Skip to main content

" वांझ .."

" वांझ .."

Published on गुरुवार, 08/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
मिसळपाव वरच्या सर्व स्त्री सभासदाना ' जागतिक महिलादिना ' च्या हार्दिक शुभेछा ..!! __________________________________________________ " वांझ .....!!" लागतो ना हा शब्द? तोडतो कुठेतरी आत ,अस काहीतरी करून जातो ,कि परत उभारी घेण कदाचितशक्यच होत नाही. दोन अक्षर एका अनुस्वराला घेवून दिमाखात समोर येतात ,एका असह्य स्त्रीच्या तिच्या भावना तिच्या संवेदना ह्यांच्यावर जोरदार वार करतो ,तोही एका फटक्यात .मागचा पुढचा विचार न करता . तिला काय वाटेल? तिच्या मनाला लागेल का?? तिला नकोय का मातृत्त्व? तिला नकोय का एका इवल्याश्या शरीराची उब .? तिला वाटत नसेल का ,कि आपलाही पान्हा फुटावा ?नाजुकशी पावल घरभर चालावी? पण तिच्या वाटण्याचा विचार इथे करतोच कोण ?. ती दिसली कि फटकन हा शब्द येतो .कुणी कुणाच्या कानात तर कुणी तिला मुद्दाम ऐकू येईल अस ,तर कुणी कहर करतो टोमणा मारतो तिच्या आधीच जखमी मनावर पुन्हा शब्दांची जखम करतो .मग ती बळावत रहाते ..नासूर बनते सतत तिला त्या शब्दाची आठवण देत रहाते . रेषु अशीच होती ,हळवी होती .आधीच साधस बोलल तरी डोळ्यात पाणी आणायची . मी पाहिलंय तिला रडताना लपून लपून रडायची ओला झालेला पदरही लपवायची .ती कुणाच्याही कसल्याच कार्यक्रमाना जायची नाही ,कुणाच बारस, कुणाच ओटी भरण ,कुणाची सत्यनारायणाची पूजा कि कुणाच लग्न .नाही जायची .लोकांच्या विचित्र नजरा टोचतात म्हणायची .प्रत्येक जन तुटून पडत , "काय ग अजून काहीच नाही का?" अग कुठ देवाबिवाच तरी बघायचं ?...चांगल्या डॉक्टरांकडे जाताय कि आपल पैसा पैसाच करून बसताय ? हे वांझोट पण फार बेक्कार बाई ".. असल ऐकून रेशुचा श्वास गुदमरायचा . त्यापेक्षा घरी थांबलेलं बर म्हणायची . परवा शेजारच्या काकूंकडे त्यांच्या वहिनीची सुन आली होती ,तीच गोंडस बाळ घेवून .रेषुहि तिथे गेली होती तर काकुनी तिची ओळख कशी करून द्यावी ? म्हणाल्या हि रेषु ..अकरा वर्ष झाली लग्नाला पण अजून काहीच नाही..वांझोट पण नशिबी आलय पोरीच्या ". रेशुला कुणीतरी बेसावध असताना दगड मारल्यासारख वाटून गेल . हल्ली कुठेच जात नाही .दिवसभर खोलीत अंधार करून पडून असते .कुणाशीही मन मोकळेपणाने बोलत नाही बाबांची फार आठवण येते तिला .एका शब्दानेही रेशुला न दुखावणारे आणि तिला कसल्याच गोष्टीनी दुखः होणार नाही याची काळजी घेणारे तिचे बाबा हल्ली रेशुला फार फार आठवतात , तिला बोलावस वाटत त्यांच्याशी ,भेटवस वाटत त्याना ..पण टाळते जीवावर दगड ठेवून ,ओठांवर आलेला शब्दही मागे फिरवते .बाबांचा आधार होता तिला ,पण रेशुला वाटायचं त्यांची आजोबा होण्याची इच्छा ती पूर्ण करू शकत नाही .त्यांना रेशुच्या बाळाला खांद्यावर बसवून ,”गावातल्या वाण्याकडच मोठ्ठ चोकलेट द्यायच्य “.अस म्हणायचे . गेल्या चार वर्षापासून बाबा तिच्या घरी येत नाहीत ,तिच्या घरचे त्यांच्यासमोर तिला वांझ म्हणायचे .असल सोंग आमच्या पदरात जाणूनबुजून बांधलत म्हणायचे .तिच्या बाबाना सहन व्हायचं नाही . तिला स्वतःच्या समोर रडताना पाहून काळजात तुटायचं त्यांच्या ,पण हल्ली रेशून बाबांच्या समोर अजिबात रडायचं नाही ठरवल होत .फायदा तर काहीच नव्हता ह्या ठरवण्याचा ,कारण बाबा तिच्या घरी परत येणार नाहीत हे तिला मनोमन माहित होत . स्त्रीच मन शेवटपर्यंत आशा सोडत नाही .खरच सोडत नाही आणि का सोडावी तिने ?. ती ' आशा 'एकच अशी गोष्ट आहे कि जी स्त्रीच मन बांधून ठेवते .तशीच आणखी एक आशा रेशुला होती .कधीतरी तिच्या ओटीत देव लहानस बाळ देईल, तिच्या मांडीवर छोटस शरीर ममतेच्या भावनेला बिलगून विसावेल .त्याचा हलकासा ओझरता स्पर्श तिला सुखाच अतुच्य शिखरगाठण्या इतपत आनंद देईल पण केव्हा ? केव्हा होणार अस? रेशु आता सगळ्याच गोष्टीनी त्रासून गेली होती . प्रत्येक महिन्यात होणार्या दवाखान्याच्या वार्‍या तिला असह्य होऊ लागल्या होत्या , पण मुकुंद कडे बघून ती हे सार करायची. तिच्याही पेक्षा बाळासाठी मुकुंदचा जीव जास्त आसुसलेला होता .त्याच्या ,तिच्या कडन असणार्या अपेक्षाच तिला उपचारांसाठी बळ द्यायच्या ,पण ह्याच अपेक्षा कधी कधी रेशुला ओझ्यासारख्याही वाटायच्या .त्या ओझ्याखाली रेशु दबली जायची .मग प्रत्येक महिन्यात प्रेग्नन्सिचा निगेटिव येणारा रिपोर्ट ,तिला त्या अपेक्षांचं पाणी झाल्याच जाणवून द्यायचा. स्वतःलाच दोष देत बसायची .दोष दोघातही नसताना ,तब्बल अकरा वर्षांपासून बाळाची वाट पाहणारे मुकुंद आणि रेशु कुठल्या पापाच फळ भोगतोय अस म्हणून वर्ष ,महिने आणि ओघाओघाने येणारे दिवसही घालवायचे .रेशुला अजूनही आशा होतीच ,रेशुलाच काय पन मुकुंदलाही आशा होती . पण अपेक्षा ,ह्या अपेक्षांनी रेशुची मान अडकवून टाकली होती .श्वास घेताना आणि घेतलेला सोडतानाही. त्यात रेशुला सुखाचा प्राणवायू मिळायचाच नाही ,हा वायू सुद्धा तिच्याकडन कसलीतरी अपेक्षाच ठेवून आहे अस वाटायचं तिला. याहीपेक्षा वेगळी परिस्थिती रेशुच्या सासूची होती .रेशुचा स्वभाव मुळातच हळवा आणि सुंदर होता .तिच्या स्वभावगुणांनी तीन घरातली नाती छान जपली होती .मुकुंदच्या प्रेमान तिला नात्यात गुंतायला सहज मदत केली.लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस गेल्यावर तिच्या सासून तिच्या मागे बाळाचा हट्ट धरला .मुकुंदला आणि तिलाही वाटू लागल कि आता घरात छोटासा पाहुणा यावा म्हणून ,पण प्रत्येक गोष्टीला वेळ हवाच असतो .वर्षभर वाट पाहिल्यानंतर त्यांनी डॉक्टरी उपचार चालू केले ,त्यातही वाटच पाहायला लागायची .प्रत्येक महिन्याचे २८ दिवस उलटले कि तिच्या सासुच तिला सारख विचारन ..मासिक पाळीबद्दल चौकशी करण. " ह्यावेळी तरी चांगली बातमी असू दे ग बाई ..!!"अस म्हणनं .प्रत्येक ठिकाणच्या देवाना भरमसाठ नवस करणं . बाळासाठी हे करेन ते करेन ,अंगडी ,टोपडी बरच आणि बरच काही .रेशु कावरी बावरी होवून जायची. तिला वाटायचं ,केवढी हि स्वप्न आणि त्या स्वप्नात वावरण्याची ,ती अनुभवण्याची स्वप्न बघणारी हि माणस. नवीन काहीच नाही ,बहुतेक घरोघरी जिथे स्त्रीला मुल होत नाही तिथे हे आणि हेच चालू असत .कुठे तिला प्रेमाच्या बंधनात ठेवून अपेक्षांच्या गोड शब्दांनी मारल जात तर कुठे तिला " वांझ " सारख्या शब्दांनी टोचल जात . रेशुला अशा तर होती पण शेवटी माणूसच ती ,घरातल्यांच्या ह्याच अपेक्षांनी आणि बाहेरच्यांच्या असल्या शब्दांनी तुटत चालली होती .कुणीतरी मग दत्तक घ्यायचा सल्ला दिला ,त्यावर मुकुंद नाराज झाला . सासूबाई म्हणाल्या .. "दुसर्यांच्या कुलाच्या ज्योतीने आपल घर उजळायची काय गरज ....?" मग ह्यावर उपायही त्याच लोकांनी सुचवला ...." मुकुंदच दुसर लग्न ". मुकुंदच रेशुवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम होत .दुसर्या लग्नाचा विचार करणही मुकुंदला विश्वासघात केल्यासारखं वाटायचं .ते शक्यच नव्हत पण कुणी रेशुला विचारल का? तिला काय हव होत नक्की ?..माणूस जेव्हा रोज रोज अंधारातन चालू लागतो तेव्हा तो उजेडातन चालायचाच विसरून जातो .रेशुच अगदी तसच झाल होत ,हिरमुसून गेली होती .रेशु रोज नव्या दिवसाकडन आपल एकच मागण मागायची .येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी आशा बनून यायचा पण ..हल्ली अस काहीच घडत नसल्यासारखं वाटू लागल होत .हस्ती खेळती रेशु ,सतत बडबडनारी रेशु कुठेतरी हरवली होती .ती कुठे हरवली होती हे तिच्या घरातल्या आणि आजूबाजूच्या सगळ्याच लोकाना माहित होत ,पण ..पण तिला ह्यातून बाहेर कोण काढणार? कुणाचा आधार तिला मिळणार ? मातृत्वाच्या सुखासाठी तिचा जीव इत्तारांपेक्षाही कितीतरी पटीन झुरतोय हे लोकाना काय कळणार . दत्तक मुल म्हणजे मुकुंदला दुसर्या कुणीतरी निपजलेल मुल वाटत होत तर सासूला स्वतःच्या खानदानाच नाव लावणारा ,स्वतःच्या खान्दानातच जन्म घेणार मुल हव होत .ह्यात कुठेतरी रेशुची होणारी घुसमट कुणाच्याही लक्ष्यात येत नव्हती . प्रत्येक स्त्रीला आई होण म्हणजे स्त्री जन्माच सार्थक होण तिच्या स्त्रीत्वाला मातृत्वाची देवान दिलेली अनमोल भेट .