Skip to main content

कथा

वॅलेंटाईन डे ! ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 09/08/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
सालाबादाप्रमाणे येणारा प्रेमदिवस.. उधळायला संस्कृतीरक्षकांची जय्यत तयारी होतीच.. निषेधाचे बॅनर शहरभर लागले होते.. कट्ट्यावरच्या राहुल’चीही तयारी झाली होती.. चॉकलेट परफ्यूम ग्रीटींग अन फुले... आणखी काय लागते..! गेल्या तीन वर्षांचा त्याचा रेकॉर्ड होता, एकही वॅलेंटाईन डे फेल गेला नव्हता.. यावेळी मात्र अंदाज फसला.. त्याला हसूनच नकार देत ती पुढच्याकडे वळली.. टाय विस्कटतच त्याने पुष्पगुच्छ जमिनीवर आदळला.. अर्थातच, अपमान अन पराभवाची निशाणी कोणाला आवडते ! ते निघून गेले अन एवढा वेळ जवळच उभी.. नुसतेच बघत असलेली ‘ती’ ... लगबगीने पुढे आली.. पडलेली फुले उचलून हृदयाशी कवटाळली..

सावल्या ___ शतशब्दकथा

लेखक तुमचा अभिषेक यांनी बुधवार, 07/08/2013 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
ते एक सुकलेले शेत होते एवढंच काय त्याला गाडीच्या बाहेर फेकले जाताना जाणवले.. चांदण्यांच्या प्रकाशात लुकलुकणारे चार सहा आठ डोळे आणि एक बारीकसा टॉर्चचा झोत.. त्यात दिसणार्‍या, अंगावर झेपावणार्‍या... जंगली श्वापदासारख्या उघड्या देहावर तुटून पडणार्‍या... काळ्याकुट्ट सावल्या..! त्यांचा स्पर्श, अंगाचा दर्प.. बीभत्स अन किळसवाणा.. त्याला दूर दूर फेकून द्यावेसे वाटूनही काही न करू शकणे.. एक असहाय्यता.. एक अगतिकता..... क्षणाला या सर्वांनी परीसीमा गाठली अन धापा टाकतच तो उठला.. उर नुसता धपापत होता..

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 07/08/2013 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २) ७. अर्जुन उवाच : कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्‍याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते.

प्रिय सखे....

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 26/07/2013 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सखे, हे पत्र नाही, एक आवेग आहे... तो ओसरला की सारं शांत होईल... पूर्वीप्रमाणे, शांत! फक्त हा आवेग सांभाळून घे, समजून घे.... पेलून घे... दोन दिवस.. दोन दिवस झाले प्रचंड घूसमटते आहे.. प्रचंड! दोन दिवसांपूर्वी तुला फोन केला... खूप आनंदात.. माझ्याकडची आनंदाची बातमी तुला न देता तो आनंद साजरा होईलच कसा...?आपली सवयच ना... लहान लहानग्या इच्छा पूर्ण झाल्या की कर फोन ...आणि फोनवरच्या शब्दांतच सिलीब्रेशन, खरं तर तेच खरं आनंदानं न्हाऊन जाणं! अगदी तसाच तुझा नंबर डायल केला... तू फोन उचलेपर्यंत, नेमकं काय काय बोलायचंय...

प्रलायानंतरची प्रार्थना

लेखक गोरा सौमित्र यांनी बुधवार, 24/07/2013 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
चार भिंतींच्या आत माझ्या शब्दांचा मार ती निशब्दतेने सहन करत होती. प्रत्येक शब्दाच्या प्रहाराने तिच्या अखंड तपश्चर्येचा बांध फुटतो की काय?? त्या चार भिंतींच्या पोकळी मध्ये आभाळ दाटून आलेलं मला साफ जाणवत होतं. अशा वातावरणामध्ये माझ्या शाब्दिक विजेचा ताल बेताल झाल्यावर क्षणात वादळी बरसात होणार. अवकाशाच्या कुरुक्षेत्री जेव्हा समोरचा (प्रकाश) अस्तित्वाची लढाई हरू लागतो तेव्हा माझ्या आत्मकेंद्रित मनाच्या कोपर्‍यामध्ये लपलेला अहमभाव स्वतहाचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी तिच्या जाणिवेच्या वास्तूला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करतो.

नौस

लेखक आतिवास यांनी मंगळवार, 23/07/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत. आज सांजच्याला आले तवा हासत व्हते. म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!” ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत. “तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली. आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”. बाबौ! आता कायबी कराया येतंय. कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा. पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु. अब्यास कर, सुद्द बोल, भांडू नको, श्या दिऊ नको, पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड. गंपतीचं भजन म्हन. घरात आय, साळंत हे.

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2013 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २ अ‍ॅबिसिनिया.......

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/07/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ होजाने अल्लाचा प्राण वाचविला त्याची गोष्ट - बायझिडच्या मशिदीजवळ एका मदरसेत म्हातारा ‘होजा’ लहान मुलांना मोठ्या तन्मयतेने शिकवीत असे. सर्व पुस्तकांचा राजा ‘कुराण’ त्या लहानग्यांना शिकवताना त्याचा ऊर आभिमानाने भरुन येत असे तर कधी कधी त्याच्या डोळ्यात पाणी तरळल्याचाही भास होई.

पत्रास कारण की… (कथा)

लेखक मी_देव यांनी सोमवार, 08/07/2013 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
ते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातलं एक टुमदार गाव. आता त्याला शहर अशी ओळख मिळाली असेल, पण १९८९ मध्ये ते एक गावच होतं. माझी बदली भांबेडला झाली होती. भांबेड तसं खूप छोटं गाव, पण आजूबाजूच्या दुर्गम भागात तेच एक मोठं. भांबेड आणि आजूबाजूची पाच-सात गावं सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली. कोंकणाचा पूर्वेकडील अगदी शेवटचा भाग.

मनरक्षिता (३)

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 03/07/2013 06:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनरक्षिता (१) मनरक्षिता (२) सकाळी उठल्यावर चैतीला सपान आठवलं. अंघोळ वगैरे आवरून आज्जीने दिलेला डबा घेतला अन भीत भीतच ती शाळेत गेली. मास्तर अजून शाळेत आला नव्हता ! तासाभरानं महादू शिपाई सांगत आला. ‘पोरानु, मास्तरला फाटेच्या पारी लकवा मारलाय. एक हात अन एका बाजूच्या अंगावरनं सगळं वारं गेलंय. उठायसुदिक यीना झालंया..!! ‘हुर्रे’ करून सगळी पोरं उधळली. चैती सपान आठवत घरी आली. पण कुणालाच सपनाबद्दल काय बोलली नाही. आज्जीला सुद्धा ! चार दिवसांनी शाळेत नव्या बाई हजर झाल्या. हसऱ्या, गोड बोलणाऱ्या.