Skip to main content

अधुरी एक कहानी- भाग-२

शुक्रवार, 06/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
पक्या आपल्ल्या कथेचा नायक,तसा १० वीला होता यंदा.वर्गातील नव्हे तर शाळेतील एक हुशार विद्यार्थी म्हणून नावाजलेला होता.आणि का असु नये,अहो शिक्षकाच्या घरात जन्माला आलेले २ रे रत्न होते ते.अगदी सरळ रेषेत जीवन जगणे त्याने लहानपनात शिकून घेतले होते.छोट्याश्या गावात शिक्षकाला खूप आदराने पहिले जाते.साहजिकच पक्याला ही लहानपणीच याची जाणीव पदोपदी होत राहिली आणि मग सरळ रेषेत जीवन जगणे काय असते,याचे चपखल उदाहरण बनून गेला आपला पक्या!त्यामुळे आपल्याला मिळणारा मान हा आपला नसून आपल्या तीर्थरूपानमुळे आहे हे त्याला नेहमी लक्षात ठेवावे लागे. त्यामुळे बालपण कसे अगदी शिस्तीत गेलेले. पण आता तो तारुण्यात पाऊल ठेवत होता.त्यामुळे आता तर जबाबदारी खुपच वाढली होती,प्रतिमा जपण्याची ! आणि अश्यातच आता हे सगळे घडत होते.दहावीचे वर्ष आहे हे सगलेच नेहमी ऐकवत राहायचे.ते वेगळे च टेन्षन होते. पण काळ पासून त्याला झालेला आनंद त्याला लपवतही येत नव्हता.का झाला होता तेही कळत नव्हते.अचानक त्याला बालीवूड ची उडती गाणेही आवडायला लागली होती....तेही मागच्या दोन दिवसात! का ?........पुन्हा तेच... हळु हळु दिवस जात होते.पक्याची गाडी आहे तिथेच होती.रोज दर्शन झाले की गडी खुश होऊन जायचा.सगळा दिवस कसा कूल जायचा पक्याची स्टोरी नाय म्हणायला आता त्याच्या जवळच्या मित्राला माहीत झालिच होती.पण याची गाडी काही पुढे सरकत नाहीय म्हटल्यावर त्याला आपल्या मित्राची आणि त्याच्या सरळ पणाची कीव आली.तो नेहमीप्रमाणे मित्राच्या मदतीला धावून आला.काय रे,कसला विचार करतोस हल्ली इतका?बोलत नाही अलीकडे तू..स्वताच्या विचारताच अस्तोस..काय झालेय काय तुला ? पक्याला काहीतरी विचारायचेय हे त्याचा शांत चेहराच सांगत होता.मित्राने पक्याच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला.त्या सरशी पक्याने विचारले,काय सांगू यार,काही सुचत नाही अलीकडे.मन अभ्यासात पण नाय रमत आता पूर्वीसारखे.मित्राने विचारले का रे?कुणाचा इतका विचार करतोस मनात? झाले,मित्राने दुख़्ती नस पकडली होती जाणूनबुजून. पक्या थोडासा लाजला.संगितल्याशिवाय काही उपाय आपल्याला मिळणार नाही हे त्याला माहीत होतेच.तो हळूच म्हणाला अरे यार,तुला माहितेय सगळे ! पण मित्र जरा फिरकी घ्यायच्या मूड मधे दिसत होता.नाय बुवा ,मला कसे कळणार तू सांगितल्याशिवाय!मग लगेच हसून म्हणाला,अरे गंमत केली जरा तुझी.माहितेय मला. पक्याला जरा बरे वाटले.म्हणाला यार कळत नाहीय मला,कशातच मन नाही लागत आता!तसा हसून मित्र म्हणाला,हां...बघू काय होतेय ते!आणि हातात हात घेत उगाच नाडी तपासायचे नाटक करत म्हणाला...कठीण आहे......दिल की बिमारी है भाई...दिल की !बचना नामुंकीन होता है इसमे ! आणि हसत सुटला.पक्या पण झटकन हात सोडवून घेत म्हणाला..हाट पागल ! आणि दोघेही मनसोक्त हसायला लागले.मग हळूच पक्याने विचारले खरेच का रे यालाच का प्रेम म्हणतात?पण अरे आपण अजुन तर लहान आहोत ना मग कसे काय हे प्रेम बीम ? हसून मित्र म्हणाला,लहान ? कोण आपण ? आणि परत हसायला लागले दोघेही!मग दोघेही मूळ मुद्द्यावर आले.मित्राने सगळी माहिती अगदी न सांगता काढली होती.ती ऐकून पक्याला काहीसा आनंद झाला आणी काहीसे दुख: ! आनंद यासाठी की ती फारशी दूर नव्हती राहत पक्याच्या घरापासून! दुख: यासाठी की ती ही त्याच्या प्रमाणेच एका शिक्षकाची मुलगी होती.मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की ओके,म्हणजे ती त्या नवीन बदलून आलेल्या सरांची मुलगी आहे तर !पण सरांची मुलगी म्हटले म्हणजे स्टाफ मेंबर ची मुलगी ! पण तो स्वताला समझावायला लागला की आपण प्रेम थोडीच ना करतोय!आपण तर फक्त तिला रोज पाहतो आणि बस्स.....बाकी काय नाही.कारण प्रेम ही किती गहिरी संकल्पना आहे हे त्या च्यासारख्या किशोरवयीन मुलाला काय माहीत असणार ! पण ती आपल्याला आवडते आणि तिला बघितले की आपला दिवस कसा कूल जातो..हे याला पक्के समजले होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1631
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

करमश लिवायच राईले का ?