Skip to main content

सध्या वाचत असलेले पुस्तक - बाईकवरचं बिह्राड

सध्या वाचत असलेले पुस्तक - बाईकवरचं बिह्राड

Published on मंगळवार, 28/02/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
"बाईकवरचं बिह्राड" मी सध्या वाचत असलेले पुस्तक... काही तरी वेगळे वाचावे म्हणुन मागच्या आठवड्यात क्रोसवर्ड मध्ये पुस्तके पहायला गेलो होतो... आणि एक पुस्तक नजरेस पडले... सह़ज चाळले.... आणि माझ्या सारख्या बाईक वेड्याला हे पुस्तक वाचायचा मोह झाला. डॉ.अजित हरिसिंघानी यांनी one life to ride लिहिलेले आणि सुजाता देशमुख यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक. पुणे ते लेह प्रवास डॉ.अजित हरिसिंघानींनी बुलेट वर केला... त्याचेच हे प्रवास वर्णन. मी सुद्धा असे काही प्रवास...(पुणे- मुंबई, पुणे-कोल्हापुर, .... ३०० ते ४०० किलोमिटरचे प्रवास) केले असल्याने आणि मला हे पुस्तक वाचावेसे वाटले... या पुस्तकानी मी प्रेरणा घेइन...आणि असाच एक लांबचा प्रवास करेन असे वाटले.... पण काही कारणाने मला हा योग अजुन तरी नाही आला पण... एकदातरी मी असा प्रवास नक्किच करेन... आता या पुस्तका विषयी... या पुस्तकात तुम्हाला कुठलाही प्रेरणादायी प्रसंग वाट्णारा नाही... पण एखादी गोष्ट किंवा प्रसंग किती सहजपणे घ्यावी याचे सुरेख, विनोदमुख वर्णन आहे. या पठ्ठ्याला संपुर्ण प्रवासात एकदाही त्रास किंवा अडचण आली नाही.... की त्याने त्या गोष्टिंचा जास्त बाऊ केला नाही... मला तर या गोष्टिचे आश्चर्य वाटते की... त्यांच्या घरच्यांचा त्याला बिलकुलच विरोध कसा नव्हता? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे.... लेखकाने संपुर्ण पुस्तकात कुठेही निराशावादी आणि भावनिक मने जिंकण्याचा प्रयत्न केला नाही याचे मला कौतुक वाटते. पुस्तक सुरुवातिला फार कंटाळवाणी वाटते... वाचण्याचा वेग पहिल्या गिअर मधेच अडतो... हळु हळु गाडी वेग पकडायला लागते... आणि नंतर सुसाट पळते.... डॉ.अजित हरिसिंघानींची बुलेट मस्त वेग धरते... संपुर्ण प्रवास मजेत कसा हे जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.
लेखनप्रकार

याद्या 1891
प्रतिक्रिया 4

हे पुस्तक खरेदीच्या यादित समाविष्ट केल्या गेले आहे..... अजुनही तुमच्या आवडीची काही पुस्तके असतील तर सान्गा.....(मला पुस्तकाचे परिक्षण नसले तरी चालते...."बाराला दहा कमी" हे पुस्तक तर मी असेच मित्राने सुचवले म्हणुन वाचले...आणि नन्तर विकत पण घेवुन टाकले...आणि आज्-काल गुगल व विकिपेडिया असल्यामुळे नुसते नाव समजले तरी चालुन जाते....) http://full2dhamaal.wordpress.com

पुस्तक मिळालं कि वाचुन काढेन........ मि बाईक वर केलेला केरळ प्रवास इथे वाचा... जमवा तुम्ही पण असचं काही तरी.......

वन लाईफ टू राईड वाचलय, छान आहे.