Skip to main content

अधिकार

लेखक mohite jeevan यांनी मंगळवार, 29/10/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
स्री रोग़ तज्ञ डाँ. पाटील याच्या क्लिनिक बाहेर एक युवती क्लिनिक उघडण्याची वाट पाहत होती.जिन्स पँन्ट घातलेल्या त्या युवतीकडे येणारे जाणारे काही लोक पाहत होते. काही वोळातच क्लिनिकमध्ये नर्स म्हणुन काम करणारी सारिका आली,तीच्या पाठोपाठ ती युवतीही क्लिनिक मध्ये ग़ेली. क्लिनिकमधील खिडक्या उघडत ती त्या युवतीकडे पाहु लाग़ली.तिला त्या युवतीचे वर्तन काही विचित्र वाटले.सारिकाने काँम्युटर आँन केला. 'मी ग़र्भपात करणार आहे,'त्या युवतीने सारिका नर्सला म्हणाली, सारीकाने तिच्याकडे पाहिले व एक फाईल काढुन काहीतरी लिहु लाग़ली, 'तुमचे लग़्न झाले आहे का?,'नर्सने विचारले, 'का?ग़र्भपात करण्यासाठी लग़्न होणे जरुरी आहे का?,'त्या युवतीने तडकन प्रश्न केला, 'तुमच्या पतीचे कीवा पिताचे नाव माहीत झाले आसते तर....,' 'ग़र्भपात मला करायचे आहे,माझ्या पतीला कीवा पिताला नाही,' 'मला तुमच्या मासिक पाळी विषयी माहीती द्या,' 'विचारा काय विचारणार आहेसा ते,' 'मासिक पाळी नियमित होते का?,' 'हो', 'किती दिवसाने येते?,' 'आठाविस दिवस,' 'किती दिवस आसते?,' 'तीन दिवस', 'शेवटची मासिक पाळी कधी झाली होती?,' 'आठरा आठवडे अग़ोदर,' 'ग़र्भपात का करणार आहात?,' 'माझी मर्जी,मला नको आहे मुल,' 'नको होते तर कशाला केली ग़र्भधारणा?कंडोम वापरायचे नव्हते का?,' 'मी तर कुठे जाणुन बुजुन केले आहे,राहीले आसेच,' आसे म्हणुन ती थोडा वेळ थांबली व पुढे म्हणाली, 'प्लिज मला तुमच्या डाँक्टराना भेटायचे आहे,मी त्याच्याकडेच आली आहे,' सारिका लग़ेच फाईल घेऊन डाँक्टरच्या केबीन मध्ये ग़ेली, डाँक्टरने तीची फाईल वाचुन तिला लग़ेच आत बोलावुन घेतले. 'हे बघ प्रियंका,तुला आठरावा आठवडा लाग़ला आहे,' 'हो,' 'तु आठरा आठवडे काय करत होतीस?,' 'डाँक्टर मी एका काँल सेंटरमध्ये काम करते,मला खुप काम आसल्याने वेळ मिळाला नाही,या वर्षी माझे प्रमोशन ही होणार होते,त्याचीच मी वाट पाहत होते,पण आता मी एक आठवडा फ्रि आहे,' डॉक्टर प्रियंकाला एकसारखे पाहत होते,व म्हणाले,'पण यासाठी एक ग़ोष्ट आडवी येते, एक म्हणजे तुम्ही विवाहित नाही, बरोबर,आणि ग़र्भपात फक्त विवाहित स्रीच करु शकते,आसा कायदा साग़तो,' 'नाही मी एक स्री आहे व ग़र्भपात करणे माझा अधिकार आहे, आणि डाँक्टर हा माझा पहिला ग़र्भपात नाही,आणि अनमँरेड लिव्हीग़ टुग़ेदर यांच्यासाठी ही कायदा आसणारच की?,' 'हो पण तुम्ही आशा दोन डाँक्टराना तयार केले पाहिजे की ते लिहुन देऊ शकतील की या ग़र्भाने तुम्हाला मानसिक आघात होण्याची शक्यता आहे,' 'मग़ डॉक्टर तुम्हीच काही मदत करु शकता,प्लिज डॉक्टर माझ्या करिअरचा प्रश्न आहे,' 'ठीक आहे प्रियकां,आपण तर खुल्या विचाराच्या दिसता,मग़ तुम्ही एक काम माझ्यासाठी करावे लाग़ेल,' 'कोणते काम?,' 'तुम्हाला काही हरकत नसेल तर गर्भाचा आल्ट्रा साऊडं व्हीडीओ रेकाँर्ड करु शकतो का? त्यामध्ये फक्त ग़र्भाचे व्हीडीओ रेकाँर्डीग़ होणार बाकी काही नाही,' 'काय हे होऊ शकते?,' 'हो आम्ही नुकतेच ते मशिन अमेरीकेतुन आणले आहे,' 'हो करा मला काही हरकत नाही,' 'आपण फक्त याबाबत एक सही करा,' 'हो हो कोठे आहे,फार्म,' * आँफरेशनच्या वेळी डॉक्टरांच्या मनात आनेक प्रश्न येत होते,हा व्हीडीओ लिंक झाला तर,पहिलेच मशिन टेस्ट आसल्याने काही झाले तर, पण शेवटी आँफेरेशन यशस्वी पार पडले.व्हीडीओ रेकाँर्डीग़ व्यवस्थित झाले. प्रियंकाला जाग़ आली, तिला स्पेशल वाँर्डमध्ये पाठविण्यात आले. एका कॉन्फरन्स रुम मध्ये डॉक्टर पाटील त्याचे दोन मित्र डाँ.देसाई व डाँ.म्हेतरे याना त्यानी व्हीडीओ पाहण्यास बोलावले होते, तसेच त्या क्लिन्िक मधील तीन नर्स ही होत्या त्यापैकी सारिका एक होती, सर्वांसमोर एक एक काँफी ठेवली होती. डाँक्टरानी व्हीडीओ प्ले केला. व्हीडीओमध्ये तो ग़र्भ पुर्ण विकसित दिसत होता,हाता पायाची हालचाल नाजुक होती,जसे की एखादे फुला सारखे ते नाजुक दिसावे, त्याचे डोळे बंद होते, पण होठाच्या हालचाली स्पष्ट दिसत होत्या,जणु ते काहीतरी सांग़त आसावे आसे वाटत होते. पण जेव्हा खालुन घातलेले हात्यार जेव्हा ग़र्भाशयात प्रवेश केले,तेव्हा त्या मुलाने घाबरुन हात पाय आकसुन घेतले, व त्याने ओठाची हालचाल ही बंद केली. ग़र्भाशायात प्रवेश केलेले ते हात्यार त्या मुलाला स्पर्श करु लाग़ले,त्या कठोर आशा स्पर्शाने ते मुल ग़र्भाशयात इकडे तिकडे होऊ लाग़ले,ते त्याच्यापासुन बचाव करित होते.जेव्हा हात्याराचे टोक त्याच्या हाता जवळ आले,त्या मुलाने ते हात्यार अलग़द धरण्याचा प्रयत्न केला, शेवटी त्या हात्याराने त्याच्या हाताला हिसका मारला व त्या मुलाच्या एका हाताची बाजु त्याने ग़च्च चिमटीत धरली,तेव्हा त्याचे पाय पसरले ग़ेले,त्याचे ओठ उघड झाप करित होते. सर्वजण एक सारखे पाहत होते,कोणी ही काँफीचा घोट ही घेतला नव्हता,त्यानंतर जे पाहिले ते ईतके भयानक होते की, सारिका नर्स तेथेच ओरडली, 'थांबवा आता, प्लिज हाँरेबल टु वाँच,' आणि ती धावत टाँईलेटकडे ग़ेली. तेवढ्यात डॉक्टर पाटील म्हणाले,'यातील एक काँफी त्या युवतीला द्या, म्हणत होती हे माझे पहिले आँबरशन नव्हे.'
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7976
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

In reply to by सार्थबोध

आणि विचार करायला लावणारा आहे.(एक लेखन सफाई सोडली तर, मस्त लिहीले आहे.)

नेहमीप्रमाणेच औत्सुक्य् पूर्ण लिखन!

वंध्यत्व खात्यात काम करताना एक श्रीमंत बापाची एकुलती एक अत्यंत लाडावलेली २ १ वर्षाची मुलगी पाहण्यात आली होती. गरोदर पणाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात येणाऱ्या उलट्या सहन न झाल्याने तीन वेळेस गर्भपात करून चौथ्या वेळेस गर्भपात करण्यासाठी आली होती. त्या मुलीस कोणतीही खंत किंवा खेद नव्हता. वयाच्या १९ व्या वर्षी प्रेम विवाह केला होता नवरा डॉक्टर होता. पण तो अतिशय अगतिक होता.मुलगी अत्यंत लाडावलेली आणि दुराग्रही होती. मुलीचे आई वडील दोघेही मुलीचे तरीही लाड करतच होते. मी आणि आमचे स्त्रीरोग तज्ञ अतिशय वैफ़ल्याने पाहत होतो.संततीप्रतिबंधक निष्फळ ( failure ऑफ condom contraceptive) हे कारण देऊन ती गर्भपात करीत असे. शेवटी विफलतेच्या मनस्थितीत सर चक्क म्हणाले आता हिला पुढे मुल होऊ नये म्हणजे निसर्गाशी खेळ केल्याची किंमत काय आहे ते कळेल.

In reply to by सुबोध खरे

स्त्रीभ्रूणहत्याबंदी किंवा गर्भलिंगचिकित्साबंदी.. आणि स्त्रीगर्भ जाणल्यास गर्भपातबंदी अशी पकडली जाण्यास अत्यंत कठीण कंडिशन कायद्यात ठेवून त्याची भीती लोकांना घालण्यापेक्षा एकूणच मुळात कोणताच (रिगार्डलेस मुलगा/मुलगी) गर्भपात (जीवघेणी अ‍ॅबनॉर्मॅलिटी किंवा आईच्या जिवाला धोका वगळता) नको अशा अर्थाचा भावनात्मक प्रचार सरकार आणि एनजीओज का राबवत नाहीत..? मूळ हेतूही साध्य होईल आणि कोणत्याच एका बाजूला कमी किंवा जास्त न समजण्याचा भागही आपोआप जमेल.

In reply to by गवि

मुलगी नको म्हणून गर्भपात करा हा मूर्खपणा आहे . शिवाय गर्भपात करूच नये हाही शहाणपणा आहे असे म्हणायला जीभ रेटत नाही. पण एक आहे, समजा गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली, तर त्याचा दुर्वापर लै वाढेल- इच्छामरणासारखे होईल. त्यामुळे कागदोपत्री इल्लीगलच असू द्यावे. लै स्पेशल केस असेल तर 'आपापसात' मिटवण्यात आपण लोक लै चतुर आहो, कायदा क्या चीज है भेंडी!

मूल नको म्हणून गर्भपात करणारे आणि मूल होत नाही म्हणुन उपचार घेणारे अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांची संख्या सतत वाढतेच आहे. विरोधाभास उद्विग्न करणारा आहे. बाकी मी या लेखाकडे एक कथा म्हणुन पाहण्यापेक्षा एक काकू म्हणुन पाहिन.

याच्या साठी समाजप्रबोधन सोडुन दुसरा काहीही उपाय नाही.अन्यथा कितीही कायदे करा सगळे फाट्यावर मारले जातात.निदान विकसनशिल देशाततरी.

मोठ्या कथा लिहा ना. व्याकरण आणि शुद्धलेखनातल्या चुकांमुळे वाचताना थोडीशी अडचण होते खरी, पण कथानक त्याला पुरून उरणारं असतं तुमचं. तुमच्या कथा वेगळ्याच असतात. इतक्या की वाचताना थोडी अडचण होत असूनही कथेत पुढे काय आहे याची उत्सुकता राहते मनात. पण कथा छोट्याच असल्याने उत्सुकता जराही न ताणता तुम्ही कथा संपवता. मस्त लिहीता. पु क शु. :)

कथा चांगली आहे. शेवटी कॉफी ऐवजी कॉपी हवे आहे . आधी कॉफी वाचल्याने शेवट नीट कळला नाही पण नंतर लक्षात आले. शुद्धलेखनाकडे लक्ष दिल्यास हे टाळता येईल.

ही खास 'जीवन मोहिते' टच असलेली कथा! अ‍ॅबॉर्शन ह्या विषयावर एका वेगळ्या अ‍ॅन्गलने भाष्य करणारी कथा जमली आहे मस्तच, पण त्या टंकनचुका कथेतील इंटेन्सीटी ५०% नी कमी करतात. - (अधिकारांचा विचारपूर्वक वापर करणारा) सोकाजी

़काय राव काय प ण थापा मारताय? १९७२ पासुन १८ आठवड्याच्या गर्भपाताला असे प्रोसीजर वापरले जात नाही.फ क्त विवाहीतांना परवानगी असते चा शोध कुठे लावलात?

In reply to by विनायक प्रभू

+१. . फ क्त विवाहीतांना परवानगी असते चा शोध कुठे लावलात? लिखाणातील हीच घोडचूक दाखवून द्यायला आलो होतो. धन्यवाद विप्र. . बाकी १८ आठवड्याच्या वेळेस गर्भपात करताना गर्भाचे/बाळाचे जाउ द्या; खुद्द त्या स्त्रीच्या शरीरावर काय परिणाम होतो, होण्याची शक्यता आहे हे आधी डॉक्टर समजावून सांगतात. इतर काही कन्व्हिन्स करायचा त्रास त्यामुळे वाचतो असा अनुबह्व आहे.(निदान कुंपणावरले तरी मग "आहे तेच कंतिन्यू करुया" अशा मन्;स्थितीत येतात.) . अवाम्तर :- १८ आठवड्यांनंतर सर्जिकल प्रोसिजर वापरली जात नाही असे म्हणताय का? मी उलट ऐकले आहे. पहिले काही आठवडे (नक्की किती ते आथवत नाही, बहुतेक आठ किम्वा दहा आथवडे असतील; त्याहून जास्त नाही हे नक्कीच) असतानाच गोळ्यांनी/औषधांनी गर्भपात करता येउ शकतो. त्यानंतर गर्भाची वाढ होत असल्याने औषधी उपाय करणे निष्फळ ठरते. सर्जिकल, ऑपरेशन करुन, प्रत्यक्ष सुई -कात्री वापरुन पोटातील बाळाला मारणे अनिवार्य ठरत जाते, जसे जसे जास्त दिवस जातात तसे. . गर्भपात करण्यासाठी विवाहित असण्याची अट नाही. (अल्पवयीन असेल तर स्त्रीच्या/मुलीच्या पालकांची परवानगी अनिवार्य आहे. नाव विसरलो मासिकाचे ; पण एका स्त्रीवादी मासिकात एका डॉक्टरचे ह्याबद्दलचे प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित सदर येइ. एका संपूर्ण अपरिचित* विषयाची खिडके त्यातून उघडलेली दिसे. ) स्पोर्ट्स फिजिशिअन डॉ चिपळूणकर ह्यांच्या दवाखान्यात ते मासिक येत असे. असो. शिवाय विवाहितांच्या केसमध्ये गर्भपातासाठी गाय्नॅकोलॉजिस्ट अडून बसतात नवर्‍याची सही हवी म्हणून. पण कायदेशीर दृष्ट्या त्याचीही गरज नाही** असे ऐकले आहे. सरकारी केंद्रात गेल्यस अधिक अचूक माहिती मिळेल. . *गर्भपात अजूनही आपल्याकडे टॅबू आहे. (टॅबू असणे चूक की बरोबर हा स्वतंत्र चर्चेचा विषय; तो इथे नको.) . ** स्त्री च्या पोटात गर्भ असल्याने, तिच्या जीवाचा/शरीराचा थेट प्रश्न असतो. त्याबद्दल बोलण्याचा पहिला हक्क तिचा ; तिच्या नवर्‍यापेक्षाही अधिक अशी काहीतरी भूमिका दिसते शासनाची. शिवाय स्त्रिया हा घटक सामजिक दृष्ट्या दुर्बल मानला गेल्यानं त्याला बाय डिफॉल्ट शासनाची आणि पर्यायानं कायद्याची सिम्पथी मिळणं स्वाभाविक आहे.

In reply to by mohite jeevan

़कुठ्ल्या ़ काळात? उगाच हट्ट? @ मन१ ५ आठवडे - गोळ्या १२ आठवडे - सक्शन अबॉर्शन १६ ते २० आठवडे -इंडक्शन अबॉर्शन मो. जी.़़कथा - कल्पना विलास.

In reply to by विनायक प्रभू

विवाहिताना ग़र्भपातास प्राधान्य आसते आसे सांग़ायचे आहे तर अविवाहीताना ग़र्भपात हक्क नाही आसे म्हटले नाही. शेवटी अविवाहीतेचा ग़र्भपात होतोच ना

आज लाज वाटली स्वतहाची , जीवनभौचा फॅन असुन ही कथा वाचायली राहिली . शरमेने अर्धमेला झालेला - तथास्तु

हे रत्नं पण वाचायचं राहिलं होतं. प्रभू आणि मन १ यांचं बरोबर. कॉलसेंटरमध्ये जीन्सवाल्या मुली भारतात सर्रास काम करायला सुरूवात व्हायच्या फार फार आधी अ‍ॅबॉर्शनचे नियम बदललेत.

प्रभुंच्या धाग्यावरील उल्लेखामुळे वाचली. साती आणि प्रभुंशी सहमत. इतर काही प्रतिसाद यामधले फॅक्टस् माहिती नसल्याने आले असावेत असे मी समजते.

काय भयानक कथा आहे! अगदी योगायोगाने वाचायला मिळाली. अस्सल हॉलीवूडचा एखादा भयपट पहात आहे असं वाटलं कथा वाचताना. मोजींच्या कथा खूप मजेशीर असतात, पण ही फारच वेगळी.