस गेलेले...डोळे आत खोल गेलेले ..शक्तिहीन असे ते कले