मित्रहो ,
परवा काही कामानिमीत्त पुण्याहून नाशिकला येण झालं, त्याचा हा वृत्तांत ....
प्रवास म्हटला की कधी कधी कंटाळवाणा असतो तर कधी कधी एखादा चुस्त अनुभव देउन जातो. तुम्ही कोठे आणि कुणाबरोबर प्रवास करताय यावर बरच काही ठरतं.शिवाय प्रवास आपण कशानं करतोय यावरही बरच काही ठरत असतं.
असो, बरच विषयांतर झालं, मुळ मुद्यावर येतो, नमनालाच घडाभर तेल नको घालायला.
नाशिकला लवकर पोहोचायचं असल्याने पहाटे चारला मला उठवायला पार्टनरला सांगून ठेवले. त्याची सध्या नाईट शिप्ट संपून गेलेली होती पण त्या शिप्टच्या सवयीमुळे त्याला रात्री झोप लागत नाही. त्यामुळे त्याने बरोबर चार वाजता ओरडून उठवले.