Skip to main content

कथा

बैल आहे साक्षीला ..

लेखक साळसकर यांनी सोमवार, 04/11/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
..... त्या गजबजलेल्या बकाल वस्तीतून सौरभ आपल्या साथीदारांसोबत जीव मुठीत धरून चालला होता. इतरांची जणू रोजची पायाखालची वाट असल्यासारखे आरामात चालणे होत होते. सौरभला मात्र ते वातावरण अंगावर येत होते. आजूबाजुच्या वखवखलेल्या नजरा जणू त्याच्याच शरीराकडे लागल्या आहेत असा भास होत होता. अनोळखी रस्त्याने जाताना अचानक एखादे साखळधारी श्वान समोर यावे आणि त्याच्या जबड्यातून वीतभर बाहेर लोंबकळलेली लालचुटून जीभ पाहता कोणत्याही क्षणी तो आपल्या मालकाला हिसका देऊन आपल्या अंगावर तुटून पडून आपले लचके तोडेलसे वाटावे, अगदी असेच सौरभला त्या तिथे झाले होते.

टबुडी टबुडी जसवंती

लेखक तिमा यांनी शनिवार, 02/11/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट तशी खूप जुनी आहे. आई,नाना १९४५ च्या सुमारास मुंबईत आले. मुंबईला त्यांचे कोणीच नव्हते. फक्त नानांची नोकरी भक्कम होती. परवडेल अशी जागा, त्यावेळच्या मुंबईच्या हद्दीबाहेरच मिळत होती. मालाड मुंबईच्या बाहेर होतं. स्टेशनपासून साधारण १० मिनिटांवर एका चाळीत दोन खोल्यांची जागा त्यांना मिळाली. पहिल्या मजल्यावर, ते धरुन तीन बिर्‍हाडे होती. पाणी खालून विहीरीवरुनच आणावे लागे. संडास त्याच मजल्यावर पण बराच लांब. बाकी शेजार कॉस्मॉपॉलिटन! एका बाजुला सिंधी तर दुसर्‍या बाजुला गुजराथी. हे गुजराथी खूपच श्रीमंत होते. (हो, त्याकाळी श्रीमंतही चाळीत रहात.) त्यांची जागा मोठी होती.

मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही

लेखक निरु यांनी गुरुवार, 31/10/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही. आता हे वाचून तुम्हाला वाटलं असेल, आला... आणखी एक पर्यावरणवादी आला. आता हा पतंग, मांजा, त्या पतंगांसाठी होणारी वृक्षतोड आणि पतंगांचा कचरा यावर छान लांबलचक भाषण देणार आणि महा बोर करणार.... नाही!!! काळजी करू नका. माझा तसला कसलाही उद्देश नाही. माझा विरोध त्या पतंगांना किंवा त्या वृक्षतोडीला किंवा खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही.

अधिकार

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 29/10/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्री रोग़ तज्ञ डाँ. पाटील याच्या क्लिनिक बाहेर एक युवती क्लिनिक उघडण्याची वाट पाहत होती.जिन्स पँन्ट घातलेल्या त्या युवतीकडे येणारे जाणारे काही लोक पाहत होते. काही वोळातच क्लिनिकमध्ये नर्स म्हणुन काम करणारी सारिका आली,तीच्या पाठोपाठ ती युवतीही क्लिनिक मध्ये ग़ेली.

टोपीवाला आणि माकड

लेखक mohite jeevan यांनी सोमवार, 28/10/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
एक टोपीवाला शहरातून टोपी विकुण वाटेत झाडाखाली झोपलेला आसतो, झाडाखाली दुपारची विश्रांती घेत आसतो. जवळच्या झाडावर खुप माकडे खेळत आसतात, त्या झाडावरील खेळत खेळत एक माकड टोपीवाला झोपलेल्या झाडावर येते ,माकड त्या टोपीवाल्याला पाहते आणि त्याच्या आग़ांवर एक पेरु टाकते. टोपीवाला झोपेत आसतो आचानक तो जागा होतो, माकड त्याच्याकडे पाहुन दात दाखवते,टोपीवाला हातात काठी घेऊन त्या माकडाला मारायला जातो, पण आचानक ते माकड झाडांवरून खाली येते आणि टोपीवाल्याला म्हणतो, ‘का रे माकडा मला का मारतोस,मी पण तुझ्यासारखा माकडच आहे,’ ‘जा रे माकडा तुला मी काय माकड वाटलो का तुझ्यासारखा?,’टोपीवाला म्हणाला, ‘आरे विसरलास का पुर्वी

थरार..... एक विलक्षण अनुभव - भाग १

लेखक गजानन५९ यांनी शनिवार, 26/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझे लेखन इथे टाकत आहे. येथील हि माझी पहिलीच कथा त्यामुळे प्रतिसाद कसा मिळतोय याबद्दल भरपूर भीती आहे मनात. आशा करतो कि तुम्हा सर्वाना हि कथा आवडेल. आपला गजानन अवांतर – हि कथा इतर ठिकाणी पूर्वी प्रसिध्द केली आहे, मिसळपाव आधी माहित नव्हते गेले काही महिने इथले दर्जेदार लेख आणि एकूण साहित्य वाचून इथे हि कथा टाकायचे साहस करत आहे सांभाळून घ्या इतकीच विनंती हाये. ----------------------------------------------------------------------------------------------------------- गाड्यांच्या आवाजाने सकाळी शेखरला जाग आली वैतागून त्याने मोबाईल मध्ये पहिले तर आठ वाजून गेले हो

