Skip to main content

कथा

ज्याचे करावे भले.....

लेखक सचीन यांनी शनिवार, 23/11/2013 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
भिकाऱ्यांच्या त्रासाने गणपतराव त्रासले होते. जेथे बघावे तेथे भिकारी. ह्या भिकाऱ्यांचे करायचे तरी काय?असा प्रश्न गणपतरावांना पडला. सकाळी ऑफिसला जायला निघाले तर नाक्यावरचा भिकारी पैसे मागायचा.त्याचे झाले कि ट्रेनमध्ये कळकट भिकारी अंगचटीला येवून पैसे मागायचे कि त्यांच्या जवळकी पेक्षा पैसे देणे गणपतरावांना प्रशस्त वाटायचे.गणपतरावांचा मूळ स्वभाव हा भिडस्त होता. लोक काय म्हणतील याची त्यांना नेहमी भीती वाटत असे. इतर माणसे जशी भिकाऱ्यांना हाकलून लावत, खर्जातला आवाज काढून त्यांच्यावर ओरडत ते काही केल्या गणपतरावांना जमत नसे. त्यामुळे ह्या भिकाऱ्यांच्या त्रासापासून त्याची सुटका काही होत नसे.

दुष्ट योगायोग!!

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 22/11/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
अद्वैत आणि सीमा एकाच कॉलेजात होते. दोघांत मैत्री होती. कॉलेज संपलं, आणि एकमेकांचा विरह सहन होईनासा झाला. दोघं पुन्हा त्यांच्या ग्रुपच्या नेहमीच्या कट्ट्यावर भेटायला लागले. हळूहळू जाणीवपूर्वक दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पाच-सहा वर्षं उलटली. सीमा करिअरिस्टिक मुलगी होती. हुशार आणि कर्तबगार होती. तिला कामात लगेच बढती मिळायला लागली. अद्वैतला खूप मेहनत घ्यावी लागली. खूप हालअपेष्टा सहन करून, खस्ता खाऊन त्यानं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली. पण काम भरपूर होतं. प्रेशरही खूप.

भास...आभास.... कि अमानवीय !!! भाग - १

लेखक गजानन५९ यांनी गुरुवार, 21/11/2013 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
भास...आभास.... कि अमानवीय !!! भाग - १ खरे तर हा विषय थोडा ट्रिकी आहे कारण या विषयाव तीन गट पडतात एक जो अशा गोष्टींवर विश्वास आहे असा दुसरा ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही ते आणि तिसरा गट तळ्यात मळ्यात असतो या लोकांना कळतच नसते कि नक्की आपण कुठे उभे आहोत असे. हा विषय इथे मांडायचे कारण हेच आहे कि गेले काही दिवस माझा या गोष्टींवरचा विश्वास दृढ होईल अशा काही घटना माझ्या आयुष्यात घडत आहेत.

ग़ावातलं भुत

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 21/11/2013 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
‘भुत भुत.. भुत... भुत....’ आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले. पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला. सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री, आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता.

मस्करी

लेखक प्रास यांनी रविवार, 17/11/2013 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
"म्हण्टलं, आहात का डॉक्टर?" "अगं, ये ना. काय म्हणतेस? बर्‍याच दिवसांनी येणं केलंस. कशी आहेस?" "खरं तर खूप आधीच येणार होते. क्लिनिक सुरू करतेय. म्हणजे जागा घेतलीय, भाड्यानेच; पण घेतलीय. गरजेपुरतं फर्निचर करतेय, होईल महिन्याभरात. एकदा येऊन जा. आणखी काय लागेल वगैरे, तुझ्या टिप्स महत्त्वाच्या..." "अरे वा! अभिनंदन!! आहे कुठे ही जागा?" "घराजवळच आहे माझ्या, ४-५ बिल्डिंगसोडूनच मिळाली. थोडी महाग आहे पण घेतलीय ३ वर्षांसाठी तरी..." "छानच की!

पार्कात दिसलेली 'ती'

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 14/11/2013 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची सुटी चालू होती. तेव्हा मी रोज संध्याकाळी आमच्या शाळेच्या ग्रुपला बोलवायचो आणि त्यातले जे येतील त्यांच्याबरोबर गावभर हुंदडायचो. मी कॉमर्सचा विद्यार्थी त्यामुळे मला रोजच वेळ असायचा. आमचा अख्खा शाळेचा ग्रुप इंजिनिअरिंग कडे वळलेला. त्यामुळे माझ्या सुट्टीत त्यांच्या परिक्षा चालू नाहीतर क्लासेस तरी चालू. क्वचितच अख्खा ग्रुप जमायचा. असाच एकदा आमच्या ग्रुप मधल्या जान्हवी आणि पूजा मला भेटल्या. त्या दोघी एकमेकींच्या अगदी घट्ट मैत्रिणी. जान्हवी इंजिनिअरिंग करणारी, आणि पूजा ग्रुपमधली एकुलती एक कला शाखेची विद्यार्थिनी.

वचन

लेखक स्पा यांनी रविवार, 10/11/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
तसे हे लहानसेच खेडे,जेमतेम वस्ती असलेलं,आंबा-फणस,चिंच,नारळ-पोफळी यांच्या गर्दीत लपलेलं,वर्षानुवर्षे त्याच स्थितीत असलेलं,आधुनिकीकरणाचा स्पर्शही न झालेलं,गावात ठराविक पाच पन्नास घरं,सताठ दुकाने असलेला जुनाट बाजार,एक छोटी शाळा, एक ग्रामपंचायतीचे घर,त्याला लागून पोस्ट. गावाला दुभागून जाणारा लाल मातीच्या लोटाने भरलेला रस्ता.हि सडक सरळ पार तालुक्यापर्यंत जाते.याच रस्त्याने पुढे गेलं कि हळूहळू गाव मागे पडतं, आपण सड्यावर येतो,भणाणत्या वाऱ्याने बरं वाटतं.एखाद दोन किलोमीटर अजून पुढे गेलो कि दोन फाटे फुटतात. एक सरळ तालुक्याला, आणि एक छोटी सडक खाली.

बदला

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 10/11/2013 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
दूरवर मोकळे आकाश आणि त्या पलीकडे काहीच न दिसणार्‍या एका ओसाड माळरानावर अगदी मध्यभागी धापा टाकत मी एकटाच उभा होतो. पायातना कळा निघत होत्या, जणू काही नुकतेच एखादी मॅरेथोन मी जीव तोडून संपवली होती. पण अजूनही उराची धडधड काही थांबली नव्हती, जणू अजूनही ती जीवघेणी शर्यत बाकी होती. आणि हो, खरेच. पुन्हा क्षितिजावर धुळाचे लोट उठताना दिसू लागले. काहीच सुस्पष्ट दिसत नव्हते, एक किनार ती काय, पण मी समजून चुकलो की पुन्हा ती जनावरे माझ्याच दिशेने चाल करून येत आहेत. मी वळून त्यांना पाठ करून पळायला सुरूवात केली. पुढे कुठवर पोहोचायचे आहे याची काहीच कल्पना नव्हती.

स्वच्छ मन

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 10/11/2013 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरी

अजुन ही एकटा आहे

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 07/11/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,' मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक