Skip to main content

कथा

गपचिप

लेखक आतिवास यांनी शनिवार, 28/12/2013 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची आई येकदम वाईट. च्या काय देत नाही कदी. ही मोटी मान्सं बरी च्या पित्यात. आमाला मात्र न्हाई. आण्णा म्हन्त्यात, “चहा नको पिऊ; काळी होशील.” त्यादिशी पाटीलकाका आल्ते. आई च्या दिऊन बोलत बसली तितचं. मला म्हन्ली, “बेटा, तेवढी कपबशी आत नेऊन ठेव मोरीत. न फोडता ने.” आता पावणे होते; तेंच्यासमोर आईचं ऐकाया पायजे ना! वाईट असली ती तरी! पाटीलकाकांनी कपात उलिसा च्या तसाच ठुला व्हता. म्या पिऊन टाकला तो गपचिप. येकदम झ्याक. तवापासून आले पावणे, की उचल कपबशी ... प्या च्या..... पावणे नाय आले तर? म्या रस्त्यावर जाऊन कुणालाबी सांगतिया “आई-आण्णा बोलावत्येत” म्हनूनशान. आई करतेच च्या. म्याबी पिते. उलिसा. गपचिप.

धाव्वीची परीक्षा

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 27/12/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
त्याकाळी उदगीरला किमान मध्यमवर्गीयांमधे धाव्वीच्या परिक्षेचे महत्त्व लग्न, मुंज, मूल होणे आणि निर्वाण यांच्यापेक्षा जास्त नसले तरी कमी तरी नव्हते. मुल दहावीला असणे आणि नसणे यामुळे गृहजीवनावर फार व्यापक परिणाम पडे. मनोरंजनाचे स्रोत आणि कर्मे, इतर कुटुंबीयांची देखिल, पूर्णतः बाजूला ठेवली जायची. सातवीच्या मुलाने टीव्ही पाहायचा नाही, कारण दहावीतला मुलगा डिस्टर्ब होईल. तेव्हा माझी नववीची परीक्षा झाली होती आणि त्या महत्त्वाच्या दिव्यासाठी मनाची तयारी करत होतो.

कथा :- मी जिंकलो, मी हरलो (३) - अंतिम

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 27/12/2013 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१) कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२) तुरुंगाचा दरवाजा उघडला आणि मी बाहेर पडलो. बरोबर १३ वर्षे आत होतो. अजूनही आठवतोय मला तो दिवस. अगदी काल परवा घडलेल्या घटने सारखा. पोलीसांनी अटक केली होती तेव्हाच मी माझा गुन्हा काबुल केला होता. त्यामुळे जास्त काही तपासणीची गरजच न्हवती. सक्त मजुरीची शिक्षा, कशासाठी? पत्नीच्या खुनासाठी , सदोष मनुष्यवधाच्या आरोप.खरं तर १४ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली होती. पण चांगल्या वागणुकीमुळे १ वर्ष माफ केलं म्हणे.

शतशब्द कथा: म्हादा

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 26/12/2013 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
सक्काळच्यान दादू कावलावता. तंबाकू नाय का च्या नाय. कळकाच्या पाटया वळू वळून बोटं पाक सोलवटली व्हती. पाटलाच्या वाड्यावनं सांगावा आलावता. उद्याच्याला येरवाळी वाजान्त्री पायजेल. आता मानसं हाताशी नायती तर कोन वाजीवनार? गाडवं? मायला . . गाडाव म्हनल्यावर ध्येनात आलं. . हौसा कुटाय? मास्तरच्या घरला इटा लगीच पायजील हाईत. गाडवं मोकळी हुबी र्हाऊन जमंल व्हय ? यो म्हादा बी आयकंना झालाय.. हितं बा कामानं मरतुया आन ह्यो साळंत जातुया ! भेटला की गुर्जीला इचार्तूच आता. बाबारं, पोरगं प्वाट भरनार का शिक्शान करनार ? -------- म्हादा आला. बाला बगून हाराकलाच. दादा . .

डुबरगेंडा

लेखक arunjoshi123 यांनी गुरुवार, 26/12/2013 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
डुबरगेंडा सर अशी सुरुवात मी इथे करत आहे ती केवळ तुम्हाला ते शिक्षक होते हे कळण्यासाठी. तोंडारमधे आम्ही कोणत्याही शिक्षकाला सर म्हणत नसू. गुर्जी आणि बाई अशा संज्ञा आम्ही तिथे वापरत असू. डुबरगेंडा सर मात्र गुर्जी या सन्मानाला देखिल कोणाला पात्र वाटत नसत. त्यांचा उल्लेख इतर शिक्षकांत आणि मुलांत एकेरीने होई. इथे 'त्यांच्या' हा शब्द देखिल ओव्हरएक्सप्रेशन आहे. तेव्हा तरी आम्ही त्याला एकेरीच संबोधत असू. तो कोणालाच आवडत नसे. त्यालाही कोणी आवडत नाही असे वाटायचे. त्याच्या नावाची मला फार गंमत वाटत असे. असले नाव कोण बरे आपल्या मुलाला ठेवले असेल?

छोटीसी मुलाकात प्यार बन गयी...

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 26/12/2013 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावीचं वर्ष. शाळेच्या युनिफॉर्मचा त्याग करून कॉलेजच्या कट्ट्यावर फॅशनेबल कपड्यांत रॅम्पवॉक करायला उत्सुक असलेल्या शेकडो मुलींची चाल; आणि आपल्या सात-आठ जणांच्या घोळक्याला कॉलेज सुरु होऊन तीन-चार महिने उलटले तरी अजुनही एकाही संघभेदिकेचा लाभ का झाला नाही या व्यथेत पडलेल्या माझी नजर यांची सतत पकडापकडी चालायची. पकडापकडी का, झटापटीच म्हणा ना. या सुंदर मुली स्वत:बरोबर त्यांच्यावर जळणा-या, राहणीमानाच्या पद्धतीत त्यांची नक्कल करणा-या किमान एक-दोन मुलींना सोबत घेऊन फिरत असायच्या.

जिमी (उत्तरार्ध)

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 24/12/2013 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
जिमी (पूर्वार्ध)
...पण स्वतःबद्दलचं त्याचं भविष्य चुकणार होतं.
"रामजीभाई कमानी मार्ग कुठे आला रे जिमी?" बिकट वाटेची वहिवाट करायला काही साधलं नव्हतं. मी नवी नोकरी शोधत, इंटर्व्यू देत हिंडत होतो. भारताच्या आर्थिक राजधानीच्या कुठल्याकुठल्या कोपर्यांत जावं लागे. मुंबईतले - विशेषतः 'टाऊन' (जिमीचा शब्द) मधले रस्ते बर्याचदा सासरची, माहेरची अशी दोन नावं घेऊन वावरतात. कॅडल रोड म्हणजेच वीर सावरकर मार्ग, हुतात्मा चौक म्हणजेच फ्लोरा फाऊंटन, एस्प्लनेड रोड म्हणजे पी डिमेलो मार्ग हे कळायला बरेच टल्ले खावे लागतात.

कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 19/12/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१)
अनामिका
ताईने मला अचानक का बोलावून घेतले ते समजले नाही. नाही म्हणायला भावोजींनी तिच्या आजाराची कल्पना आम्हाला दिलीच होती. मी आई बाबांबरोबर वेळ मिळेल तशी वरचे वर येत होते. पण काल मला तिने फोनवरून तातडीने बोलावून घेतले. जरा काळजीत वाटली . मी आले तेव्हा भावोजी तनयाला आणायाला शाळेत गेले होते. शेजारच्या घोलेकाकूंनी दरवाजा उघडला. " ये गं वेळेवर आलीस " " काकू, कशा आहात तुम्ही? आणि ताई कशी आहे?" " माझं बरं आहे. आताच आमचा चहा झाला, आता तू आलीयेस तर मी निघते.

श्री -भाग 2

लेखक मीता यांनी गुरुवार, 19/12/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई रागावली कि रूम मध्ये जाऊन दार लावून बेड वर अंग टाकून द्यायचं आणि आपल्याचं डोक्यावर थापटत बसायचं ..मीता च नेहेमीचच होत हे .. अशीच एकदा रूम मध्ये असताना फोन वाजला . श्री चा तिला आलेला पहिला फोन . श्री - नमस्कार .मी श्री बोलतोय .मीता आहे का ? मीता - हो बोलतेय . श्री - मी तुम्ही काढलेलं चित्रं पाहिलं ओर्कुट वर आणि मला ते आवडलं .तुमचा फोन नंबर मिळाला समीर कडून . ते चित्र विकत घ्यायची माझी इच्छा आहे . मीता- तुम्हाला चित्र आवडलं त्याबद्दल Thanks .पण मला चित्र विकायचं नाहीये . असं म्हणून मीतानी फोन ठेवून दिला . "काय कटकट आहे ..सुखानी रडू पण देत नाही " मीता स्वतः: शी बोलली.

'योगायोग'

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 18/12/2013 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
' योगायोग ' योगायोग By डॉ.सुनील अहिरराव मी' त्याला पहिल्यांदा भेटलो ते डॉ. प्रशांत च्या क्लिनिकमध्ये. बाहेर दोन चार पेशंटस् आणि तो केबिनमध्ये खुर्चीत बसलेला. एक गुडघा टेबलाच्या कोपऱ्याला टेकवून . हातात वर्तमानपत्र. खूप एकाग्रतेने काही वाचत असावा. चेहऱ्यावर एक गूढ गंभीर भाव. नजर वर्तमानपत्राच्या पानांवर , पण कदाचित त्या पलीकडे जाणारी.. त्याला डिस्टर्ब करावसं वाटेना. पण आत गेलो तरी त्याला माझ्या अस्तित्वाची जणू जाणीवच नव्हती. "नमस्ते डॉक्टर " त्याने माझ्याकडे अनोळखी नजरेने पाहिले. कदाचित पूर्वीच्या कसल्यातरी गूढात तो अजून बुडालेला. कदाचित त्याला टोकलेले आवडले नसावे.