शाप

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 25/10/2013 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
(शतशब्द कथा) तिन्हीसांजेच्या संधिप्रकाशात एक कृश आणि अतिजिर्णं असा वृद्ध वटवृक्षाच्या पारावर विसावलेला होता. पारावर एक लहानसे हनुमान मंदिर होते. दिव्याला नुकतीच तेलवात केलेली असावी.लोक येतजात होती. तितक्यात एका लहान मुलाला घेऊन मोठा जमाव तेथे आला. देवदर्शन करून त्यांनी तिथल्या लोकांना प्रसाद वाटला. या वृद्धाला प्रसाद देत एकजण म्हणाला, "आशीर्वाद द्यावा बाबा, घरी पुत्र जन्मला". "मी असा भणंग.. काय आशीर्वाद देणार?" वृद्ध उत्तरला. "या मारूतीरायासारखा चिरंजीव हो म्हणा". वृद्धाच्या चेहर्‍यावर विलक्षण वेदना उमटली. अबोलपणे हात उंचावत त्याने मनोमन आशीर्वाद दिला.

टकाटक

लेखक आतिवास यांनी सोमवार, 21/10/2013 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
परारथना झाली की हजरी घेतेत गुर्जी. घरी बसलेल्यांना पकडून आणाया पोरास्नी पळवत्यात. कंदी कामं असत्यात. तळ्यावरनं पाणी आणा; अंगण झाडा; फळा काळा करा. गमभन लिऊन झालं की पाडे. लंबरपरमानं येकेकाला हुबा करतेत. तेनं वरडायचं, “येक रे ..” की आमी “येकाचा”. धापत्तुर. मंग “येकावर येक अकरा”. पन्नासपत्तुर. गुर्जी येकदम बायेर. च्या प्यायाला, तमाकू खायाला. रोजला तेच. म्या पेंगाया लाग्ली. मंगली वराडली, “आन्जे, पाडे म्हन, नायतर गुर्जीस्नी नाव सांगते बग”. शिवाजीम्हाराज समजतेय सोताला. मंगली वराडली, “साहा रे” म्या हळूच “आटाचा” बोल्ली. कुणाला कायबी नाय समजलं.

(खंड्याचे मनोगत)

लेखक तिमा यांनी शनिवार, 19/10/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थानः खंड्या जन्मल्यापासून,आकाशात भाईबंधांबरोबर थव्याने स्वच्छंद उडायचे आणि फळे खायची हा माझा दिनक्रम होता. फार छान दिवस चालले होते. एके दिवशी आम्ही सग़ळे एका झाडावर येऊन बसलो. खाली काहीतरी चकाकत होते. आमचा ग़टनेता, 'खाली बघू नका" असे ओरडून सांगत होता. तरी आम्ही एकदोघांनी खाली डोकावून पाहिलेच. खाली एक फासेपारधी आरसा हातात घेऊन सूर्याचे प्रतिबिंब आमच्या डोळ्यावर पाडण्याचा प्रयत्न करत होता. अचानक, माझ्या डोळ्यांवर ती तिरीप पडली आणि जी भोवळ आली! तिरमिरत खाली पडलो. पडताना एका फांदीचा फटका माझ्या डाव्या डोळ्याला लागला, एवढे आठवते आहे. त्यानंतर जो शुद्धीवर आलो तो एका पिंजर्‍यात!

बाहुला बाहुली

लेखक mohite jeevan यांनी शनिवार, 19/10/2013 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी अचानक आम्हाला माहीत झाले की आमची बाहुली मोठी झाली आहे आणि आम्हाला तिचं लग़्न केले पाहिजे.आम्हाला माहित ही झाले नसते दीदीने आम्हाला साग़ितले नसते तर. बाहुली दीदीनेच आम्हाला बनवून दिली होती.लाल ओठ, लांब केसाची तिला कोणताही ड्रेस सुंदर दिसत आसे.कधी आम्ही तिच्या लांब केसाची वेणी बनवत,तिच्याशी खुप ग़ोष्टी बोलत पण आतापर्यंत तिच्या लग़्नाचा विचार आमच्या डोक्यात आला नव्हता.आम्हीतर नेहमी प्रमाणे शाळेतुन घरी आल्यावर आमच्या पुस्तकाच्या कपाटाजवळ एका लहान कप्प्यात तिचं घर केले होते.त्या कप्प्यात आणखिन जाग़ा नव्हतिच. दीदी आमच्याहून मोठी होती.तिला खुप आभ्यास करावयाचा आसे,तिच्यासाठी एक टेबल खुर्ची सुद्ध