Skip to main content

कथा

ती, तेव्हा तशी

लेखक इष्टुर फाकडा यांनी शनिवार, 18/02/2012 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
माहित नाही जे लिहितोय ते पूर्ण करू शकेन का नाही.. कारण ज्याचा निर्धार करून लिहावं लागतं त्याच्या शेवटाची खात्री नसते असा माझा अनुभव आहे. शिवाय हि गोष्ट सुमारे मी सातवीत असल्यापासूनची; म्हणजेच आजपासून पंधरा वर्षांपेक्षा जास्तच जुनी. मी आमच्या गावाच्या 'पूर्ण प्राथमिक' शाळेत शिकत असतानाची. काकाने पुण्यात पहिला ब्लॉक घेतला होता तेव्हा. नवी सोसायटी, नवी कपल्स, नवीनच पिल्लं सगळे असे मस्त कोवळे. त्यात 'पुण्याचं' आकर्षण, तिथल्या पोरांचं, पोरींचं दिसणं आणि असणं सगळंच छान, जवळ ओढून घेणारं. आणि त्यात गुलाबी वय; नुकतीच सोनेरी फुटायला लागली होती, असं.

बंडुचा धंदा.. :)

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 13/02/2012 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक.. नेहमीप्रमाणे दर ५ सालांनी महापालिका निवडणुका येतात, तशा त्या यंदाही आल्या. महापालिका निवडणुका म्हणजे बंडुचं ५ सालातून एकदा भरघोस उत्पन्न मिळण्याचं पिक. या वर्षीही बंडुने पेरणी-लावणी-कापणी म्हणून जे काय करतात ते सारं केलं आणि त्याला पुन्हा एकदा ५ लाखांचं भरघोस उत्पन्न मिळालं आणि बंडू आज सकाळीच कोकण रेल्वे पकडून चाराठ दिवसांकरता बायको आणि लेकीला घेऊन गोव्याला मस्त मजा करण्यासाठी रवाना झाला! :) बंडु आपल्या विभागात, विशेष करून विभागातल्या 'अबक' समाजात तसा फेमस माणूस. सुशिक्षित, सगळ्यांना मदत करणारा, नेहमी हसतमुख असा.

निद्रेचा तुरुंग

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शनिवार, 11/02/2012 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
१९६६, १९६७ अणि १९६८ साली पावलो कोएल्होला मानसिक रुग्ण ठरवून समाजाला घातक ठरण्याची शक्यता आहे असे सांगून द्वाखान्यात भरती करण्यात आले. त्यावेळी त्याने लिहीलेली ही काही पाने.......... ही पाने ब्राझीलच्या सिनेटमधे वाचून दाखवण्यात आली आणि या संदर्भातील बरेच कायदे बदलण्यात आले व अशा रुग्णांकडे माणूसकीच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची पद्धत रूढ झाली. निद्रेचा तुरूंग. – स्वैर भाषांतर. २० जुलै, बुधवार. ८.०० रक्तदाब घेण्यासाठी मला त्यांनी उठवले तेव्हा मला कळाले की मी स्वप्नात नव्हतो. हळुहळू माझ्या डोक्यात वास्तव शिरायला लागले. त्यांनी मला लगेच कपडे करायला सांगितले.

बिल्लेकर

लेखक सुधीर मुतालीक यांनी शुक्रवार, 03/02/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
"....अप्पांनी खास तुमाला आमंत्रन द्याय सांगतलय. नक्की याच." सकाळी सकाळी अतुलराज चा फोन. जरा धक्काच. अप्पांच्या एकसष्ठीचा मोठा सोहळा करायचे ठरलंय. त्याचे आमंत्रण करत होता. " अरे पण अप्पा तयार झाले कसे ? जरा आश्चर्यच वाटतंय. " "हा दादा, कमाल झाली खरी. गावाच्यानी या एळी पार हट्ट केला. शेवटी हुकमी एक्का गाठला. ताईसाकड गेले. ताईसा हो म्हणली. म्हणली करू. म्हणली मी मनौते अप्पास्नी.अप्पा म्हणले कुनी राजकारनी नको मंचावर तर तयार हुईल. ताईसा हो म्हणली. मग काय दिवाळीच.कारकान्याच्या मैदानवच ठुलाय पोग्राम. नक्की याव." ताईसा अप्पांची धाकटी मुलगी. वय असेल ३२ च्या आसपास. पण अख्ख्या गावची ताई.

आईपण

लेखक सुषमा आर्या यांनी शुक्रवार, 03/02/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
'आई' या शब्दातच सारं जग सामावले आहे. आईपण मिळण्यासाठी प्रत्येक स्त्री किती आसुसलेली असते. मी एका private हॉस्पिटलमध्ये assistant customer care म्हणून जॉब करत होते. तिथली माझी सहकारी आणि मैत्रीण कविता. कविताचा नववा महिना संपत आला होता. हॉस्पिटलमध्ये स्त्री कामगारांना insurance policy द्वारे बाळंतपणाचा खर्च मिळत असे. त्यामुळे ती निश्चिंत होती. त्या दिवशी telephone operator न आल्यामुळे EPBX बोर्ड वर माझी duty होती. आणि त्याच दिवशी कविताला मुलगी झाली. मुलगी अतिशय सुंदर होती.

शेलू !!

लेखक शरभ यांनी रविवार, 29/01/2012 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेजचे दिवस होते. घरी चाललो होतो. नेहेमीप्रमाणे थाण्यावरुन कर्जत पकडली, २:२८ ची. ही डबल फास्ट लोकल डोंबिवली, कल्याण करत, कल्याणनंतर सर्व स्टेशनवर थांबते. बरोबर मित्रदेखील होता. तो डोंबिवलीचा होता. अशाच गप्पा मारता मारता मित्र म्हणाला- काय रे, हे शेलू कुठे आहे ? मी म्हणालो - तुला बदलापूर माहिती आहे. त्यापुढे वांगणी आणि मग शेलू. आणि मग नेरळ... जिथून माथेरानला जाता येतं...का रे ? तो म्हणाला - अरे सहजचं. आणि डोंबिवली आल्यावर तो उतरून गेला. मी विचार केला- थोडा वेळ आहे तर एक छोटी नॅप मारुन घेऊ. तशी असली नॅप म्हणजे नेहेमीचीच असायची. थोड्यावेळाने डोळे उघडले आणि हात ताणून आळस दिला.