पण हि भेट प्रत्येक स्त्रीच्या नशिबात असतेच अस नाही मग जिला आई होता येत नाही त्या स्त्रीच स्त्रीत्व इतक कमी का लेखल जात ? ' वांझ ' निपुत्रिक अश्या शब्दांची टोचणी का दिली जाते ? का त्यावेळी तिच्या मनातल्या स्त्रीमनाला समजून घेतल जात नाही ? बाळाच्या जन्मासाठी स्त्री जेवढी जवाबदार तेवढाच पुरुषही असतो , तसच दुखः दोघांचही सारखच असत . ' बाबा ' अशी हाक ऐकायला मुकुन्द्चेही कान तरसले होते पण त्याच्या मनातली हि दत्तक मुलाबद्दलची कडी काही केल्या त्याला निघत नव्हती. त्याच एका कडीमुळ रेशुच्या मनाच दार तिला इच्छा असतानाही खोलता येत नव्हत.रेशुला फक्त बाळ हव होत ,ते कुणी जन्माला घातलय का घातलय ह्याच्याशी तिला काही एक घेनदेन नव्हत . आई ह्या जिवंत शब्दानच तिला आपल सुख पदरात भरभरून घ्यायचं होत ,नाजुकश्या ओठातून निघणारे बोबडे बोल ऐकून त्याना समजून घेण्याचा निरागस प्रयत्न तिला करायचा होता ,त्याला इवलेसे घास भरवायचे होते ,खूप सारी स्वप्न तीही पहात होती पण तिच्या स्वप्नांना एक बांध होता ,मुक्तपणे बघताही न येणारी स्वप्न उराशी बाळगण्याच धाडसच म्हणायला हव . स्त्री कधीच वांझ नसते .तिच्यातली ममता नेहेमीच जागी आणि जिवंत असते स्वतःच्या पोटी जन्म दिला नाही म्हणून ती वांझ असण किती हे अडाणीपणाचे विचार .तिची तळमळ कुणालाही सांगून समजण्यासारखी नसते .आभाळभर मायेच पांघरून छोट्याश्या पिल्लावर घालायची आस हि ममतेला असतेच त्याच पिल्लावर उनपावसातही तग धरून राहणार्‍या झाडासारखी सावलीही तिला धरायची असते पण त्यासाठी तिला ते पिल्लू आपलच हव आपल्याच रक्ता मासांच हव हा अट्टाहास का ?कशासाठी?. रेशुही अशाच वातावरणात गुदमरली होती .मुकुंदच्या प्रेमाचा विळखा सोडवत नव्हता .त्याच्या अपेक्षांचं ओझ खांद्याना पेल्वेणासही झाल होत पण त्या परिस्थितीत मुकुंदला समजावण्याचा प्रयत्न मात्र ती करूच शकली नाही .तिला वाटायचं ,त्याच्या मनातल त्याने मोकळेपणाने सांगितलं ,त्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही मग त्याच्या भावनांचा जीव घेण्याचा अधिकार मला नाहीय .मग त्यात स्वतःच्या स्वप्नांची पंख जळून राख झाली तरी चालतील .अंधार्या खोलीत स्वताहाला जखडून घेणार्‍या अश्या किती तरी रेशु आहेत ,किती तरी रेशु लोकांच्या जळजळीत शब्दांचे घाव सोसतात अगदी स्वतःला वाळीत टाकून घेन्याइतपत वेळ त्यांच्यावर येते . मुल जन्माला घालण्यासाठीच स्त्रीचा जन्म असतो ,नाहीतर तिच्या स्त्री होण्याचा काहीच फायदा नाही अस समजणार्‍या ह्या समाजाला त्या स्त्रीच्या अंतर्मनातल्या वेदना कधी कळणार ?कधी तिच्याही श्वासात , तिच्या अपेक्षांची वर्दळ , त्यांची चाहूल असते हे तिला वांझ म्हणणाऱ्या लोकाना कस कळणार .तिला बोलता येत नाही पण तिच्या आसवांचा प्रत्येक थेंब आक्रोश करून सांगत असतो कि " मलाही आई व्हायचयं ..मलाही मातृत्वासारख देन जपायचयं ..मलाही माझ्या बाळाला जोजवायचय..मलाही ...मलाही आई व्हायचय...मलाही आई व्हायचय .....!" ************************************************************
लेखनप्रकार

याद्या 8995
प्रतिक्रिया 33

अश्या वेळी मला सासु या नावाचं ( नात्याचं ) आश्चर्य( राग येतो म्हणा हवे तर ) वाटत !! स्वता स्त्री असुन ....असो ...एका वांझ स्त्री ची एक सत्य-कथा लिहीणार होतो, पण विषयाची मांडणी करताना गंडलो, (स्त्री चे अंतर्मन लिहायला अवघड जात होते) पुर्ण केले नाही. असो .. (फुकटचा)सल्ला : लेख पेस्ट करताना , र्या आणी र्‍या ची काळजी घेत चला !!

एकच सांगते. विषय नाजूक आहे.. तितकाच गुंतागुंतीचाही आहे. चांगला हाताळला आहे.. पण तेच ते .. तेच ते... फार झालंय! म्हणजे रेशुच मन असं झालं.. रेशु अशी झाली आणि तशी झाली... तोच तो पणा आलाय. त्यामुळे थोडंसं कंटाळवाणं झालंय. राग नसावा, पु ले शु.

In reply to by दादा कोंडके

+१, डोश्याचं पीठ तव्यावर टाकुन वाटी गरागरा खुप जास्त फिरवली की ते खालच्या गरम तव्याला चिकटुन बसतं, अन मग त्याचा डोसा होत नाही, तसं झालंय, थोडं कमी फिरवलं असतं ना तर व्यवस्थित डोसा निघुन आला असता, आता तवा खरवडणं आलं.

In reply to by ५० फक्त

+१, डोश्याचं पीठ तव्यावर टाकुन वाटी गरागरा खुप जास्त फिरवली की ते खालच्या गरम तव्याला चिकटुन बसतं, अन मग त्याचा डोसा होत नाही, तसं झालंय, थोडं कमी फिरवलं असतं ना तर व्यवस्थित डोसा निघुन आला असता, आता तवा खरवडणं आलं. >>>>> स्वप्नात पण खाणे दिसत असेल ह्या हर्ष ला ;)

In reply to by सुहास..

एकदा झिग अँड शार्को ही कार्टुन मालिका पहा, एक मर्मेड आणि तिच्यावर प्रेम करणारा एक शार्क मासा, दुस-या बाजुला एक तरसासारखा दिसणारा प्राणी, ज्याला ती मरमेड खायची आहे आणि त्याचा असिस्टंट खेकडा, जाम भारी प्रकार आहे, आणि सोने पे सुहागा म्हणजे, हा प्रकार हिंदि डबिंगसह पहा, शार्क - सनी देवल, तरस - सैफ अली खान आणि खेकडा - अर्शद वारसी, असलं डबिंग आहे. आणि खाण्याबद्द्ल काय बोलताय, आमची स्वाक्षरी बोलतेच आहे, परवाचं सांगतो, दक्षिंणायन जेएम रोड्,पुणे (अतिशय भिकार हॉटेल आहे, स्वताच्या काय दुस-याच्या काय कूणा च्याच खर्चाने जाउ नये) भात, अप्पम, एक दोन चटण्या + गाडीवर थालिपिठे + सांगली भेळ पुरी + कॅड बी + घरी येउन पोराबरोबर सायभात खाल्ला आहे . वेळ संपत आली आहे ना.

