Skip to main content

कथा

स्प्लेंडर : शतशब्द-सत्यकथा

लेखक उद्दाम यांनी बुधवार, 04/09/2013 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली. मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा .... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय. आणि एक दिवस मग ठरवलं. "आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. " होना! लोकल, ट्याक्सी, विमान .... आता स्प्लेंडर कशाला हवी? .. स्प्लेंडर विकली. त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला.

शेत-तळं

लेखक मीराताई यांनी शनिवार, 31/08/2013 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दूरदूरवर दृष्टी टाकत दिगंबर सायकल रेटत होता. रस्तारुंदीच्या कामात जुनीपुराणी झाडं तोडली गेली, तेव्हापासून रस्त्याला थंडगार सावली देणारी त्यांची डेरेदार छत्रंही गेली. एरवी हिरव्याचार शेतांवरून येणारी झुळुक थंडोसा आणायची अन् त्याबरोबरच तो हिरवा, ओला गंधही! पण आता पाहावं तर कालपरवापर्यंत भेगाळल्यासारखी दिसणारी शेतं, ढेकलं उलून आल्यानं केविलवाणी दिसत होती. बांधाबांधावरच्या एकटया दुकटया चिंचा-बाभळी उसासत कशाबशा तग धरून उभ्या होत्या, उद्याच्या आशेवर! उजाड माळरानांवर तेवढेच हिरवे ठिपसे जिवंतपणाची खूण पटवत होते.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

छगनलालांचे सापळे (भाग ५)

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 24/08/2013 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग :http://www.misalpav.com/node/22197 त्या दिवशी मी जरा उशीराच कामावर गेलो होतो.आज काय काम करायचे त्याची योजना कालच तयार करून ठेवली होती.अशोकला रात्रीच कामाची कल्पना देवून ठेवली होती.तसा आमच्याकडे स्टाफ कमीच होता.बॉक्सेस आणि पी.सी.बी.

४ आकड्यांचा प्रवास...

लेखक नि-अ-पाटणकर यांनी शुक्रवार, 23/08/2013 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
४ आकड्यांचा प्रवास... ऱेल्वेचा प्रवास हा माझा तसा आवडता प्रवास. तशी कारण बरीच आहेत तिथे मिळणारी मोकळीक, झोपायला मिळणारा बर्थ वगैरे वगैरे. काही छोटे त्रास पण आहेत पण त्यात माझ्या कुंडलीचा दोष आहे रेल्वेचा नाही. काही गोष्टी नेहमी ठरलेल्या असतात, मी आज पर्यंत शेकडो वेळा प्रवास केला असेल पण कधीही सुरवातीपासून म्हणजे बुकिंग केलेल्या दिवसापासून मला कन्फर्म सीट मिळालेली नाही, अगदी २ - ३ महिने आधी बुकिंग केले तरीहि माझा नंबर वेटिंगमध्येच येतो. मग त्यादिवशी आधी तो चार्ट शोधा, चार्ट नाही सापडला तर तो TC शोधा, आपल्या बोगी पासून आपण १० डब्बे लांब आहे म्हणून पळापळ करा.

दुनियादारी ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 22/08/2013 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
दारूचा चौथा ग्लास जळजळतच घशाखाली उतरला. सहा महिने तो त्या दोघांना फिरताना बघत होता.. मोबाईल बदलावेत तसे त्याच्या मैत्रीणी बदलायच्या.. यावेळी पठ्ठ्या लग्न करायला निघालेला.. तिच्याही आयुष्यातील तो पहिलाच मुलगा नव्हता.. वाडीतच दोन प्रकरणे होती तिची.. त्याला ‘सावध’ करणे गरजेचे होते.. शेवटी मित्र होता त्याचा... जिवलग असा.. बालपण, शाळा, कॉलेज, कट्टा.... कट्ट्यावरची कटींग चाय.. अन दोघांत ओढलेली एकच सिगारेट..!! क्षणात डोळ्यासमोर तरळले अन त्याच तिरमिरीत तो उठला.. पाचवा पेग अर्धाच सोडून..

तिचा एक दिवस

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 22/08/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
शारदा एकदम दचकून जागी झाली. आपण कुठे आहोत आणि हा कसला आवाज आहे असा तिचा गोंधळ क्षणभरच टिकला. पहाटे पाणी आल्याआल्या लगेच भरलं तरच मिळतं, नाहीतर त्याचा काही भरोसा नसतो, म्हणून रात्री झोपताना नळ चालू ठेवून झोपायची तिने स्वतःला सवय लावून घेतली आहे. तरीही तिचे हे रोजचे दचकून जागे होणे मात्र काही संपत नाही. खरे तर आज शारदा खूप दमली आहे. शेजारी प्रकाश - तिचा नवरा - घोरत पडला आहे. रात्रीच्या जोर जबरदस्तीनंतर त्याचे हे निवांत झोपणे आणि तिची दमणूक हेही आता नेहमीचे झाले आहे. पाणी भरण्यासाठी त्याला उठवण्याचा मनात आलेला विचार तिने लगेच झटकून टाकला.

डस्ट इन द विंड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/08/2013 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

आत्महत्येला कव्हर!

लेखक मीराताई यांनी गुरुवार, 15/08/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
खरं सांगू का? तशा माझ्यापुढे समस्या खूप आहेत, पण माझी मुख्य समस्या ही आहे की, माझ्या समस्या कोणाला समजतच नाहीत. पहा, तुम्ही पण हसलात न मला? हसू नका हो! अगदी पोटतिडिकीने सांगतोय, माझी कोणतीच समस्या कोणालाच समजत नाही.खरंच का लोक एवढे बिनडोक असतात? की त्यांच्या बेपवाईमुळे असं घडतं? कोण जाणे! पण या काळातही माझा मनुष्यप्राण्यावरचा विश्वास टिकून आहे खरा! कदाचित, ...कदाचित मलाच माझ्या समस्या नीट सांगता येत नसाव्यात. तसा मी मुखदुर्बळच! म्हणजे, असं आई म्हणते लहानपणापासून; अर्थात माझ्या लहानपणापासून, तिच्या नव्हे. माझं हे असंच होतं, एक सांगायला जावं, तर त्यातून अर्थ वेगळाच निघणार! असो. तर काय?

धाडस ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 14/08/2013 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता.. मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते.. त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू.. खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती.. इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला.. काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला.. वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!! थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली..