अविस्मरणीय...
हुकूमानुसार मी क्लासला बुट्टी मारून ऑन हर मॅजेस्टी'च्या सिक्रेट मोहीमेवर निघालो होतो(म्हणजे तिच्या घरी निघालो होतो). याआधी इतक्या मोहीमा झाल्या होत्या, पण तरीही 'कधीना कधी तरी आपण पकडले जाणारच' या भितीपोटी नेहमी गडाच्या पायथ्याशी (म्हणजे तिच्या सोसायटीच्या मेनगेटजवळ) आल्यावर छातीत धडधड सुरू व्हायची. तशी ती आजही सुरू झाली. पण 'डर के आगे जीत है, घर के अंदर अकेली मेरी प्रीत है' असं मनातल्या मनात म्हणत मी निधड्या छातीनं जीन्स सच्चिन-स्टाईलमध्ये अॅड्जस्ट करत सोसायटीत शिरायचो. सोसायटीचा विस्तार तसा ब-यापैकी मोठा होता.
मिसळपाव