लेखन खरेच खुप हेलावणारे आहे.
" वांझ .....!!" लागतो ना हा शब्द? तोडतो कुठेतरी आत ,अस काहीतरी करून जातो ,कि परत उभारी घेण कदाचितशक्यच होत नाही. दोन अक्षर एका अनुस्वराला घेवून दिमाखात समोर येतात ,एका असह्य स्त्रीच्या तिच्या भावना तिच्या संवेदना ह्यांच्यावर जोरदार वार करतो ,तोही एका फटक्यात .मागचा पुढचा विचार न करता . तिला काय वाटेल? तिच्या मनाला लागेल का?? तिला नकोय का मातृत्त्व? तिला नकोय का एका इवल्याश्या शरीराची उब .? तिला वाटत नसेल का ,कि आपलाही पान्हा फुटावा ?नाजुकशी पावल घरभर चालावी? पण तिच्या वाटण्याचा विचार इथे करतोच कोण ?.
पहिली सुरवातच अशी विषयात गुरफतुन टाकणारी.
स्त्री कधीच वांझ नसते .तिच्यातली ममता नेहेमीच जागी आणि जिवंत असते स्वतःच्या पोटी जन्म दिला नाही म्हणून ती वांझ असण किती हे अडाणीपणाचे विचार
खरे बोलला आहात. लिखान आवडले. लिहित रहा... वाचत आहे...

रेशु हे नाव पहिल्यांदाच ऐकले/वाचले. बाकी नायिका तोडगा कढणारी जास्त आवडली असती. सासू चांगली, नवरा सुस्वभावी, हीचीही बाळ दत्तक घेण्यास हरकत नाही, बाकी सगळं ठीक असताना उगाच "मी कध्धी कध्धी बोल्णार नै मनातलं." असं पटत नाही. कथा जुन्या वळणाने जाणारी.

In reply to by प्रास

सदस्य कालावधीही बघा. २ अठवडे दोन तास या काळात सगळ्यांनाच कळेल असं नाही. आंणि मूळ सदस्येचं नाव वेगळच आहे. रेशा हे टोपणनाव आहे. रेखा नाव माहित होतं पण रेशा काय!

हनिमून नंतर हे काय आता असे वाटले होते पण तसे काही नाही हे वाचून बरे वाटले. जरा टेस्ट बेबी वगैरे जमल असत ना ?

काय मना हे भलते धाडस तुला नावडे हरिणी पाडस गोवत्सांतिल पाहून भावां काय वाटतो तुजसी हेवा? कुणी पक्षिणी पिलां भरविते दृश्य तुला तें व्याकुळ करितें स्वतःस्वतःशीं कशास चोरी? वात्सल्याविण अपूर्ण नारी कळालें सार्थक जन्मांतलें कविरायांनी हळूवारपणे चितारल्यात भावना एका स्त्रीच्या

In reply to by अभिजीत राजवाडे

अभिजीत राव : निपुत्रिक ( वांझ - थोडा सँग आहे , वांझोटा / वांझोटी - हे ही अतीशब्द आहेत पण स्त्रीसंवेदना संरक्षक समीती ऊगाच "बाजार ऊठवेल" म्हणून आखडतो आहे.) स्त्री च्या मनातीत भाव चित्रित करणारे हे ग.दि.माडगूळकर यांचे नितांत सुंदर गाणे आहे. गीत-रामायणा मध्ये सुरवातीलाच असलेले हे गाणे ऐकताना अनेक स्त्री-पुरूष ( हळवे व्यक्तीमत्व ) रडत असत. असे कवितांचे / गाण्याचे संदर्भ देताना "श्रेयनाम" देणे अपेक्षित असते असे म्हटले तर कुणाला वावगे वाटू नये. * डिस्क्लेमर : कविता व गाणे/ गीत ह्या मधील वांङंमयीन मूल्ये मान्य नसेल तर हा प्रतिसाद बाद ठरवावा ही विणंती.

ठिकठाक जमलाय लेख. सुद्धलेखनाच्या चुका कमी असत्यातर अजुन वाचनीय झाला असता.

In reply to by अन्या दातार

अन्या, ' सुध ' नाहि ' शुद्ध ' ( सुद्धलेखन हा शब्द आम्हि तरी निदान शुद्धलेखन असा लिहितो :P ) बाकि चुका सुधरवन्याच्या प्रयत्नात आहे . काम चालु आहे , मंडळ आभारि आहे .:)

In reply to by जेनी...

सुद्धलेखन हा शब्द आम्हि तरी निदान शुद्धलेखन असा लिहितो
मग वाट कुणाची पाहताय, लिहायला लागा !!! का ब्रिटिश मेंडेट येणारंय... (कळलं तर ठीक नैतर ब्येष्ट)

अत्यंत संवेदनशील लेख!!! अमंळ हळवं करुन गेला. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

लेख छान! सुरवात मस्तच झालीये!

चांगलं लिहिलंय.. लिहिते रहा. का कुणास ठाऊक, पण ही कविता आठवली - http://www.manogat.com/node/11530 संदर्भ निराळा आहे पण वेदना अशीच तीव्र आहे..

लेखनातला तोच तोचपणा घालवल्यास बरे पडेलसे वाटते. कथेच्या शीर्षकाच्या यानिमित्ताने: लग्न होणे आणि नंतर प्रजनन करणे हीच फक्त इतिकर्तव्यता नाही हे बहुतेकांच्या गांवी नाहीय. त्यामुळे मुलगा असो वा मुलगी, जरा कुठे नोकरी मिळाली की लगेच 'लाडू कधी', तर लग्न लागले की 'पेढे कधी' ही विचारणा चालू होते. त्यात एखादे अपत्य झाले तर 'याला जोडीदार कधी' हे ही चालू होते. थोडक्यात काय, लोकांना नाक खुपसायला काहीतरी सतत हवे असते. यात कधीमधी काळजीचा भाग जरी असला, तरी समोरच्याची तसे काही करण्याची आपसूक उर्मी नसू शकेल किंवा काही अडचणीमुळे ते शक्य होत नसेल हे कुणी विचारात घेत नाही. याला तथाकथित शिकले सवरलेले देखील अपवाद नसतात. मुळात हे प्रश्न विचारताना स्थल-कालाचे भान ठेवले जात नाही, याचा मला स्वतःलाच अनुभव आहे. वंध्यत्व हा शाप नाही. जर कुणाला बाळ होत नसेल तर पुढे काय करावे, हा त्या-त्या जोडप्याचा प्रश्न असावा, कुटुंबाचादेखील नाही. कारण जो काही निर्णय घेतला असेल, तो त्यांनाच पुढे न्यायचा असतो, इतरजण अंग काढून घेऊ शकतात, पण ते जोडपे नाही. किमानपक्षी हे तारतम्य लोकांनी बाळगले, तर पुष्कळसा मानसिक त्रास कमी होऊ शकतो.

@मस्त कलंदर : सहमत. :) लेख छान लिहिला आहे आणि आशु जोग यांची कविता लेखानुरुप व आवडेश. :) पु.ले.शु.

धन्यवाद. चांगल्या,वाईट सगळ्याच प्रतिक्रियेंसाठी . ह्या छोट्याशा लेखातून हेच मांडायचं होत कि , जेव्हा डॉक्टरी उपाय करुनहि काहीच साध्य होत नाहि,तेव्हा दत्तक मुल घेण हा एकमेव सुंदर पर्याय असतो .. पण अशी किती तरी मन आहेत जी ह्या गोष्टीला तयार होत नाहीत ..ह्याला कधीकधी स्त्रीमनही अपवाद नसतो . जोपर्यंत ह्या गोष्टी स्वताहा च्या नात्यातल्या ,,,जवळच्या व्यक्तींच्या वाटयला येत नाहीत ..तोपर्यंत समाजाचा दृष्टीकोन ..सहज साधा ..किवा खूपच वर वर रहातो ..पण हेच सगळ जेव्हा जवळून बघण्याची वेळ येते ..त्यावेळी मात्र .....त्या वेदना सांगूनही समजण्यापलीकडे असतात . आशा आहे कि ह्यातून जे सांगायचय ते घेणारे नक्कीच घेतील ..